Spiritual: प्रत्येक जपमाळेचा असतो स्वतःचा वेगळा प्रभाव, मंत्रांचा जप करण्यासाठी कोणती माळ वापरावी

मोठ्या जपमाळात 108 मणी आणि छोट्या जपमाळात 54 मणी असतात. यासोबतच रुद्राक्षाव्यतिरिक्त विविध वस्तूंपासून माळ बनवल्या जातात, प्रत्येक देवाच्या आवडीनुसार विशिष्ट गोष्टींपासून जपमाळ तयार केली जाते.

Spiritual: प्रत्येक जपमाळेचा असतो स्वतःचा वेगळा प्रभाव, मंत्रांचा जप करण्यासाठी कोणती माळ वापरावी
जपमाळेचे प्रकार Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 10, 2022 | 5:40 AM

Spiritual:  हिंदू धर्मात मंत्रांना खूप महत्त्व आहे. प्रत्येक देवतेचा वेगळा मंत्र आहे. असे मानले जाते की, जर एखाद्या व्यक्तीने या मंत्रांचा पूर्ण भक्तिभावाने जप केला तर त्याची सर्व कामे पूर्ण होतात. प्रत्येक मंत्र एकाग्रतेने करणे आवश्यक आहे आणि या मंत्रांची गणना विसरू नये म्हणून माळेचा (Jap Mala) वापर केला जातो. जपमाळाचे मणी जपमणी  म्हणून ओळखले जातात. मोठ्या जपमाळात 108 मणी आणि छोट्या जपमाळात 54 मणी असतात. यासोबतच रुद्राक्षाव्यतिरिक्त विविध वस्तूंपासून माळ बनवल्या जातात, प्रत्येक देवाच्या आवडीनुसार विशिष्ट गोष्टींपासून जपमाळ तयार केली जाते. त्यामुळेच इच्छित परिणाम मिळविण्यासाठी कोणती जपमाळ वापरावी याबद्दल जाणून घेऊया.

कोणत्या देवतेच्या जपासाठी कोणती कोणती माळ वापरावी

कमलगट्ट्याची माळ 

कमलगट्ट्याची माळ माता लक्ष्मी आणि माता दुर्गा यांच्या मंत्रांचा जप करण्यासाठी वापरली जाते. कमलगट्ट्याच्या माळात 108 मणी असतात.

हे सुद्धा वाचा

रुद्राक्षाची माळ 

रुद्राक्षाची माळ घालून भगवान शिवाचा जप करणे शुभ मानले जाते. या जपमाळेने महामृत्युंजय आणि लघु मृत्युंजय मंत्राचा जप करावा. रुद्राक्ष जपमाळात संपूर्ण 108 धान्ये म्हणजेच मणी असतात. 108 मणींचे धार्मिक महत्त्व खूप मोठे आहे. धार्मिक मान्यतेनुसार, शास्त्रांमध्ये एकूण 27 नक्षत्रांचा उल्लेख करण्यात आला आहे. प्रत्येक नक्षत्रात 4 चरण असतात आणि 27 नक्षत्रात एकूण 108 चरण असतात. जपमाळातील प्रत्येक रुद्राक्ष नक्षत्राच्या प्रत्येक टप्प्याचे प्रतिनिधित्व करतो.

स्फटिक माळ

देवी लक्ष्मी तसेच देवी सरस्वती आणि श्रीगणेशाच्या मंत्रांचा स्फटिकांच्या माळेने जप करणे शुभ मानले जाते. यामुळे धनलाभ होतो. स्फटिक माळ ही स्फटिकापासून बनलेली असते. ज्यामध्ये 108 मणी असतात.

हळदीची माळ

हिंदू धर्मात हळद शुभ मानली जाते आणि ती प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात वापरली जाते. शत्रूचा नाश करण्यासाठी बगलामुखी मंत्राचा जप करण्यासाठी हळदीची माळ वापरली जाते. याशिवाय या माळेने श्रीगणेशाच्या मंत्रांचा जप केला जातो. यासोबतच भगवान  शिवालाही हे प्रिय आहे. यामध्ये 108 मणी असणे शुभ मानले जाते.

तुळशीची माळ

भगवान विष्णूंना तुळशी अत्यंत प्रिय आहे, म्हणून या माळा घालून श्री हरी तसेच त्यांचे अवतार भगवान श्री राम, श्री कृष्ण, विठू माउली यांची पूजा करणे शुभ मानले जाते. जपमाळात 108 मणी असतात, लहान माळेत  27 किंवा 54 मणी देखील असतात. ज्याचा उपयोग वेगवेगळ्या मंत्रांमध्ये केला जातो.

चंदनाची माळ

चंदनाचे मणी दोन प्रकारचे असतात, पहिले लाल चंदन आणि दुसरे पांढरे चंदन. विशेषतः देवीच्या मंत्रांचा जप करण्यासाठी आणि भगवान श्रीकृष्णाच्या मंत्रांसाठी लाल चंदनाच्या माळांचा वापर केला जातो. या जपमाळात  108 मणी असतात.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.