AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ 5 लोकांपासून अंतर राखणे महत्वाचं, अन्यथा जीवनात होईल फक्त नुकसानच

चाणक्य नीति ही जीवनात हुशार, ज्ञानी आणि सावध राहण्याचे मार्गदर्शक आहे. ते स्पष्ट करते की, शहाणपणाच्या मदतीने तुम्ही कोणत्याही प्रकारच्या राजकीय भवऱ्यात अडकण्यापासून स्वत:ला कसे वाचवू शकता.

'या' 5 लोकांपासून अंतर राखणे महत्वाचं, अन्यथा जीवनात होईल फक्त नुकसानच
| Edited By: | Updated on: Feb 27, 2026 | 11:10 AM
Share

आपण आपल्या आयुष्यात दररोज नवीन लोक भेटतो. काही लोक आपल्याला पुढे जाण्यास मदत करतात, आपले मनोबल वाढवतात आणि कठीण काळात आपल्या पाठीशी उभे राहतात. त्यांच्यासोबत राहणे आपलयाल प्रेरणा देते आणि प्रगती करण्यास मदत करते. मात्र अशी काही लोकं आहेत जे मित्र असल्याचे भासवतात परंतु, प्रत्यक्षात तुमच्या प्रगतीत अडथळा आणतात. तसेच ही लोकं तुमची सकारात्मक ऊर्जा काढून टाकतात. तुमचे निर्णय गुंतागुंतीचे करतात आणि कधीकधी समस्या देखील निर्माण करतात. आचार्य चाणक्य सांगतात की कोणावरही पूर्णपणे विश्वास ठेवणे योग्य नाही. जीवनात सुज्ञपणे लोकांची निवड करावी. चला तर मग आजच्या लेखात आपण आपल्या आयुष्यात सुखी राहण्यासाठी कोणत्या 5 लोकांपासून अंतर राखावे ते जाणून घेऊयात.

जी लोकं नेहमी नकारात्मक असतात

चाणक्य यांच्या मते काही लोकं नेहमीच अशी असतात जी कोणत्याही कारणावरून तक्रार करत असतात आणि प्रत्येक छोट्या गोष्टीत दोष शोधत असतात. त्यांच्यासोबत वेळ घालवल्याने तुमचा मुड देखील तसाच होतो आणि तुमच्या सकारात्मक विचारसरणी कमी होऊ लागते. त्यामुळे तुम्ही अशा लोकांपासून दूर राहणेच योग्यतेचं ठरेल.

खोटं बोलणारी लोकं

चाणक्य नेहमी सांगतात की विश्वास हा कोणत्याही नात्याचा पाया असतो, परंतु काही लोकं विनाकारण खोटे बोलतात. गरज पडल्यास ज्या व्यक्तीवर तुम्ही जास्त विश्वास ठेवला आहे ती तुमच्या विरुद्ध काम करू शकतात. अशा लोकांवर जास्त विश्वास ठेवणे हानिकारक ठरू शकते.

आळशी आणि निष्क्रिय लोक

एखादी व्यक्ती कितीही हुशार असली पण त्या व्यक्तीला कठोर परिश्रम करण्याची सवय नसेल तर अशी लोकं तुम्हाला तुमच्या यशात मागे खेचू शकतात. आळशी लोकांसोबत काम करणे किंवा मैत्री करणे यामुळे तुमचा वेळ आणि शक्ती दोन्ही वाया जाते.

रागिष्ट आणि चिडचिडे लोकं

काही लोकं छोट्या छोट्या गोष्टींवरून रागावतात आणि त्यांच्या सभोवतालचे वातावरण बिघडवतात. त्यांच्यासोबत तुम्ही जर वेळ घालवत असाल तर तुम्हाला ताण येऊ शकतो. अशा लोकांपासून दूर राहणेच चांगले.

फक्त स्वार्थी मित्र

काही लोकं दिखाव्यासाठी मित्र बनवतात, पण जेव्हा खरी मदतीची परिस्थिती उद्भवते तेव्हा फक्त स्वतःच्या फायद्याची काळजी घेणारी लोकं मित्र असतात. त्यांच्याशी संबंध टिकवणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मनोज जरांगेंना तीन दिवसांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज
मनोज जरांगेंना डिस्चार्ज: मराठा आरक्षणासाठी अंतरवली सराटीत २९ ऑगस्ट उपोषणाची तयारी
नाशिक TCS प्रकरणातील संशयित आरोपी मतीन पटेलला जामीन
नाशिक TCS प्रकरणातील मतीन पटेलला जामीन मंजूर
58 लाख नोंदींच्या प्रमाणपत्रांची मागणी;मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख नोंदींची प्रमाणपत्रे हवीत, वेळ आल्यास सरकार पाडू
भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
बदलापूर वृक्ष प्राधिकरण नियुक्तीवरून भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
देवेंद्र फडणवीसांची धर्मेंद्र प्रधान यांच्याशी भेट; म्हणाले,‘माझे बंधू
फडणवीस-प्रधान भेट: माझे बंधू म्हणत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
बदलापुरात सीलबंद पाण्याच्या नावाखाली दूषित पाण्याची विक्री?
बदलापूरमध्ये सीलबंद पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याची विक्री
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला; कंत्राटदारांवर 12 कोटींचा दंड
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रो स्लॅब कोसळला, आदित्य ठाकरेंची कठोर कारवाईची मागणी
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या'...
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' निर्णयाने... फुटीर 6 खासदारांबाबत नवी अपडेट समोर
नवनाथ वाघमारेंचं वादग्रस्त वक्तव्य, नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचा निषेध, मराठा नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या...
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या बड्या नेत्यासह एकाच मंचवर, त्या व्हिडीओची तुफान चर्चा