दाराला तोरण लावताना तोरणात आंब्याची किती पाने असणे शुभ मानले जाते?
घराच्या मुख्य दारावर आंब्याच्या पानांचे तोरण लावणे अत्यंत शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार, घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धीसाठी तोरण लावले पाहिजे, पण या तोरणात आंब्याच्या पानांची संख्या नक्की किती असावी हे देखील तेवढीच महत्त्वाची असते. चला तर मग जाणून घेऊयात की तोरणात आंब्याच्या पानांची संख्या किती असावी?

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तोरण लावण्याची परंपरा खूप जुनी आहे. कोणताही सण असेल किंवा कोणताही शुभ प्रसंग असेल तेव्हा घर सजवण्यासोतच घराच्या समोर रांगोळी आणि दारावर तोरण हे लावले जातेच. काहीजण दाराला झेंडुच्या फुलांचे तोरण लावतात तर काहीजण आंब्याच्या पानांचे तोरण लावतात. पण शक्यतो दाराला आंब्याच्या पानांचे तोरण लावणे शुभ मानले जाते. पण अनेकांना हे माहित नसते की तोरण लावताना त्यात नक्की किती आंब्याची पाने असावीत? चला जाणून घेऊयात.
जर तुम्ही सणासुदीच्या काळात घरी आंब्याच्या पानाचे तोरण लावण्याचा विचार करत असाल तर त्यासंबंधित वास्तु टिप्स जाणून घेऊयात. तोरणात किती आंब्याची पाने असावीत हे जाणून घेऊयात. वास्तुशास्त्रात घरात सकारात्मक ऊर्जा आणणाऱ्या अनेक गोष्टींचे वर्णन केले जाते. लोक सामान्यतः मुख्य प्रवेशद्वारावर कृत्रिम आणि डिझाइनर तोरण लावणे पसंत करतात.
आंब्याच्या पानांचे तोरण लावणे शुभ मानले जाते
पण सणांच्या दिवशी तरी दारावार खऱ्या आंब्याच्या पानांचे तोरण लावणे शुभ मानले जाते आणि ते खूप सकारात्मक ऊर्जा घेऊन जाते. हिंदू धर्मात, शुभ प्रसंगी किंवा सणांच्या वेळी घरात आंब्याच्या पानाचे तोरण लटकवणे शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार, तोरण केवळ सकारात्मकता आणत नाही तर घराचे शुद्धीकरण देखील करते. जर तुम्ही तीज सणाच्या वेळी तोरण लावण्याचा विचार करत असाल तर ते नक्कीच आंब्यांच्या पानांचे आसावेत पण तोरणात एका विशिष्ट संख्येतच ही पाने असावी.
तोरणात किती आंब्याची पाने असावीत?
वास्तुशास्त्रानुसार, तोरणात वापरायची आंब्याच्या पानांची संख्या ही शास्त्रानुसार 5, 7, 11 आणि 21 असावी. ही संख्या शुभ मानली जाते. आंब्याच्या पानांपासून बनवलेल्या तोरणाचे अनेक फायदे आहेत जे जाणून घेऊयात. सर्वप्रथम, ते हवा शुद्ध करते. त्याच वेळी, त्याचा प्रत्येक रंग मनाला शांती देतो, ज्यामुळे तणाव कमी होतो. अशा परिस्थितीत आंब्याच्या पानांपासून बनवलेले तोरण मानसिक शांती प्रदान करते. घराचे सौंदर्य वाढवण्यासोबतच ते वाईट नजरेपासून देखील संरक्षण करते. तसेच आंब्यांच्या पानांमुळे सकारात्मकता घरात प्रवेश करते. तसेच माता लक्ष्मीच्या पूजेतही आंब्याची पाने जरूर वापरली जातात.
दिवाळीत हे काम नक्की करा
दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावस्येच्या दिवशी दिवाळी साजरी केली जाते. या काळात घराभोवती आंब्याच्या पानांचे तोरण लावण्याची परंपरा आहे. मुख्य दारावर हे तोरण लावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि त्यामुळे घरात एक स्पष्ट पवित्रता येते असे मानले जाते. जर तुम्हाला रोज दारावर आंब्याच्या पानांचे तोरण लावणे आवडत असेल तर ते वेळोवेळी बदलत राहणे म्हहत्त्वाचे आहे. पाने सुकताच ते तोरण काढून टाकावे. तसेच शक्यतो घराच्या मुख्यप्रवेशदारावर खोट्या फुलांचे किंवा पानांचे तोरण लावणे टाळावे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
