AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Japmala Rules : या जप माळेने मंत्रजाप केल्यास लवकर पुर्ण होते मनोकामना, ही आहे योग्य पद्धत

नामजपासाठी जपमाळ (Japmala Rules) असणे अत्यंत आवश्यक आहे. ध्यानासाठी मंत्रांच्या जपाच्या बरोबरच जपमाळाचा जप करणे देखील खूप महत्वाचे आहे. बहुतेक जपमाळात 108 मणी असतात.

Japmala Rules : या जप माळेने मंत्रजाप केल्यास लवकर पुर्ण होते मनोकामना, ही आहे योग्य पद्धत
जपमाळImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jul 18, 2023 | 2:31 PM
Share

मुंबई : हिंदू धर्मात जप आणि तपश्चर्या ही प्राचीन काळापासून चालत आलेली आध्यात्मिक पद्धती आहे. महान ऋषींनी वर्षानुवर्षे जप आणि तपश्चर्या केल्याचे आपण ऐकतो. नामजपासाठी जपमाळ (Japmala Rules) असणे अत्यंत आवश्यक आहे. ध्यानासाठी मंत्रांच्या जपाच्या बरोबरच जपमाळाचा जप करणे देखील खूप महत्वाचे आहे. बहुतेक जपमाळात 108 मणी असतात. जपाची संख्या मोजण्यासाठी याचा उपयोग होतो. रूद्राक्षाच्या माळेने केलेला मंत्रजाप विशेष फलदायी मानल्या जाते. यासोबतच जपमाळ जपण्याचे काही नियम वेदांमध्ये सांगण्यात आले आहेत. माळेने जप करताना काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर व्यक्तीला नामजपाचे फळही मिळत नाही आणि अनेक अशुभ परिणामांना सामोरे जावे लागते. या नियमांचे पालन करणे शुभ आणि फलदायी असल्याचे सांगितले जाते. चला जाणून घेऊया जपमाळ जप करण्याचे नियम काय आहेत.

जपमाळाने जप करताना या गोष्टी लक्षात ठेवा

  1.  शास्त्रानुसार तुम्ही ज्या जपमाळाने जप करत आहात त्याचे मणी तुटलेले नाहीत ना याची खात्री करा. जपमाळेत तुटलेले मनी असल्यास त्याचा नकारात्मक परिणाम होतो. जपमाळ तुटली असेल तर ती ठिक करा आणि मणी बदलल्यानंतरच जपमाळाने जप करा.
  2.  शास्त्रानुसार जपमाळेत मण्यांची संख्या योग्य असणे देखील खूप महत्वाचे आहे. माळातील मण्यांची संख्या 27, 54 किंवा 108 असू शकते. ब्रह्मांडामध्ये एकूण 27 नक्षत्रे आहेत, ज्याद्वारे हे विश्व चालते. ग्रह नेहमी एका किंवा दुसर्‍या नक्षत्रात असतात, ज्याचा प्रभाव आपल्या जीवनात खूप खोलवर असतो. प्रत्येक नक्षत्रात चार चरण असतात आणि त्यानुसार आपण जपमाळ जपतो.
  3.  असं म्हणतात की तुम्ही कोणतीही माळ जपली तरी दोन मण्यांमध्ये गाठ असणं आवश्यक आहे. गाठ नसलेली माला शुभ फल देत नाही. हे अशुभ मानले जाते.
  4.  शास्त्रानुसार माळेने जप करताना लक्षात ठेवा की ती झाकलेली असावी तसेच ती कोणाला दिसू नये. याशिवाय नामजपासाठी जपमाळ अनामिकेवर ठेवा आणि अंगठ्याने मणी थांबवून मधल्या बोटाने हलवा.
  5. शास्त्रानुसार हेही ध्यानात ठेवावे की, जपमाळ करण्याची माळ कधीही गळ्यात घालू नये. नामजपाची माळ आणि गळ्यात घालण्याची माळ वेगवेगळी असावी.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा