AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

halhari amavasya 2022: हलहारी अमावास्येला करा ‘हे’ उपाय; पितृदोष होईल दूर

हिंदू धर्मात प्रत्येक व्रत आणि सणाला विशेष महत्त्व आहे आणि त्यांच्याशी संबंधित नियमांचे पालन करून लोक देवी-देवतांना प्रसन्न करतात. हिंदू दिनदर्शिकेनुसार पौर्णिमेप्रमाणे प्रत्येक महिन्यात अमावस्या येते. अमावस्या ही पूर्वजांशी म्हणजेच पितरांशी संबंधित मानली जाते. या दिवशी पितरांच्या नावे दान ह्दर्मे केल्या जाते. सध्या आषाढ महिना सुरू झाला असून त्यातच ही हलहारी अमावस्या (Halhari Amavasya 2022) […]

halhari amavasya 2022: हलहारी अमावास्येला करा 'हे' उपाय; पितृदोष होईल दूर
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jun 19, 2022 | 4:52 PM
Share

हिंदू धर्मात प्रत्येक व्रत आणि सणाला विशेष महत्त्व आहे आणि त्यांच्याशी संबंधित नियमांचे पालन करून लोक देवी-देवतांना प्रसन्न करतात. हिंदू दिनदर्शिकेनुसार पौर्णिमेप्रमाणे प्रत्येक महिन्यात अमावस्या येते. अमावस्या ही पूर्वजांशी म्हणजेच पितरांशी संबंधित मानली जाते. या दिवशी पितरांच्या नावे दान ह्दर्मे केल्या जाते. सध्या आषाढ महिना सुरू झाला असून त्यातच ही हलहारी अमावस्या (Halhari Amavasya 2022) येणार आहे. ही अमावस्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची मानल्या जाते. हा दिवस हलाहरी अमावस्या म्हणूनही ओळखला जातो. यावेळी आषाढ  किंवा हलाहरी अमावस्या 28 जून रोजी येत आहे. जाणून घेऊया मुहूर्त कोणता आहे, कोणते उपाय करता येतील आणि त्याचा शेतकऱ्यांशी काय संबंध आहे.

शेतकऱ्यांसाठी आषाढ अमावास्याचे महत्त्व

या दिवशी शेतकरी आपल्या शेताची आणि  पिकाची पूजा करतात. निसर्गाची कृपा कायम राहावी असा या मागचा उद्देश असतो. या दिवशी अनेक शेतकरी बैलांकडून काम करून घेत नाही. त्यांना गवत किंवा इतर गोष्टी चरण्यासाठी मोकळे सोडा. हलहरी अमावस्येच्या दिवशी शेतकरीही आपल्या कृषी साधनांची पूजा करतात.  पावसाळ्याशी त्याचा संबंध असल्याने शेतकऱ्यांसाठी या अमावास्येचे महत्त्व खूप जास्त असते.

या दिवशी करा हे उपाय करा

1. पीक वाढवणे हे शेतकऱ्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.  या दिवशी अनेक शेतकरी पेरणीला सुरवात करतात. सध्या पाऊस मुबलक झाला नसल्याने पेरणीला अजून वेळ आहे. मात्र शास्त्र म्हणून या दिवशी ज्याचे पीक घ्यायचे आहे त्याची किमान 5 रोपं लावावी आणि त्याची काळजी घ्यावी.

2. पितरांना प्रसन्न करण्यासाठी, त्यांच्या नावाचे पान गाईला लावावे.  या दिवशी दान केल्याने  अधिक पूण्य मिळते. यामुळे पितरच नव्हे तर देवताही प्रसन्न होतात.

3. या दिवशी तुम्ही कावळ्यांनाही खाऊ शकता. घरामध्ये पितरांना अर्पण केलेल्या नैवेद्याचा छोटासा भाग गच्चीवर ठेवा. यामुळे तुमच्या जीवनातील पितृदोष दूर होईल.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?