Gupt Navratri 2022 | माघ गुप्त नवरात्र म्हणजे नक्की काय? जाणून घ्या तिचे महत्त्व

| Updated on: Jan 16, 2022 | 2:29 PM

या वर्षी पहिली नवरात्र माघा महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेला म्हणजेच 02 फेब्रुवारी 2022 रोजी येणार आहे. जाणून घेऊयात तिचे महत्त्व

Gupt Navratri 2022 | माघ गुप्त नवरात्र म्हणजे नक्की काय? जाणून घ्या तिचे महत्त्व
Navratri
Follow us on

मुंबई : हिंदू (Hindu) धर्मात स्त्री शक्तीच्या जागराला विषेश महत्त्व देण्यात आले आहे. म्हणूनच शक्तीच्या उपासनेचा सण नवरात्र वर्षातून चार वेळा साजरा करण्यात येतो.पहिली वासंतिक नवरात्र पहिल्या चैत्र महिन्यात येते , दुसरी नवरात्र आषाढ महिन्यात, तिसरी अश्विन महिन्यात म्हणजे शारदीय नवरात्री आणि चौथी नवरात्र अकराव्या महिन्यात म्हणजेच माघ महिन्यात येते . यापैकी माघ महिन्यात येणाऱ्या नवरात्रीला “माघ गुप्त नवरात्र” (Gupt Navratri 2022 ) आणि आषाढ महिन्यात येणाऱ्या नवरात्रीला “ आषाढ गुप्त नवरात्र” म्हणतात.म्हणून संबोधले जाते.या वर्षी पहिली नवरात्र माघा महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेला म्हणजेच 02 फेब्रुवारी 2022 रोजी येणार आहे.

गुप्त नवरात्री 2022 चे महत्व
नवरात्रीत दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते, तर गुप्त नवरात्रीमध्ये दहा महाविद्या काली, तारा देवी, त्रिपुरा सुंदरी, भुवनेश्वरी, छिन्नमस्ता, त्रिपुरा भैरवी, ध्रुमावती, बगलामुखी आणि कमलांगी देवीची पूजा केली जाते. गुप्त नवरात्रीमध्ये शक्तीची पूजा अत्यंत गुप्तपणे केली जाते. असे मानले जाते की गुप्त नवरात्रीची पूजा जितकी गुप्ततेने केली जाते तितकी देवीची कृपा होते.

गुप्त नवरात्री पूजा विधी
चैत्र आणि शारदीय नवरात्रीप्रमाणे, गुप्त नवरात्रीमध्ये, देवी पूजेच्या पहिल्या दिवशी कलशाची स्थापना केली जाते आणि संपूर्ण नऊ दिवस सकाळ-संध्याकाळ देवीची पूजा, मंत्रजप इ. माघ महिन्यातील गुप्त नवरात्रीच्या साधनेसाठी 02 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 07:09 ते 08:31 पर्यंत घटस्थापना करणे. गुप्त नवरात्रीच्या दिवशी साधकाने सकाळी लवकर उठून स्नान आणि ध्यान करून, लाल कपड्यात दुर्गादेवीचे चित्र किंवा मूर्ती ठेवून लाल रंगाचे कपडे किंवा चुनरी इत्यादी परिधान करावे. यासह जवाच्या बिया मातीच्या भांड्यात पेराव्यात. ज्यामध्ये दररोज योग्य प्रमाणात पाणी शिंपडावे लागते. यासोबतच मंगल कलशात गंगाजल, नाणे इत्यादी टाकून शुभ मुहूर्तावर आम्रपल्लव आणि श्रीफळ ठेवून प्रतिष्ठापना करा.

(येथे दिलेली माहिती ही धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

संबंधीत बातम्या :

उद्या मंगळ करणार धनु राशीत प्रवेश, या 3 राशींना होणार धनलाभ!

Rashifal : पैशांचे व्यवहार करताना ‘या’ राशीच्या लोकांनी काळजी घेण्याची गरज!

Chanakya Niti : तुमच्या जीवनामध्ये समस्या आहेत? मग आजच आचार्य चाणक्यांच्या या 4 गोष्टी फाॅलो करा आणि सुखी जीवन जगा!