
आज, बुधवार 31 रोजी गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) असून घरोघरी सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आगमन झाले आहे. अवघ्या देशभरात धूमधडाक्यात साजरा होणारा गणेशोत्सवाच्या (Ganesh Utsav) निमित्ताने 10 दिवस मंगलमय होतात. आज घराघरांत आणि मंडळांमध्ये ढोलाचा कडकडाट, गुलाल आणि फुलांची उधळण करत बाप्पाचं स्वागत करण्यात आलं आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची विधिवत पूजा केली जाते, गोड पदार्थांचा आणि बाप्पाला आवडतात म्हणून उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. आजच्या दिवशी बरेच भाविक गणपती बाप्पाचा आशिर्वाद घेण्यासाठी मंदिरांमध्ये रांगा लावू उभे असतात. देशभरात गणपती बाप्पाची कोणती प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिरं (famous and Ancient temples) आहेत, ते जाणून घेऊया.
हे मंदिर मुंबईतील दादर येथे स्थित सून खूप प्रसिद्ध आहे. सिद्धिविनायक मंदिर हे अनेक प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. असे म्हटले जाते की या मंदिराची स्थापना 1801 साली करण्यात आली होती. या मंदिरात दर्शनासाठी रोज खूप भाविक येतात. मात्र संकष्टी चतुर्थी, अंगारकी आणि गणेश चतुर्थी या विशेष दिवशी मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी असते. गणपाती बाप्पाचा आशिर्वाद मिळावा यासाठी लोक रात्रीपासून रांगा लावून उभे असतात.
महाराष्ट्रातील पुणे येथील हे मंदिर सुमारे 130 वर्षे जुने आहे. हे जागृत देवस्थानांपैकी एक आहे, असे म्हणतात. श्रीमंत दगड़ूशेठ हलवाई गणपति मंदिरात गणपती बाप्पाची मूर्ती 7.5 फूट लांब आणि चार फूट रुंद इतकी आहे. या मूर्तीला सोन्याच्या दागिन्यांनी सजवले जाते.
हे मंदिर राजस्थानधील लोकप्रिय मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर 1761 साली बनवण्यात आले होते. या मंदिरात गणेश चतुर्थीचा उत्सव धूमधडाक्यात साजरा केला जातो. गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी इथे हजारोंच्या संख्येने भाविक येतात.
हे मंदिर कर्नाटकमधील इदगुंजी येथे आहे. हे मंदिर सुमारे 1500 वर्ष जुने असून ते खूप लोकप्रिय आहे. दर वर्षी लाखो भाविक या मंदिरात गणेशाच्या दर्शनासाठी आणि आशिर्वादासाठी येतात. गणेशोत्सवाच्या काळातही तुम्ही इथे दर्शनासाठी येऊ शकता.