AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आईवडील महाकुंभला घेऊन गेले नाही, घरातून निघाली तरुण मुलगी, अशा ठिकाणी पोहोचली की…

भोपालची एक तरुणी कुंभमेळ्यास जाण्यासाठी घरातून निघाली, पण चुकीच्या ट्रेनमुळे ती कनपूरजवळ गोविंदपुरीला पोहोचली. एकटी असल्याने तिचे रेल्वे पोलिसांनी वाचवले. पोलिसांनी तिच्या कुटुंबाशी संपर्क साधला ज्यांनी तिचा मिसिंग रिपोर्ट दाखल केला होता. मुलगी कुंभमेळ्यात जाण्यासाठी हट्ट करत होती...

आईवडील महाकुंभला घेऊन गेले नाही, घरातून निघाली तरुण मुलगी, अशा ठिकाणी पोहोचली की...
| Edited By: | Updated on: Feb 24, 2025 | 5:09 PM
Share

प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू आहे. या ठिकाणी गर्दी थांबता थांबत नाहीये. आतापर्यंत सुमारे 60 कोटी भक्तांनी संगमच्या पवित्र पाण्यात स्नान केले आहे. तरीदेखील असे अनेक कुटुंब आहेत जे महाकुंभला जाऊ शकले नाहीत. अशाच एका कुटुंबाचे उदाहरण मध्यप्रदेशच्या भोपालमधून समोर आलं आहे. या कुटुंबातील एक तरुण मुलगी कुटुंबाला न सांगताच कुंभकडे निघाली. पण ती असा ठिकाणी पोहोचली की… या घटनेची आता सर्वत्र चर्चा होत आहे. काय घडलं असं नेमकं?

भोपालच्या आनंद नगर वीज कॉलनीत राहणारी एक तरुणी आपल्या घरच्यांना न सांगता महाकुंभसाठी निघाली. यासाठी ती घरातून एकटीच स्टेशनला गेली आणि ट्रेन पकडली. पण रेल्वे स्टेशनवर तिला चुकीच्या ट्रेनमध्ये बसवले गेले, ज्यामुळे ती प्रयागराजऐवजी इतर ठिकाणी पोहोचली. तर,दुसरीकडे, घरातून मुलगी गायब झाल्यामुळे संपूर्ण कुटुंब चिंतेत होते. वडिलांनी पोलिसांत ती हरवल्याची तक्रार दिली. अखेरीस ती कानपूरजवळ गोविंदपुरी रेल्वे स्टेशनवर सापडली.

जायचं होतं एकीकडे, गेली…

एकटीच फिरत असलेली मुलगी गोविंदपुरी रेल्वे स्टेशनवर गांगरल्या सारखी फिरत होती. रेल्वे पोलिसांची नजर तिच्यावर पडली. ही मुलगी गांगरल्याचं दिसल्याने पोलिसांना शंका आली. ती एकटीच इथे तिकडं फिरत होती. पोलिसांनी तिला विचारले, तेव्हा समजले की ती एकटीच आहे आणि महाकुंभासाठी आपल्या घरातून निघाली होती. त्यानंतर तिच्या घरच्यांच्या नंबरवरून आरपीएफने तिच्या वडिलांना कॉल केला. कॉलवरून कळले की तिच्या विरुद्ध भोपालमध्ये मिसिंग रिपोर्ट दाखल करण्यात आली होती.

महाकुंभाला जायचं होतं

राजकुमार लोधी यांची ही मुलगी सुरुवातीपासून महाकुंभला जाण्याचा हट्ट धरून बसली होती. पण गर्दी पाहता, कुटुंबीयांनी तिला नकार दिला होता. त्यानंतर, रविवारी मुलगी एकटीच महाकुंभासाठी निघाली. ती एकटीच रेल्वे स्टेशनला गेली आणि चुकीच्या ट्रेनमध्ये बसून गोविंदपुरीला पोहोचली. पोलिसांनी या मुलीचा ताबा चाइल्डलाइनला दिला आहे. आता तिचे वैद्यकीय तपासणी करून ती कुटुंबाच्या ताब्यात दिली जाईल.

...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.