AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pitru Paksha 2022: भारतातील या ठिकाणी करा पिंडदान, पितरांना मिळेल मोक्ष

भारतात असे काही ठिकाणं आहेत जेथे पिंडं करण्याचे महत्त्व शास्त्रात सांगितले आहे. जाणून घेऊया या ठिकाणांबद्दल

Pitru Paksha 2022:  भारतातील या ठिकाणी करा पिंडदान, पितरांना मिळेल मोक्ष
पिंडदान Image Credit source: Social Media
| Updated on: Sep 21, 2022 | 10:18 AM
Share

मुंबई, सध्या पितृपक्ष (Pitru Paksha 2022) पंधरवडा सुरु आहे. या काळात आपल्या पूर्वजांना स्मरण करून त्यांच्या नावाने पिंडदान (Pindadan) करण्याला विशेष महत्त्व आहे. पिंडदान आणि श्राद्ध केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते व जन्म मरणाच्या फेऱ्यातून त्यांची सुटका होते अशी मान्यता आहे. हे पिंडदान विशेष ठिकाणी केल्यास अधिक पुण्य प्राप्त होते अशी धार्मिक मान्यता आहे. भारतात काही तीर्थक्षेत्र आहेत त्या ठिकाणी पिंडदान करण्याला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. जाणून घेऊया या ठिकाणांबद्दल.

गया

हिंदू आणि बौद्ध धर्मियांसाठी गया हे श्रद्धेचे प्रमुख केंद्र आहे. पूर्वजांच्या आत्म्याला शांतता मिळावी, यासाठी देशभरात अनेक ठिकाणी श्राद्ध विधी करण्यात येतात. मात्र, गया येथे केलेल्या श्राद्ध विधीमुळे अधिक पुण्य प्राप्त होते. पूर्वजांची जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्तता होते, अशी मान्यता आहे. केवळ देशातील नाही, तर विदेशातूनही अनेक श्रद्धाळू गया येथे श्राद्ध विधी करण्यासाठी येतात.

वाराणसी

पिंडदान  हा काशीमधील प्रसिद्ध विधी आहे आणि तो आत्म्याला पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्त करण्याचा महत्त्वाचा विधी असल्याचे मानले जाते. गया आणि वाराणसी येथील पिंड दान हे सर्व हिंदू अनुयायांसाठी महत्त्वाचे मानले जाते आणि मृत आत्म्यांना मोक्ष मिळवून देण्यासाठी गया किंवा काशी येथील पिंडदान योग्य ब्राह्मणांसोबतच केले पाहिजे. पितरांचा आशीर्वाद आणि पिंडदान  केल्याशिवाय कोणतेही कार्य यशस्वीपणे करता येत नाही, असे मानले जाते. वाराणसी हे भारतातील प्राचीन शहरांपैकी एक आहे आणि हिंदू धर्मात या तीर्थक्षेत्राला विशेष महत्त्व आहे.

अयोध्या

रामजन्मभूमी हे तीर्थक्षेत्र देखील आहे आणि पिंडदान विधीसाठी  सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. पवित्र सरयू नदीच्या काठावर भाट कुंड आहे जेथे लोक  ब्राह्मण पुजाऱ्यांच्या हातून धार्मिक विधी पार पाडतात. अनेकजण आपल्या पूर्वजांसाठी येथे हवन देखील करतात. शरयू नदीत स्नान करण्याला देखील विशेष महत्त्व आहे. तसेच पिंडदानासोबतच येथे अन्नदान करण्याला देखील विशेष महत्त्व आहे. अयोध्येत पर्यटकांना पाहण्यासारखे बरेच काही आहे, त्यातील काही प्रमुख म्हणजे फैजाबाद, बिथूर, जौनपूर, वाराणसी, प्रतापगढ आणि बस्ती या ठिकाणांना भाविक  नक्कीच भेट देतात.

उजैन

मध्य प्रदेशातील उज्जैन हे मंदिरांचे शहर आहे आणि पिंडदान विधीसाठी एक महत्त्वाचे  ठिकाण आहे. शहरातून वाहणाऱ्या शिप्रा नदीच्या काठावर पिंडदानाचे आयोजन केले जाते, येथे नदीच्या काठावर पिंडदान करणे अत्यंत पुण्याचे मानले जाते. उज्जैनमधील असंख्य तीर्थक्षेत्रांव्यतिरिक्त, कालिदास अकादमी आणि भर्त्रीहरी लेणी यांसारखी ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. उज्जैनमधील पर्यटक ओंकारेश्वर, बसवारा, भोपाळ आणि चित्तोडगडसह जवळपासच्या ठिकाणांना भेट देतात.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.