AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ekadashi : या तारखेला आहे पापंकुशा एकादशी, काय आहे या व्रताचे महत्त्व?

25 ऑक्टोबरला सूर्योदयानंतर पापंकुशा एकादशीचे व्रत तुम्ही करू शकता कारण त्या वेळेपासून रवि योग आणि वृद्धी योग येतील. हे दोन्ही शुभ योग आहेत. वृद्धी योगात तुम्ही कोणतेही काम कराल, त्याचे फळ वाढते. रवि योग सूर्याच्या प्रभावाखाली आहे. व्रताच्या दिवशी पूजेसाठी राहुकालाचा त्याग करावा. त्या दिवशी राहुकाल दुपारी 12:05 ते 1:29 पर्यंत आहे. राहुकालात एकादशीची पूजा करू नये.

Ekadashi : या तारखेला आहे पापंकुशा एकादशी, काय आहे या व्रताचे महत्त्व?
एकादशीImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Oct 20, 2023 | 5:58 PM
Share

मुंबई : पापंकुशा एकादशीचे व्रत अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला (Ekadashi Upay) केले जाते. पापंकुशा एकादशीचे व्रत केल्यास मनुष्य आपल्या पापांचे प्रायश्चित्त करतो. हरिच्या कृपेने मोक्ष प्राप्त होतो. पापंकुशा एकादशीचे व्रत योग्य रीतीने पाळणाऱ्या व्यक्तीला 100 सूर्ययज्ञ आणि 1 हजार अश्वमेध यज्ञ करण्यासारखे पुण्य प्राप्त होते. भगवान विष्णूच्या आशीर्वादाने माणसाच्या मनोकामना पूर्ण होतात.  यावर्षी पापंकुशा एकादशीचे व्रत कधी आहे? पापंकुशा एकादशी व्रताची पूजा वेळ आणि महत्त्व काय आहे ते जाणू घेऊया.

पापंकुशा एकादशी २०२३ कधी आहे?

पंचांगानुसार, आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी मंगळवार 24 ऑक्टोबर रोजी दुपारी 03:14 पासून सुरू होईल. ही तारीख बुधवार, 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:32 वाजता संपेल. उदयतिथीच्या आधारे, यावर्षी 25 ऑक्टोबर रोजी पापंकुशा एकादशीचे व्रत करणे उत्तम आहे.

पापंकुशा एकादशी व्रत 3 शुभ योगांमध्ये आहे

यावर्षी पापंकुशा एकादशीचे व्रत 3 शुभ योगांमध्ये आहे. पापंकुशा एकादशीच्या दिवशी रवियोग, वृद्धी योग आणि ध्रुव योग तयार होत आहेत. त्या दिवशी रवि योग सकाळी 06.28 पासून सुरू होत असून दुपारी 01.30 पर्यंत वैध राहील. तर वृद्धी योग सकाळपासून सुरू होऊन दुपारी १२.१८ पर्यंत चालेल. त्यानंतर ध्रुव योग सुरू होईल, रात्रीपर्यंत.

पापंकुशा एकादशी 2023 पूजा मुहूर्त

25 ऑक्टोबरला सूर्योदयानंतर पापंकुशा एकादशीचे व्रत तुम्ही करू शकता कारण त्या वेळेपासून रवि योग आणि वृद्धी योग येतील. हे दोन्ही शुभ योग आहेत. वृद्धी योगात तुम्ही कोणतेही काम कराल, त्याचे फळ वाढते. रवि योग सूर्याच्या प्रभावाखाली आहे. व्रताच्या दिवशी पूजेसाठी राहुकालाचा त्याग करावा. त्या दिवशी राहुकाल दुपारी 12:05 ते 1:29 पर्यंत आहे. राहुकालात एकादशीची पूजा करू नये.

पापंकुशा एकादशीला भाद्रा आणि पंचक

पापंकुशा एकादशीच्या दिवशीही भाद्रा आणि पंचक असते. त्या दिवशी भद्रा सकाळी 06:28 पासून सुरू होईल आणि दुपारी 12:32 पर्यंत राहील. भद्रा पृथ्वीवर वास करते, त्यामुळे या काळात कोणतेही शुभ कार्य करू नका. पापंकुशा एकादशीला दिवसभर पंचक असते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!