उद्या मंगळ करणार धनु राशीत प्रवेश, या 3 राशींना होणार धनलाभ!

मकर संक्रांतीच्या दिवशी (Sagittarius) सूर्याने धनु  राशीतून मकर राशीत प्रवेश केला आहे. 16 जानेवारीला ग्रहांचा अधिपती मंगळ देखील आपली राशी बदलणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार (Mars Transit)  जेव्हा एखादा ग्रह आपली राशी बदलतो. तेव्हा इतर राशींवरही त्याचा परिणाम होतो.

उद्या मंगळ करणार धनु राशीत प्रवेश, या 3 राशींना होणार धनलाभ!
राशी भविष्य

मुंबई : मकर संक्रांतीच्या दिवशी (Sagittarius) सूर्याने धनु  राशीतून मकर राशीत प्रवेश केला आहे. 16 जानेवारीला ग्रहांचा अधिपती मंगळ देखील आपली राशी बदलणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार (Mars Transit)  जेव्हा एखादा ग्रह आपली राशी बदलतो. तेव्हा इतर राशींवरही त्याचा परिणाम होतो. मंगळ हा जमीन, इमारत, वाहन, यंत्रणा, अग्नि, बल, पौरुष, उर्जा आणि धैर्य यांचा कारक मानला जातो.

16 जानेवारी रोजी मंगळ धनु राशीत प्रवेश करेल. शुक्र आधीच धनु राशीत आहे. अशा स्थितीत धनु राशीमध्ये मंगळ आणि शुक्राचा संयोग होईल. असे मानले जाते की, मंगळचे हे संक्रमण तीन राशींसाठी शुभ आहे. यामुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल होतील आणि धन लक्ष्मीचा आशीर्वादही मिळू शकतो. अशा परिस्थितीत त्यांची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होण्याची देखील शक्यता आहे.

मेष

मंगळाचे हे संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी खूप भाग्यवान सिद्ध होऊ शकते. तुमची सर्व कामे, जी पूर्ण करण्यासाठी तुम्ही खूप दिवसांपासून प्रयत्न करत आहात ती या काळामध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत पद आणि दर्जा वाढू शकतो. यासोबतच धनलाभही होईल.

मिथुन

मंगळाच्या बदलामुळे मिथुन राशीच्या लोकांसाठीही आनंद मिळेल. नोकरी असो वा व्यवसाय, दोन्ही प्रकारे तुम्हाला फायदा होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या पाठीशी असतील. या संधीचा फायदा उठवला तर मोठे पदही मिळू शकते. जर तुम्हाला नवीन काम सुरू करायचे असेल तर 16 जानेवारीनंतरचा काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे.

मीन

मीन राशीवरही मंगळचा खूप प्रभाव राहील. दरम्यान, तुम्हाला तुमच्या मेहनतीनुसार पूर्ण फळ मिळेल. कामाच्या ठिकाणी कोणतीही मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर त्यासाठीही हा काळ योग्य राहील. आर्थिक लाभ मिळविण्यासाठी योग्य दिशेने केलेले प्रयत्न यशस्वी होतील.

(येथे दिलेली माहिती ही धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

संबंधित बातम्या : 

Rashifal : पैशांचे व्यवहार करताना ‘या’ राशीच्या लोकांनी काळजी घेण्याची गरज!

Shani Pradosh Vrat Katha : प्रदोष काळात पूजेच्या वेळी ही व्रत कथा वाचा, जाणून घ्या याबद्दल!


Published On - 2:29 pm, Sat, 15 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI