महिलांच्या शरीराच्या या भागांवर तीळ असणे म्हणजे भाग्यवान
शरीरावरील तीळ त्या व्यक्तीचे भविष्य आणि व्यक्तिमत्व दर्शवतात. सामुद्रिक शास्त्रानुसार, महिलांच्या शरीराच्या काही ठराविक भागांवर तीळ असणे हे अत्यंत शुभ मानले जाते. अशा स्त्रिया भाग्यवान मानल्या जातात. महिलांच्या शरीरावरील शुभ तीळांबद्दल जाणून घेऊयात.

बऱ्याचदा आपण हे ऐकलं असेल की शरीरावरील तीळ किंवा एखादी खून हे शुभ-अशुभ संकेताशी जोडली जाते. विशेष: महिल्यांच्या अंगावरील तीळाबद्दल तर नक्कीच अनेक संकेत मानले जातात. अनेकदा असे मानले जाते की शरीरावर अशा ठिकाणी तीळ असतात जिथे योग्यरित्या रक्ताभिसरण होत नाही आणि त्यामुळे तिथे काळे डाग तयार होतात. पण सामुद्रिक शास्त्रानुसार, शरीरात असलेले तीळ आपल्या भविष्याबद्दल आणि व्यक्तिमत्त्वाबद्दल बरीच माहिती देतात. त्याचप्रमाणे महिलांच्या शरीरावर काही ठिकाणी तीळ असणे बऱ्याच शुभ-अशुभ गोष्टींचे संकेत देत असतात. तसेत काही वेळेला त्यांना भाग्यवानही म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, पुरुष आणि महिलांच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांवरील तीळांचे महत्त्व वेगवेगळे असते. महिलांच्या शरीरावरील शुभ तीळांबद्दल जाणून घेऊयात.
महिलांच्या शरीराच्या या भागांवर तीळ असणे अत्यंत भाग्यवान मानलं जातं.
कपाळावर तीळ : जर घरातील एखाद्या महिलेच्या कपाळावर तीळ असेल तर ते सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. असे म्हटले जाते की अशा महिला कोणत्याही घरात गेल्यास त्या सौभाग्य आणतात आणि समृद्धीचे मार्ग उघडतात.
मानेवर तीळ : ज्या महिलांच्या मानेवर तीळ असतो त्या संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक असतात. अशा महिलांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही, ते त्यांच्या जोडीदाराला समृद्धी देतात आणि आर्थिक समस्या येत नाही. तसेच घरात समृद्धी आणतात.
महिलांच्या छातीवर तीळ : ज्या महिलांच्या छातीवर तीळ असतो त्या अविश्वसनीयपणे दयाळू आणि दृढनिश्चयी असतात. अशा महिला आई म्हणून त्यांच्या भूमिकेत उत्कृष्ट असतात आणि त्यांची सर्व कर्तव्ये पार पाडतात.
महिलांच्या पायांवर तीळ : ज्या महिलांच्या पायांवर तीळ असतात त्यांना फक्त प्रवास करायला आवडत नाही. पण हे तीळ नशीबाचे लक्षण मानले जातात. अशा महिला खूप भाग्यवान असतात.
ओठांवर तीळ : ओठांवर तीळ हे सौंदर्याचे प्रतीक आहे. ज्या महिलांच्या ओठांवर तीळ असतो त्या खूप आकर्षक असतात आणि त्यांना त्यांच्या जोडीदाराकडून खूप प्रेम मिळते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा नाही)
