Chanakya Niti : तुमच्या जीवनामध्ये समस्या आहेत? मग आजच आचार्य चाणक्यांच्या या 4 गोष्टी फाॅलो करा आणि सुखी जीवन जगा!

आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) एक समाजशास्त्रज्ञ असण्याबरोबरच ते सर्व विषयांचे खूप मोठे जाणकार होते. त्यांनी आयुष्यात खूप संघर्ष केला. यामुळेच आजच्या काळातही आचार्य यांच्या काही गोष्टी फाॅलो करून आपण सुखी जीवन जगू शकतो.

Chanakya Niti : तुमच्या जीवनामध्ये समस्या आहेत? मग आजच आचार्य चाणक्यांच्या या 4 गोष्टी फाॅलो करा आणि सुखी जीवन जगा!
चाणक्य नीति

मुंबई : आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) एक समाजशास्त्रज्ञ असण्याबरोबरच ते सर्व विषयांचे खूप मोठे जाणकार होते. त्यांनी आयुष्यात खूप संघर्ष केला. यामुळेच आजच्या काळातही आचार्य यांच्या काही गोष्टी फाॅलो करून आपण सुखी जीवन जगू शकतो. तुमच्या जीवनातही अनेक समस्या असतील किंवा काही कारणास्तव तुम्ही योग्य आणि अयोग्य यात फरक करू शकत नसाल तर चाणक्य नीतीमध्ये (Chanakya Niti) लिहिलेल्या 4 गोष्टी तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत.

आपले दु:ख दुसऱ्यांना सांगू नका 

आपण बऱ्याच लोकांना बोलताना ऐकले असेल की, दु:ख दुसऱ्याला सांगितल्याने कमी होते. मात्र, आचार्य चाणक्यांचा असा विश्वास होता की दु:ख कधीही कोणालाही सांगू नये. कारण तुमचे दुःख कोणीही कमी करू शकत नाही. उलट लोक त्याचा गैरफायदा घेऊ शकतात किंवा तुमची चेष्टा करू शकतात.

प्रेमाचे नाते ठेवण्याचा प्रयत्न करा

पती-पत्नीचे नाते प्रेमाचे असते. दोघांनीही आयुष्याच्या प्रत्येक प्रसंगात एकमेकांना पूर्ण साथ दिली पाहिजे. पण जर तुमचा जीवनसाथी नेहमी रागावलेला असेल, नीट वागत नसेल, त्याच्या चेहऱ्यावर तिरस्काराची भावना दिसत असेल, तर असा जीवनसाथी कुटुंबात विभक्त होण्याचे दुःखाचे कारण बनते. अशा नात्यापासून दूर राहणे चांगले.

घरातील गोष्टी बाहेरच्या लोकांना सांगू नका

आचार्य चाणक्य नेहमीच सांगतात की, आपल्या कुटुंबातील काही गोष्टी कधीच बाहेरच्या लोकांना सांगू नयेत. जेव्हा संधी मिळते तेव्हा बाहेरचे लोक या परिस्थितीचा फायदा घेऊन तुमच्या घरातच समस्या निर्माण करतात. यामुळेच आपल्या जवळच्या व्यक्तीला देखील घरातील गोष्टी सांगणे टाळाच.

समाजामध्ये चांगले काम करा

आचार्य चाणक्य यांच्या मते, व्यक्तीने समाजात ते काम केले पाहिजे, ज्यामुळे समाजात त्याचा मान-सन्मान वाढतो. आदर हा माणसाचा रत्न आहे. जो तो सत्कर्म करूनही मिळवू शकतो. ते नेहमी सुरक्षित ठेवले पाहिजे. यामुळे नेहमी चांगले काम करा. तुम्हाला मान-सन्मान आपोआप मिळेलच.

संबंधित बातम्या : 

Shani Pradosh : आज वर्षातील पहिला प्रदोष, जाणून घ्या पूजेची पद्धत आणि महत्त्व!

15 January 2022 Panchang |15 जानेवारी 2022 शनिवारचे पंचांग, ​​शुभ मुहूर्त आणि राहुकाळ


Published On - 10:08 am, Sat, 15 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI