
वास्तूशास्त्रात प्रत्येक वस्तूंबद्दल,घराच्या दिशांबद्दल सांगण्यात आलं आहे. त्याबद्दल अनेक नियम सांगण्यात आले आहेत. वास्तूशास्त्रातील या नियमांचे पालन केले तर आपल्याला त्याचे सकारात्मक परिणाम मिळतात. असे मानले जाते की तुमच्या घरात वास्तु तत्वांचे पालन केल्याने सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो. ज्यामुळे शांती आणि आनंदाचे वातावरण निर्माण होते. या संदर्भातअशीच एक गोष्ट ज्यामुळे घरातील वातावरणावर परिणाम होतो. ती वस्तू म्हणजे घड्याळ.
घड्याळ आपल्या घरातील वातावरणावर, आयुष्यावर अनेकरुपी परिणामकारक ठरतात
होय, घड्याळ आपल्या घरातील वातावरणावर, आपल्या आयुष्यावर अनेकरुपी परिणामकारक ठरत असतात. वास्तूशास्त्रानुसार घडाळ्याची दिशा, रंग तसेच त्यातील नंबर या सगळ्यांचा कुठेना कुठे परिणाम होत असतो. पण यात अजून एक गोष्ट म्हणजे घरातील घडाळ्याची संख्या. कारण काहींच्या घरात एकापेक्षा जास्त घड्याळ असतात. पण त्याबाबतीतले काही नियम असतात जे फार कमी जणांना माहित असतात. यामुळे काही अशुभ परिणाम होऊ शकतात. याबद्दलचे नियम काय आहे ते जाणून घेऊयात.
घरात घड्याळांची संख्या किती असावी?
वास्तुशास्त्र असे म्हटले जाते की एका घरात एकापेक्षा जास्त घड्याळ लावता येतात. परंतु काही वास्तु नियमांचे पालन केले पाहिजे जेणेकरून तुम्हाला वास्तुदोषांचा सामना करावा लागू नये. म्हणून, तुम्ही काही महत्त्वाचे वास्तु नियम निश्चितपणे लक्षात ठेवले पाहिजेत. प्रत्येक खोलीत एक घड्याळ लावता येऊ शकते परंतु ते एकाच ठिकणी एकापेक्षा जास्त नसावीत.
घड्याळ लावण्याची योग्य दिशा कोणती?
तुम्ही तुमच्या घराच्या उत्तर दिशेला घड्याळ लावू शकता. वास्तुशास्त्रात ही दिशा शुभ मानली जाते . ती प्रगती आणि संपत्तीशी संबंधित असते. पूर्व आणि पश्चिम दिशेला घड्याळ लावणे देखील शुभ मानले जाते. तथापि, तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला घड्याळ लावणे टाळा. कारण यामुळे नकारात्मक प्रभाव वाढू शकतो.
या गोष्टी नक्की लक्षात ठेवा
वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की घरात कधीही तुटलेले, बंद पडलेले घड्याळ ठेवू नये. यामुळे दुर्दैव वाढू शकते. त्यामुळे घड्याळ बंद पडले असेल तर ते दुरुस्त करावे आणि तुटले असेल तर शक्यतो ते घरात ठेवू नये.
गोल आकाराचं घड्याळ उत्तम पर्याय
याव्यतिरिक्त, तुमच्या घरात वेगवेगळ्या वेळा दाखवणारे अनेक घड्याळे असणे देखील अशुभ मानले जाते. यामुळे ताण वाढू शकतो. मुख्य दरवाजासमोर घड्याळ लावणे देखील अशुभ मानले जाते. तथापि घड्याळाचा आकार हा कोणताही असला तरी त्याची काही अडचण नाही. पण सगळ्यात गोल घड्याळ हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)