Guruwar Upay: गुरुवारी केलेल्या ‘या’ उपायांनी आर्थिक स्थिती होते मजबूत, रखडलेले कामही लागते मार्गी

बऱ्याचदारखडलेली कामं काही केल्या मार्गी लागत नाही. अशा वेळी गुरुवारच्या दिवशी केलेल्या काही उपायांनी फायदा होतो.

Guruwar Upay: गुरुवारी केलेल्या 'या' उपायांनी आर्थिक स्थिती होते मजबूत, रखडलेले कामही लागते मार्गी
भगवान विष्णू Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Nov 30, 2022 | 6:26 PM

मुंबई,   धार्मिक मान्यतेनुसार गुरुवार हा भगवान विष्णूचा (Vishnu) दिवस मानला जातो. या दिवशी भगवान विष्णूची विशेष पूजा केली जाते. भगवान विष्णूला जगाचा पालनकर्ता देखील म्हटले जाते. भगवान विष्णूच्या आशीर्वादाने सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते. हिंदू धर्मग्रंथांमध्ये गुरुवारचा दिवस विशेषत: संपत्ती आणि समृद्धीसाठी मानला जातो. गुरुवार हा भगवान विष्णूची पूजा करण्यासाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, गुरुवारी भगवान विष्णूची विधिवत पूजा केल्याने मनुष्याचे जीवन आनंदाने भरून जाते. नशीब साथ देत नसेल किंवा कोणतीही अडचण येत असेल तर गुरुवारी काही सोपे उपाय ((Guruwar Upay) केल्यास तुमच्या अडचणी दूर होऊ शकतात.

गुरुवारला बृहस्पतीवार देखील म्हणतात. गुरु हा महत्त्वाचा ग्रह आहे. बृहस्पतिला देवांचा गुरू देखील म्हणतात. धार्मिक ग्रंथांमध्ये बृहस्पती देवाच्या उपासनेचे अनेक मार्ग आहेत. जे केल्याने तुमच्या कुंडलीतील बृहस्पति बलवान होईल आणि तुमची सर्व रखडलेली कामं पूर्ण होतील.

चला तर मग जाणून घेऊया गुरुवारच्या या उपायांबद्दल…

गुरुवारचे उपाय

हे सुद्धा वाचा
  • ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करावे.
  • स्नानाच्या वेळी ‘ओम बृहस्पते नमः’ चा जप करावा.
  • गुरूचा कोणताही दोष दूर करण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून गुरुवारी स्नान करावे.
  • यासोबतच स्नान करताना “ओम नमो भगवते वासुदेवाय” या मंत्राचा जप करावा.
  • गुरुवारी व्रत ठेवा आणि जल अर्पण करून केळीच्या रोपाची पूजा करा. असे केल्याने वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात आणि जर तुम्ही विवाहित असाल तर तुमच्या वैवाहिक जीवनात कोणतीही अडचण येणार नाही.
  • आंघोळीनंतर पिवळ्या रंगाचे कपडे घाला.
  • स्नानानंतर भगवान विष्णूच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावावा.
  • भगवान विष्णूला पिवळ्या रंगाच्या फुलांसह तुळशीचे छोटे पान अर्पण करा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.