Good Friday | गुड फ्रायडे, जाणून घ्या काय आहे नावामागील कहाणी…

ख्रिश्चन लोकांमध्ये गुड फ्रायडे आणि इस्टर संडे दे दिवस अत्यंत पवित्र मानले (Good Friday On 2nd April) जातात.

Good Friday | गुड फ्रायडे, जाणून घ्या काय आहे नावामागील कहाणी...
good friday

मुंबई : ख्रिश्चन लोकांमध्ये गुड फ्रायडे आणि इस्टर संडे दे दिवस अत्यंत पवित्र मानले (Good Friday On 2nd April) जातात. या दिवशी ख्रिश्चन धर्मावर विश्वास ठेवणारे लोक चर्चमध्ये जातात आणि येशूचं स्मरण करतात आणि मोठ्या उत्साहाने सामाजिक कार्य करतात. अशी मान्यता आहे की गुड फ्रायडेच्या दिवशी येशूला वधस्तंभावर खिळण्यात आले आणि त्यांनी आत्मत्याग करुन लोकांना प्रेमाच्या कळसाचं एक उदाहरण सादर केले (Good Friday On 2nd April Know Why This Day Called Good Friday).

या दिवसाला होली डे, ग्रेट फ्रायडे आणि ब्लॅक डे असेही म्हणतात. यावेळी गुड फ्रायडे 2 एप्रिलला साजरा केला जात आहे. गुड फ्रायडेच्या दिवशी प्रभु येशूवर जे आत्याचार झालेत ते पाहता हा दिवस आनंदाचा दिवस मानला जाऊ शकत नाही. मग या दिवसाला गुड फ्रायडे का म्हटलं जातं? चला जाणून घेऊ याबाबतची अधिक माहिती –

मान्यता काय?

ख्रिश्चन समाजाच्या लोकांमध्ये अशी मान्यता आहे की प्रभु येशू ख्रिस्त हे देवाचा पुत्र होते. अज्ञान दूर करण्यासाठी आणि प्रेम आणि चांगुलपणा शिकवण्यासाठी ते या पृथ्वीवर आले. त्यामुळे जेव्हा पितालुसने कट्टर लोकांचे समाधान करण्यासाठी येशू ख्रिस्तांवर अनेक अत्याचार केले तरीही त्यांनी ते सर्व सहन केलं. जेव्हा पिलातुसने येशू यांना क्रॉसवर लटकवून त्यांचा जीव घेण्याचा आदेश दिला तरीही येशूयांनी त्या लोकांच्या अज्ञानतेसाठी देवाला प्रार्थना केली की यांना माफ करा, कारण, यांना नाही माहित की हे काय करत आहेत. येशू यांनी प्रेमाच्या सर्वोत्तम उदाहरण सादर करण्यासाठी आपली कुर्बानी दिली. ज्या दिवशी त्यांना क्रॉसवर लटकवण्यात आले होते, त्या दिवशी फ्रायडे म्हणजेच शुक्रवारचा दिवस होता. येशू यांनी महानता, त्याग, दया आणि प्रेमाची इच्छा पाहता या शुक्रवारला गुड फ्रायडे म्हटलं जाऊ लागलं

गुड फ्राइडे कसा साजरा केला जातो?

या दिवशी लोक चर्चमध्ये जाऊन प्रभू येशूचं स्मरण करतात. काही लोक येशूच्या स्मरणार्थ काळे कपडे परिधान करुन शोक व्यक्त करतात आणि पदयात्राही काढली जाते. या दिवशी मेणबत्ती लावली जात नाही आणि घंटीही वाजवली जात नाही. लोक लाकडाने खटखट असा आवाज करतात. कारण हा दिवस चांगुलपणाचा दिवस मानला जातो, म्हणूनच बहुतेक लोक सामाजिक कार्यात भाग घेतात. वृक्षारोपण करतात आणि दान करतात.

ईस्टर संडे म्हणजे काय?

मान्यतेनुसार, क्रॉसवर लटकवल्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी येशू पुन्हा जिवंत झाले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या अनुयायांसोबत 40 दिवस वेळ घालवला. येशूच्या पुनःजीवित जाल्याने या दिवसाला ईस्टर संडे म्हटलं जातं. या दिवसापासून ते 40 दिवसांपर्यंत ईस्टर पर्व साजरा केला जातो.

Good Friday On 2nd April Know Why This Day Called Good Friday

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | तुच्या यशाचा सर्वात मोठा शत्रू आहे ‘हा’ दोष, लवकरात लवकर सोडा अन्यथा नुकसान होणार

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI