AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Feng Shui : एक आरसा तुमचं संपूर्ण आयुष्यच बदलू टाकेल, पडेल पैशांचा पाऊस, फेंग शुईचा हा नियम समजून घ्या

फेंग शुई हे देखील एक वास्तुशास्त्र आहे. फेंग शुई शास्त्राचा उगम हा चीनमध्ये झाला, त्यानंतर संपूर्ण जगभरात याचा प्रसार झाला. घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी फेंग शुईमध्ये काही सोपे -सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, त्यातील काही उपायांबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

Feng Shui : एक आरसा तुमचं संपूर्ण आयुष्यच बदलू टाकेल, पडेल पैशांचा पाऊस, फेंग शुईचा हा नियम समजून घ्या
Feng ShuiImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 16, 2026 | 9:27 PM
Share

फेंग शुई हे देखील एक वास्तुशास्त्र आहे. फेंग शुई शास्त्राचा उगम चीनमध्ये झाला. कालंतराने संपूर्ण जगभरात या फेंग शुई शास्त्राचा प्रसार झाला. आज जगातील अनेक देशांमध्ये आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी यावी, कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत, यासाठी फेंग शुईमध्ये सांगण्यात आलेले उपाय केले जातात. जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो, तेव्हा तुमच्या घरात ऊर्जेचं संतुलन बिघडतं. यामुळे तुमच्या आयुष्यात अडचणी वाढू शकतात. ऊर्जा संतुलन टिकून राहावं, यासाठी फेगं शुईमध्ये काही उपाय सांगण्यात आले आहेत. आज आपण त्यातीलच आरशासी संबंधित एका उपयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. फेंग शुईमध्ये तुमच्या घरातील आरशाला अतिशय महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे. फेंग शुईनुसार तुमच्या घरातील आरसा कसा आहे? तो कोणत्या दिशेला लावण्यात आला आहे, घरातील कोणत्या भागामध्ये आरसा लावण्यात आला आहे, यावरून देखील तुमच्या घरातील ऊर्जा संतुलन बिघडू शकतं. चला तर मग पाहूयात फेंग शुई शास्त्र नेमकं काय सांगतं?

घराच्या मुख्य दरवाजाजवळ लावा आरसा – फेंग शुई शास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजाजवळ आरसा लावला पाहिजे, यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो. मात्र अशा पद्धतीने आरसा लावताना एक काळजी घेतली पाहिजे, की तुमच्या घरातील मुख्य दरवाजावरून जाणाऱ्या-येणाऱ्या व्यक्तीला तुमच्या घरात काय चाललं आहे, हे दिसता कामा नये. या उलट या आरशाची रचना अशी असावी की जेव्हा एखादा व्यक्ती तुमच्या घरात प्रवेश करेल तेव्हा तो व्यक्ती तुम्हाला आधी आरशात दिसला पाहिजे. यामुळे तुमच्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मक शक्ती दूर होते. घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते, असं फेगं शुई मध्ये सांगण्यता आलं आहे.

फुटका आरसा असू नये- फेंग शुईनुसार घरात कधीही तडे गेलेला किंवा फुटका आरसा लावू नये, यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. घरात लावलेला आरसा हा अखंड असा असावा, तसेच फुटका आरशामध्ये कधीही आपला चेहरा पाहू नये, असं देखील फेंग शुईमध्ये सांगण्यात आलं आहे. तसेच बेडरूममध्ये देखील आरसा लावू नये, असंही फेगं शुईमध्ये म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा