AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

झोपताना कोणत्या दिशेला पाय करू नये? जाणून घ्या वास्तुशास्त्राचे नियम

घराच्या चार भिंतीमध्ये राहताना अनेकदा कलह आणि त्रासाला सामोरं लागतं. चुकीच्या दिशेला असलेल्या काही गोष्टींमुळे त्रास होतो असं वास्तुशास्त्र सांगतं. त्यामुळे घरात वस्तू ठेवताना आणि खासकरून रात्री झोपताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. वास्तुशास्त्रात याबाबत नियम सांगितले आहे. रात्री झोपताना पाय कोणत्या दिशेला असावेत याबाबतही सांगितलं आहे.

झोपताना कोणत्या दिशेला पाय करू नये? जाणून घ्या वास्तुशास्त्राचे नियम
| Updated on: Feb 03, 2025 | 5:53 PM
Share

हिंदू धर्मात वास्तुशास्त्राचं महत्त्व अधोरेखित केलं गेलं आहे. घर बांधण्यापासून कोणत्या वस्तू कुठे ठेवाव्यात याबाबत सांगितलं गेलं आहे. वास्तुशास्त्रानुसार घर असेल तर जीवना अडचणी येत नाहीत, असं सांगितलं जातं. रात्री झोपही नीट लागते. पण अनेकदा घर वास्तुशास्त्रानुसार असूनही चुकीच्या दिशेला पाय आणि डोकं करून झोपल्यास त्रास सहन करावा लागू शकतो. अनेकदा रात्री नीट झोप लागत नाही. विनाकारण काही ना काही विचार मन खात असतात. अशा स्थितीत रात्री निवांत झोप लागणं कठीण असतं. वास्तुशास्त्रानुसार, काही नियमांचं पालन केल्यास या अडचणी काही प्रमाणात कमी होऊ शकतात. रात्री झोपताना कायम पाय उत्तरेकडे आणि डोकं दक्षिणेकडे असावं. जर तुम्ही उलट झोपलात तर त्याचे वाईट अनुभव येतात. म्हणजेच दक्षिणेकडे पाय आणि उत्तरेकडे डोकं करून झोपू नये. वास्तुशास्त्रानुसार झोपताना पूर्व किंवा दक्षिण दिशेला पाय करून झोपू नये. असं झोपल्यास आरोग्यविषयक तक्रारींचा सामना करावा लागू शकतो.

वास्तुशास्त्रानुसार दक्षिण किंवा पूर्व दिशेला डोकं करून झोपणं कधीही चांगलं मानलं गेलं आहे. म्हणजेच पाय हे उत्तर किंवा पश्चिम दिशेला असावेत. अशा पद्धतीने झोपल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम लाभतं. कोणत्याही गोष्टीचं झोपताना विनाकारण टेन्शन येत नाही. दक्षिण आणि पूर्व दिशेला डोकं करून झोपल्यास व्यक्तीचं आयुष्य वाढतं. शारीरिक आणि मानसिक तणावातून दिलासा मिळतो. दुसरीकडे, दक्षिण आणि पूर्व दिशेला पाय करून झोपल्यास अशुभ मानलं जातं. यामुळे डोक्याला योग्य पद्धतीने रक्तपुरवठा होत नाही असं मानलं जातं.

दक्षिण ही यमाची दिशा आहे. मृत व्यक्तीला दक्षिणेकडे पाय करून ठेवतात. स्मशानातही अशाच पद्धतीने ठेवलं जातं. त्यामुळे घरात अशा पद्धतीने झोपणं योग्य नसल्याचं वास्तूतज्ज्ञांचं म्हणणं आहे. या उलट दक्षिण दिशेला डोकं करून झोपल्यास सुख समृद्धी प्राप्त होते. तर या दिशेला पाय करून झोपल्यास आरोग्यावर परिणाम करते. तसेच धन हानी, मृत्यू आणि आजाराचं भय राहतं.

Follow Us
पुण्यात धो धो धो...मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं; सगळीकडे बरसल्या सरी!
पुण्यात धो धो धो...मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं; सगळीकडे बरसल्या सरी!.
petrol shortage | थेट कोयता, तलवार घेऊन... पेट्रेल पंपावर मोठा राडा...
petrol shortage | थेट कोयता, तलवार घेऊन... पेट्रेल पंपावर मोठा राडा....
राज्यात SIR कसे राबवले जाणार, कोणती कागदपत्रे द्यायची? निवडणूक आयोग...
राज्यात SIR कसे राबवले जाणार, कोणती कागदपत्रे द्यायची? निवडणूक आयोग....
कॉकरोच जनता पार्टीच्या अध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी, देशभरात मोठी..
कॉकरोच जनता पार्टीच्या अध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी, देशभरात मोठी...
ती मोठी चूक झाली, ठाकरेंच्या जाहीर विधानाची चर्चा; त्या नेत्याबद्दल...
ती मोठी चूक झाली, ठाकरेंच्या जाहीर विधानाची चर्चा; त्या नेत्याबद्दल....
119 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी CBI ची धडक कारवाई, या 7 ठिकाणी...
119 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी CBI ची धडक कारवाई, या 7 ठिकाणी....
राजकारणात खळबळ! महायुतीत शीतयुद्ध सुरू? बडा नेता थेट म्हणाला...
राजकारणात खळबळ! महायुतीत शीतयुद्ध सुरू? बडा नेता थेट म्हणाला....
निवडणुकीची तारीख जाहीर, मात्र सुनेत्रा पवारांच्या जागी कुणाची वर्णी...
निवडणुकीची तारीख जाहीर, मात्र सुनेत्रा पवारांच्या जागी कुणाची वर्णी....
मनोज जरांगे-प्रसाद लाड यांच्यातील चर्चा LIVE, जरांगेंचं थेट उत्तर...
मनोज जरांगे-प्रसाद लाड यांच्यातील चर्चा LIVE, जरांगेंचं थेट उत्तर....
एकच खळबळ! पेपरफुटी झालीच नाही, परीक्षा रद्द करण्याचं कारण...NEET पेपर
एकच खळबळ! पेपरफुटी झालीच नाही, परीक्षा रद्द करण्याचं कारण...NEET पेपर.