AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Spiritual : 108 अंकाला हिंदू धर्मात का आहे इतके महत्त्व? अनेकांना नाही माहिती हे कारण

वास्तविक यामागे एक नाही तर अनेक कारणे दडलेली आहेत जी धर्माशी संबंधित आहेत तसेच ज्योतिष, विज्ञान, गणिताशी सुद्धा याचा संबंध आहे

Spiritual : 108 अंकाला हिंदू धर्मात का आहे इतके महत्त्व? अनेकांना नाही माहिती हे कारण
१०८ अंकाचे महत्त्वImage Credit source: Social Media
| Updated on: Mar 08, 2023 | 9:41 PM
Share

मुंबई : तुम्ही बर्‍याचदा पाहिले असेल की 108 क्रमांकाची हिंदू धर्मात वेगळी ओळख आहे (108 in Hinduism), मग ते जपमाळेतले मनी असो किंवा इतर कोणतेही धार्मिक कार्य. हा विचार आपल्या सर्वांच्या मनात नक्कीच आला असेल की हा फक्त एक आकडा आहे, मग त्याला हिंदू धर्मात इतके महत्त्व का आले आहे. वास्तविक यामागे एक नाही तर अनेक कारणे दडलेली आहेत जी धर्माशी संबंधित आहेत तसेच ज्योतिष, विज्ञान, गणिताशी सुद्धा याचा संबंध आहे. आज आम्ही तुम्हाला त्या कारणांबद्दल सांगणार आहोत जेणेकरुन तुम्हाला हिंदू धर्मातील 108 क्रमांकाचे महत्त्व अधिक चांगल्या प्रकारे समजेल. चला जाणून घेऊया.

हिंदू पौराणिक कथांमध्ये 108 अंकाचे महत्त्व

1. भगवान शिवाचे तांडव

जेव्हा भगवान शिव रागावतात किंवा खूप आनंदी असतात तेव्हा ते त्यांचे मुख्य नृत्य तांडव करतात. तुम्ही ते टीव्हीवर पाहिले असेलच पण या तांडव नृत्यात एकूण 108 प्रकारची आसने आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? याचा अर्थ भगवान शिव 108 वेगवेगळ्या आसनांमध्ये तांडव नृत्य करतात. त्याचप्रमाणे भारतीय नृत्यशैलीमध्ये नृत्याचे एकूण 108 प्रकार आहेत, हे स्वतःच एक अद्भुत उदाहरण आहे.

2. भगवान श्री कृष्णाच्या 108 गोपीका

भगवान श्रीकृष्णांनी वृंदावनात रासलीला केली. ती पौर्णिमेची रात्र होती जेव्हा श्रीकृष्णाने 108 गोपींसह महारास रचिले होते. त्या वेळी श्रीकृष्णाने आपल्या दैवी शक्तीने 108 रूपे धारण केली होती जेणेकरून कोणत्याही गोपींना त्यांची उणीव भासू नये. यानंतर सहा महिने या महारासाचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये भगवान शिव स्वतः गोपीच्या रूपात आले.

3. विश्वाचे स्वरूप

हिंदू धर्मानुसार, आपल्याकडे एकूण 27 नक्षत्र आहेत ज्यांच्या 4 दिशा आहेत. 27 ला 4 ने गुणले तर एकूण बेरीज 108 येते. अशा प्रकारे ही संख्या संपूर्ण विश्वाचे स्वरूप देखील दर्शवते.

4. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र

आधुनिक विज्ञानाच्या उदयापूर्वी आपल्या ऋषीमुनींनी सूर्यमालेचा सखोल शोध लावला होता. पृथ्वीशिवाय ग्रह आणि तारे, त्यांच्यातील अंतर आणि त्यांचा व्यास इत्यादींबद्दल त्यांनी अतिशय अचूक आकलन केले होते. जसे की सूर्य किंवा चंद्राचा व्यास, चंद्र किंवा पृथ्वीपासून सूर्याचे अंतर इत्यादी आणि त्याचा संबंध देखील 108 क्रमांकाशी आहे, ज्यावर आजचे आधुनिक विज्ञान देखील सहमत आहे. पृथ्वीपासून सूर्याचे अंतर सूर्याच्या व्यासाच्या 108 पट आहे. पृथ्वीपासून चंद्राचे अंतर चंद्राच्या व्यासाच्या 108 पट आहे. या सर्वांसह, सूर्याचा एकूण व्यास पृथ्वीच्या एकूण व्यासापेक्षा 108 पट जास्त आहे.

5. ज्योतिषशास्त्र

आपल्या सूर्य ताऱ्यामध्ये एकूण 9 ग्रह आहेत, ज्यामध्ये पृथ्वी हा तिसरा ग्रह आहे. यासह, ज्योतिषशास्त्रानुसार, आपल्याकडे एकूण 12 प्रकारच्या राशी आहेत. जेव्हा आपला जन्म पत्रीका बनवतो तेव्हा प्रत्येक राशीमध्ये प्रत्येक ग्रह वेगवेगळ्या प्रकारे ठेवता येतो. अशा प्रकारे, 12 राशींमधील प्रत्येक ग्रह 108 प्रकारे स्थापित केला जाऊ शकतो. यावर आपले संपूर्ण ज्योतिषशास्त्र ठरलेले आहे.

6. संस्कृत भाषा वर्णमाला

संस्कृत भाषेत एकूण 54 अक्षरे आहेत जी दोन भागात विभागली आहेत. यामध्ये 54 शब्द पुरुषाला समर्पित आहेत म्हणजे पुरुष किंवा शिव आणि 54 शब्द स्त्रीला समर्पित आहेत म्हणजेच स्त्रीलिंगी किंवा शक्ती जे पुरुषाचे पूर्ण स्वरूप दर्शवतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.