Gudi Padwa 2021 | आज गुढीपाडवा, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्व…

गुढीपाडवा (Gudi Padwa) हा चैत्र महिन्यात येणारा एक महत्त्वाचा सण आहे. या सणापासूनन मराठी आणि कोंकणी लोकांच्या नवीन वर्षाला सुरुवात होते.

Gudi Padwa 2021 | आज गुढीपाडवा, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्व...
gudi padwa
Follow us
| Updated on: Apr 13, 2021 | 9:00 AM

मुंबई : गुढीपाडवा (Gudi Padwa) हा चैत्र महिन्यात येणारा एक महत्त्वाचा सण आहे. या सणापासूनन मराठी आणि कोंकणी लोकांच्या नवीन वर्षाला सुरुवात होते. हा सण महाराष्ट्र आणि गोव्यात शुक्ल पक्षाच्या चैत्र प्रतिपदा तिथीला हिंदू कॅलेंडरनुसार साजरा केला जातो.

यावेळी गुढी पाडव्याचा सण 13 एप्रिलला साजरा केला जाणार आहे. या दिवशी घरात वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवले जातात. भगवान ब्रह्मा आणि विष्णूची पूजा केली जाते. हिंदू धर्मात असे मानले जाते की चैत्र महिन्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होते. विशेषकरुन महाराष्ट्रात हिंदू नववर्ष हा गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. हा दिवस पीक दिवस म्हणूनही साजरा केला जातो .

हा सण देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. कोंकणी लोक याला संवत्सर म्हणतात. कर्नाटकमध्ये हा सण युगाडी पर्व या नावाने ओळखला जातो, तर आंध्रप्रदेश, तेलंगाणामध्ये हा दिवस उगाडी, काश्मीरमध्ये ‘नवरेह’, मणिपूरमध्ये सजिबू नोंगमा पानबा या नावानं ओळखला जातो.

गुढीपाडवा कसा साजरा केला जातो?

गुढीपाडवा खासकरुन महाराष्ट्रात साजरा केला जातो. लोक या दिवशी नवीन कपडे घालतात. हा सण मित्र, कुटुंबातील सदस्यांसह आणि नातेवाईकांसोबत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या विशेष दिवशी पुरणाची पोळी आणि श्रीखंड बनवले जाते. याशिवाय, गोड भातही बनविला जातो. सूर्योदयाला भगवान ब्रह्माला या सर्व पदार्थांचं नैवेद्य दाखवलं जाते.

गुढीपाडव्याचे महत्त्व

पौराणिक कथांनुसार, प्रतिपदेच्या तिथीला भगवान ब्रह्मा यांनी विश्वाची निर्मिती केली होती. या दिवशी भगवान ब्रह्माची विधीवत पूजा केली जाते. मान्यता आहे की या दिवशी पूजा केल्याने सर्व वाईट गोष्टींचा नाश होतो आणि घरात सुख-समृध्दी नांदते.

गुढीपाडव्याची तिथी आणि शुभ मुहूर्त

गुढीपाडव्याचा उत्सव – 13 एप्रिल 2021

प्रतिपदा तिथीची सुरुवात – 12 एप्रिल 2021 ला रात्री 8 वाजता

गुढी पाडव्याची पूजा पद्धत

1. गुढी पाडव्याचं अनुष्ठान सूर्योदयापूर्वी केलं जाते. या दिवशी सकाळी उठून तेल लावून स्नान करावे.

2. त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याची पाने आणि फुलांनी सजविलं जातं.

3. यानंतर घराच्या एका भागात गुढी उभारली जाते. गुढीला आंब्याची पाने, नवे कपडे आणि फुलांनी सजावलं जाते.

4. नंतर लोक भगवान ब्रह्माची पूजा करतात.

5. गुढी उभारल्यानंतर भगवान विष्णूची पूजा केली जाते.

गुढीपाडवा 2021 ची पूजा सामग्री

? तांब्याचा कलश

? नवीन कपडा

? आंब्याची पानं

? कडुलिंबाच्या पानांचा गुच्छा

? साखरेची गाठी

? फुलांचा हार

? लाकडी काठी

? तांदुळ आणि हळद

? कुंकू

? पान आणि सुपारी

? नारळ

? फळं

? उदबत्ती

? दिवा

गुढी कशी उभारावी –

? गुढीची उंच काठी बांबूपासून तयार केली जाते. काठीला स्वच्छ धुऊन त्या काठीच्या वरच्या भागाला रेशमी वस्त्र किंवा साडी गुंडाळतात.

? काठीला कडुलिंबाची डहाळी आंब्याची पाने, फुलांचा हार, साखरेची गाठी बांधून त्यावर तांबा, पितळ, किंवा चांदीचे गडू, तांब्या किंवा फुलपात्र बसविले जाते.

? ज्या भागाला गुढी उभारायची आहे, तिथली जागा स्वच्छ करुन धुऊन पुसून घ्यावी.

? त्यावर रांगोळी काढून पाट ठेवून गुढीची काठी ठेवावी.

? तयार केली गुढी दारात, उंच गच्चीवर, गॅलरीत लावावी.

? गुढीची काठी नीट बांधून काठीला गंध, फुले, अक्षता वाहून गुढीची पूजा करावी.

? निरंजन लावून उदबत्ती ओवाळावी.

? दूध साखर पेढ्यांचा नैवेद्य दाखवावं.

? दुपारी गुढीला गोडधोडाचे नैवेद्य दाखवावे.

? संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी परत हळद-कुंकू, फुले, अक्षता, वाहून गुढी उतरवावी.

Gudi Padwa 2021 Know The Shubh Muhurat, Importance And Puja Vidhi

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Gudi Padwa 2021 | कधी आहे गुढीपाडवा, जाणून घ्या महत्त्व आणि पूजा विधी…

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.