AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ganesh Rudraksha: गणेश रुद्राक्षाने होतात सर्व मनोकामना पूर्ण, जाणून घ्या रुद्राक्षाबद्दल महत्त्वाची माहिती

रुद्राक्ष धारण केल्याने जीवनाशी संबंधित सर्व क्षेत्रात अपेक्षित यश प्राप्त होते अशी मान्यता आहे. असे मानले जाते की भगवान शंकराच्या अश्रूंपासून बनवलेला रुद्राक्ष गणेशोत्सवात नियमानुसार धारण केल्यास भगवान श्रीगणेशाच्या कृपेने सर्व मनोकामना पूर्ण होतात.

Ganesh Rudraksha: गणेश रुद्राक्षाने होतात सर्व मनोकामना पूर्ण, जाणून घ्या रुद्राक्षाबद्दल महत्त्वाची माहिती
गणेश रुद्राक्ष Image Credit source: Social Media
| Updated on: Sep 02, 2022 | 3:26 PM
Share

रुद्राक्षामध्ये (Ganesh Rudraksha) नैसर्गिक चमत्कारिक गुण असल्याचे विज्ञानानेही मान्य केले आहे.  हिंदू धर्मात गणेश रुद्राक्ष हे एक अत्यंत पवित्र बीज मानले जाते, रुद्राक्षाच्या सकारात्मक ऊर्जेमुळे व्यक्तीभोवती विशिष्ट वलय तयार होते असे अभ्यासकांचे मत आहे. रुद्राक्ष धारण केल्याने जीवनाशी संबंधित सर्व क्षेत्रात अपेक्षित यश प्राप्त होते अशी मान्यता आहे. असे मानले जाते की भगवान शंकराच्या अश्रूंपासून बनवलेला रुद्राक्ष गणेशोत्सवात नियमानुसार धारण केल्यास भगवान श्रीगणेशाच्या कृपेने सर्व मनोकामना पूर्ण होतात. नकारात्मक ऊर्जा कमी झाल्याने व्यक्ती भयमुक्त होतो. रिद्धी-सिद्धी देणार्‍या गणपतीच्या आकारात असल्याने या रुद्राक्षाला गणेश रुद्राक्ष म्हणतात. हा रुद्राक्ष धारण केल्याचे अनेक फायदे आहेत (Benefits) .

गणेश रुद्राक्ष धारण करण्याचे फायदे

  1. हिंदू धर्मात गणेशाला बुद्धीची देवता मानले जाते. गणेश रुद्राक्ष विद्यार्थ्यांसाठी अत्यंत फलदायी मानला जातो. गणेश रुद्राक्ष धारण करणाऱ्या व्यक्तीवर भगवान श्री गणेशाचा विशेष आशीर्वाद होतो.
  2. असे मानले जाते की, गणेश रुद्राक्ष धारण करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनाशी संबंधित सर्व ज्ञात-अज्ञात शत्रूंपासून बचाव होतो आणि त्याला नेहमी सुख-समृद्धी मिळते.
  3. रुद्राक्षाचा संबंध केवळ धर्माशीच नाही तर ज्योतिषशास्त्राशीही आहे. ज्योतिष शास्त्रानुसार गणेश रुद्राक्ष बुध ग्रहाशी संबंधित आहे, जो धारण केल्याने कुंडलीत स्थित बुध ग्रहाशी संबंधित दोष दूर होतात आणि त्याचे शुभफळ प्राप्त होतात.  नवग्रहांमध्ये बुद्धिमत्तेचा कारक मानल्या जाणाऱ्या बुध ग्रहाच्या अनुकूलतेसाठी गणेश रुद्राक्ष धारण करावा.
  4. परीक्षा-स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष अत्यंत शुभ आहे. गणेश रुद्राक्ष धारण केल्याने विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढते.  गणेश रुद्राक्षाच्या प्रभावामुळे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळते.
  5.  ज्यांची स्मरणशक्ती कमकुवत असते,  त्यांच्यासाठी गणेश रुद्राक्ष फायदेशीर आहे. गणपतीचा आशीर्वाद देणारा हा रुद्राक्ष धारण केल्याने  स्मरणशक्ती वाढते.
  6. रुद्राक्ष धारण केल्याने व्यक्तीच्या जीवनाशी संबंधित सर्व मानसिक समस्या दूर होतात. गणेश रुद्राक्ष धारण केल्याने व्यक्तीच्या करिअर आणि व्यवसायात येणारे सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात आणि  जीवनात अपेक्षित यश मिळते.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.