एकाच वेळी जास्त घड्याळे असणे चांगले की वाईट ? वास्तूशास्र काय म्हणते ?

जर तुमच्या घरात घड्याळे असतील तर त्यांची संख्या, दिशा आणि वेळ यावर थोडे लक्ष देणे गरजेचे आहे. योग्य प्रकारे लावलेली घड्याळे केवळ वेळ दाखवण्याचे काम करत नाहीत तर घराची प्रगती आणि शांततेतही योगदान देतात.

एकाच वेळी जास्त घड्याळे असणे चांगले की वाईट ? वास्तूशास्र काय म्हणते ?
| Updated on: Sep 17, 2025 | 10:38 PM

वास्तूशास्र एक परंपरा नसून एक महत्वाचे शास्र आहे. त्यामुळे जीवनात चांगले घडण्यास मदत मिळते. मग घर सजवणे असो वा फर्निचर लावले असो यात जर वास्तू शास्राला नजरअंदाज केले तर जीवनात अडचणी येतात. अनेकदा आपण विचार करतो कोणतीही छोटी गोष्ट काय परिणाम करणार, परंतू घरात ठेवलेले घड्याळ देखील आपला विचार, माहोल आणि प्रगतीला अडसर ठरू शकते. आजकाल घरात अनेक घड्याळे असणे सर्वसाधारण गोष्ट आहे. परंतू याची दिशा, स्थिती आणि संख्या देखील घरातील पॉझिटीव्ह एनर्जीवर प्रतिकूल परीणाम घडवू शकते. चला तर पाहूयात वास्तूशास्रानुसार काय योग्य आहे ?

एकाच वेळी जास्त घड्याळे चांगले की वाईट ?

अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न असतो की घरात एकाच वेळी अनेक घड्याळे असणे चांगले आहे का ? याचे थेट उत्तर हा आहे. परंतू काही बाबींची काळजी घ्यावी लागते. जर सर्व घड्याळे योग्य वेळ दाखवत असतील आणि चांगल्या स्थितीत असतील तर काही समस्या नाही. परंतू जर एखादे घड्याळ बिघडले असेल तर आणि वेगळी वेळ दाखवत असेल तर हे मानसिक तणाव आणि व्यत्ययाचे कारण बनू शकते.

योग्य वेळ दाखवणं का गरजेचे ?

वास्तू शास्रानुसार घड्याळात वेळ योग्य दाखवणे खूप गरजेचे असते. थांबलेले घड्याळ किंवा मागे पडलेले घड्याळ एक प्रकारे घराची प्रगथी थांबवते. अशी घड्याळ पाहून व्यक्तीचे मन देखील उदास आणि चिंताग्रस्त होते. त्यामुळे जेवढी घरात घड्याळे आहेत त्यांना तपासून ती दुरुस्त करायला हवीत. जर एखादे घड्याळ योग्य वेळ दाखवत नसेल तर दुरुस्त तरी करावे किंवा हटवावे.

कोणत्या दिशेला घड्याळ लावावे ?

घड्याळाच्या दिशेची निवड विचार करुन करावी, वास्तूशास्रानुसार खालील नियम पाळावे…

उत्तर दिशा : यास सर्वात शुभ मानले जाते. ही दिशा प्रगती आणि धनाशी संबंधित असते.

पूर्व दिशा: ही दिशा शिक्षण आणि सकारात्मक विचार वाढवते

पश्चिम दिशा: ही घराची स्थिरता आणि शांतता कायम राखते

दक्षिण दिशा: या दिशेला घड्याळ लावू नये, कारण ही दिशा अशुभ मानली जाते.

किती घड्याळ असावीत ?

घड्याळाच्या संख्येबाबत कोणता कठोर नियम नाही. परंतू जास्त घड्याळे बाळगण्यापासून दूर असावे, प्रत्येक खोलीत एक घड्याळ असले तरी चालेल, परंतू ते योग्य दिशेला लावलेले असावे आणि योग्य वेळ दाखवत असलेले असावे, बंद पडलेले नसावे. जास्त घड्याळे लोकांना भ्रमित करु शकतात. यामुळे मानसिक ताण वाढू शकतो.