नवरात्रीत लसूण आणि कांदा खाणे पाप आहे का? प्रेमानंद महाराजांनी काय सांगितले?
अनेकांच्या मते कांदा लसूण खाण्यावरून अनेक प्रश्न निर्माण होत असतात. काहींना आता नवरात्राबाबत देखील असेच प्रश्न पडले आहेत की, नवरात्रात कांदा-लसूण खाऊ शकतो का? किंवा कांदा लसूण खाऊनही देवीची आराधना करू शकतो का? तर यावर प्रेमानंद महाराजांनी काय सांगितलं आहे ते जाणून घेऊयात.

22 सप्टेंबरपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. देशभरात शारदीय नवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अनेक वर्षांनंतर यंदाचे नवरात्र हे 10 दिवसांचे असणार आहेत. शारदीय नवरात्रीची सुरुवात आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला झाली तसेच दशमी तिथीला उपवास सोडल्यानंतर संपेल. या काळात अनेक भाविक उपवास करतात. मांस आणि मद्यपानही टाळतात. अनेकजण पूर्णपणे अनवानी चालतात. बरेच जण लसूण आणि कांदा खाणे देखील सोडून देतात. कारण त्यांच्यामते देवीच्या उपासनेत कांदा, लसूण खाल्ला जात नाही.
खरोखरंच नवरात्रीत लसूण आणि कांदे खाणे पाप असते का?
पण खरोखरंच नवरात्रीत लसूण आणि कांदे खाणे पाप असते का? तसेच ते खाल्ल्यानंतर देवीची सेवा करू शकत नाही का? असे प्रश्न अनेकांना पडतात. अनेकांना याबाबत संभ्रम असतात. याबद्दल प्रेमानंद महाराजांनी काय सांगितलं आहे ते जाणून घेऊयात.
लसूण आणि कांदे खाल्ल्यावरही देवीची पूजा करू शकतो? प्रेमानंद महाराजांनी काय सांगितले?
प्रेमानंद महाराजांशी एका संभाषणात एका भक्ताने विचारले कील श्रावण, नवरात्र इत्यादी पवित्र सणांमध्ये लसूण आणि कांदा खाणे पाप आहे का? यावर उत्तर देताना प्रेमानंद महाराज म्हणाले की, “संत आणि ऋषींना लसूण आणि कांदा खाण्यास मनाई असते. कारण त्यांच्या सेवनाने तमोगुण वाढतो, ज्यामुळे जप, तप आणि ध्यानात अडथळे निर्माण होतात. लसूण आणि कांदा खाणे पाप नाही, कारण ते बटाट्यांसारख्या इतर भाज्यांसारखेच पिकवले जातात. परंतु त्यांच्या वेगळ्या स्वरूपामुळे, ते साधकांसाठी आणि जप आणि तप करणाऱ्यांसाठी निषिद्ध मानले जातात. त्याचप्रमाणे, ज्यांनी दीक्षा घेतली आहे त्यांनी देखील त्यांचे सेवन करू नये.”
प्रेमानंद महाराज पुढे म्हणाले की, “जर कोणी लसूण आणि कांदा खाल्ला असेल तरी तो देवी दुर्गाची सेवा करू शकतो, परंतु देवीला अर्पण केलेल्या नैवेद्यात लसूण आणि कांदा वापरलेला नसावा.”
‘राधा-राधा जप करा आणि मग तो कांदा खा’
प्रेमानंद महाराजांचा आणखी एक व्हिडिओ आहे ज्यामध्ये एक भक्त विचारताना दिसत आहे की ‘जेव्हा शाळेतील मुले कुठेतरी भेट देण्यासाठी बाहेर जातात तेव्हा त्यांना तिथे कांदा-लसूण जेवण मिळते. पण आम्हालाही त्या मुलांसोबत जाण्याची, तेथील पदार्थ खाण्याची इच्छा असते, पण आम्हाला कधीच बाहेरून जेवण मिळत नाही. तेव्हा काय करावं?” यावर उत्तर देताना महाराज म्हणाले की, “अशा परिस्थितीत, उपाशी राहू नका, राधा-राधा जप करा आणि मग तो कांदा खा. कांदा देखील थोडं प्रेम निर्माण करतो आणि म्हणूनच संतांनी ते निषिद्ध केले आहे कारण आपल्याला तमोगुण सोडून सत्वगुण बनून भजन करावे लागते. म्हणून, कांदा खाणे पापकर्म नाही.”
“सैन्यात, व्यवसायात किंवा अभ्यासात असलेल्यांना सूट आहे.”
महाराजांनी उदाहरण देत पुढे सांगितले की, “सैन्यात, व्यवसायात किंवा अभ्यासात असलेल्यांना सूट आहे. साधू, महात्मा आणि ईश्वराच्या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना कांदा आणि लसूण खाण्यास मनाई आहे. जरी हे दारू, मासे किंवा मांसासारखे पाप मानले जात नसले तरी, ते मूळतः तामसिक आहेत आणि भक्ती पद्धतींच्या विरुद्ध भावना निर्माण करतात. म्हणून, ते निषिद्ध मानले जातात” असंही महाराजांनी म्हटलं आहे.
कांदा, लसूण खाण्यावरून त्या व्यक्तिशी भांडण करू नये
दरम्यान महाराज पुढे असंही म्हणाले की ज्यांची इच्छा होतच असेल तर त्यांनी ते खावे. कारण कौटुंबिक जीवनात, कुटुंबातील सदस्य अनेकदा कांदा आणि लसूण खातात. अशा परिस्थितीत, भक्तीवरून किंवा कांदा, लसूण खाण्यावरून त्या व्यक्तिशी भांडण करणे हा उपाय नाही. आणि तसे करणे योग्यही मानले नाही. पण यावर उफाय काढायचाच असेल तर तुम्ही स्वयंपाकघरात सर्वांसाठी एकच पदार्थ बनवण्याची विनंती करू शकता. तसेच कोणाला जर देवाला नैवेद्य दाखवताना कांदा- लसूण घालणे योग्य वाटत नसेल तर देवाला दाखवण्यासाठी वेगळे जेवण तुम्ही बनवू शकता.”
दीक्षा घेतल्यानंतर कांदा- लसूण खाण्याबाबत काही नियम बदलतात
तसेच दीक्षा घेतल्यानंतर काय नियम पाळावे लागतात याबद्दलही प्रेमानंद महाराजांनी सांगितले आहे. ते म्हणतात की, ” दीक्षा घेतल्यानंतर, हा नियम आणखी कडक होतो. दीक्षा घेतल्यानंतर तुम्ही आता कांदा किंवा लसूण खाऊ नये. कारण तुम्ही हरीची भक्ती करण्याची प्रतिज्ञा घेतली आहे. तथापि, ज्यांना मुले आहेत किंवा नोकरी करतात त्यांच्यासाठी हे पाप नाही. त्यांनी राधा-राधेचा जप करावा आणि परिस्थितीनुसार विवेकपूर्ण वागावे. ज्यांनी आधीच दीक्षा घेतली आहे त्यांच्यासाठी नियम अधिक कडक आहे. त्यांनी कांदा आणि लसूण खाणे टाळावे.”
