AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चातुर्मासात ‘या’ वास्तु नियमांचे करा पालन, घरातील नकारात्मकता होईल दूर

चातुर्मासात भगवान विष्णू योगनिद्रा अवस्थेत असतात आणि त्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. या काळात घरात शांतता आणि आनंद टिकवून ठेवण्यासाठी वास्तुशास्त्रात अनेक प्रभावी उपाय आहेत ते आजच्या लेखात जाणून घेऊयात.

चातुर्मासात 'या' वास्तु नियमांचे करा पालन, घरातील नकारात्मकता होईल दूर
चातुर्मासात 'या' वास्तु नियमांचे करा पालन, घरातील नकारात्मकता होईल दूरImage Credit source: TV9 Network
| Edited By: | Updated on: Jul 19, 2026 | 8:23 PM
Share

हिंदू धर्मात चातुर्मासाचा काळ खूप विशेष मानला जातो. चातुर्मास हा चार महिन्यांचा कालावधी असतो. या चार महिन्यात विश्वाचे रक्षक भगवान विष्णू योगनिद्रा अवस्थेत जातात. त्यानंतर या चार महिन्यांच्या काळात भगवान शिव विश्वाचे शासन करतात. चातुर्मास हा पूजा, प्रार्थना आणि ध्यान करण्यासाठी विशेष काळ मानला जातो. या चार महिन्यांमध्ये देवता निद्रा घेतात, त्यामुळे विवाहासह सर्व शुभ कार्ये या काळात थांबवली जातात, कारण या काळात शुभ कार्यांना शुभ फळ मिळत नाही. चातुर्मास दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील देवशयनी एकादशीला सुरू होतो.

कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील देवूठनी एकादशीला चातुर्मास संपतो. या वर्षी चातुर्मास 25 जुलै रोजी सुरू होईल आणि 20 नोव्हेंबर रोजी संपेल. असे मानले जाते की चातुर्मास दरम्यान घरात नकारात्मक ऊर्जेचा मोठा प्रभाव असतो. यामुळे कौटुंबिक कलह निर्माण होऊ शकतो. वास्तुशास्त्रामध्ये नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी अनेक विशिष्ट उपाय सांगितले आहेत. या उपायांचे पालन केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि सुख-समाधान वाढते. चला तर मग, चातुर्मास दरम्यान घर नकारात्मक ऊर्जेपासून मुक्त ठेवण्यासाठी कोणते उपाय करावे ते जाणून घेऊयात.

चातुर्मासात घरात नकारात्मकता दूर ठेवण्याचे उपाय

मिठाने फरशी पुसणे: चातुर्मासात रोज पाण्यात मिठ मिक्स करून संपूर्ण घराची फरशी पुसावे. हा विधी नियमितपणे केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास आणि घरात सकारात्मक ऊर्जा येण्यास मदत होते.

कापूर जाळणे: हिंदू धर्मात धार्मिक विधींमध्ये कापूर जाळण्याला अत्यंत महत्त्व आहे. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा येते आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठीही ते फायदेशीर मानले जाते. जर तुमच्या घरात कौटुंबिक कलह असेल, तर चातुर्मासात दररोज कापूर जाळा. असे मानले जाते की या प्रथेमुळे वातावरण शुद्ध होते आणि कौटुंबिक कलह कमी होण्यास मदत होते.

दिवा लावा: जर तुम्ही आर्थिक संकटाचा सामना करत असाल, तर चातुर्मासात दररोज मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावा. वास्तुशास्त्रानुसार, संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावल्याने देवी लक्ष्मीचे घरात स्वागत होते आणि नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करण्यापासून रोखली जाते. यामुळे आर्थिक लाभाची शक्यताही निर्माण होते.

पाणी शिंपडणे: चातुर्मासात दररोज आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर पाणी शिंपडा. या प्रथेमुळे तुमच्या घरात शांती आणि आनंद नांदतो.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...