Jaya Ekadashi 2022 | पुण्यदायी जया एकादशी व्रताचे महात्म्य काय ? जाणून घ्या पूजेची आणि पराणची वेळ

धार्मिक मान्यतानुसार ‘जया एकादशी’ (Jaya Ekadashi 2022) व्रत अत्यंत पुण्यवान मानले जाते. असे मानले जाते की, या दिवशी उपवास ठेवल्यास मानवी आयुष्यातील (Life) सर्व पापे दूर होतात अशी मान्यता आहे.

Jaya Ekadashi 2022 | पुण्यदायी जया एकादशी व्रताचे महात्म्य काय ? जाणून घ्या पूजेची आणि पराणची वेळ
Jaya-Ekadashi-2021
Follow us
| Updated on: Feb 12, 2022 | 7:37 AM

मुंबई : धार्मिक मान्यतानुसार ‘जया एकादशी’ (Jaya Ekadashi 2022) व्रत अत्यंत पुण्यवान मानले जाते. असे मानले जाते की, या दिवशी उपवास ठेवल्यास मानवी आयुष्यातील (Life) सर्व पापे दूर होतात अशी मान्यता आहे. हिंदू धर्मात प्रत्येक व्रताला विशेष महत्त्व आहे, या यादीत एकादशी व्रताचा समावेश आहे . हिंदू कॅलेंडरनुसार, माघ (Magh) महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला भाविक जया एकादशीचे व्रत करतात . या वर्षी 2022 मध्ये, जया एकादशीचे व्रत फेब्रुवारीचे 12 येत आहे.  जया एकादशीचे व्रत केल्याने दुःखाचा नाश होतो. या दिवशी नियमानुसार भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि भगवान विष्णूच्या कृपेने उपवास करणार्‍यांना मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो, दुःखांपासून मुक्ती मिळते, अनावधानाने केलेल्या पापांपासून मुक्ती मिळते.

एकादशी म्हणजे नक्की काय ?

प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षांतील अकरावी तिथी एकादशी या नावाने संबोधिली जाते. विष्णूची अत्यंत प्रिय तिथी, अशी तिची प्रसिध्दी आहे. वैष्णव, शैव, सौर आदी सर्व हिंदूंना व विशेषत: सर्व विष्णुभक्तांना एकादशी हे व्रत करावयास सांगितले आहे. नित्य व काम्य असे हे उभयविध व्रत आहे. व्रतविषयक सामान्य नियम यालाही लागू आहेत. एकादशीच्या बाबतीत ‘स्मार्त’व ‘भागवत’असे दोन संप्रदाय आहेत. ही तिथी दिनद्वयव्यापिनी असल्यास द्वादशीविद्धा वैष्णवांकरिता विहित आहे. चला तर मग जाणून घेऊया जया एकादशीचा मुहूर्त आणि पारणाची वेळ.सर्व बद्दल.

जया एकादशी 2022 च्या पूजेची वेळ जाणून घ्या

यावर्षी 2022 मध्ये माघ शुक्ल एकादशी 11 फेब्रुवारी रोजी दुपारी 01:52 पासून सुरू होत आहे, जी 12 फेब्रुवारी रोजी दुपारी 04:27 पर्यंत चालणार आहे. अशा स्थितीत 12 फेब्रुवारीला जया एकादशीचे व्रत ठेवण्यात येणार आहे. या दिवसाचा शुभ मुहूर्त दुपारी 12:13 ते 12:58 पर्यंत आहे.

हे’ आहेत व्रताचे नियम

ज्यांना हे व्रत करायचे आहे, त्यांनी दशमीच्या तारखेपासून उपवासाच्या नियमांचे पालन सुरू केले पाहिजे. नियमांनुसार दशमीच्या रात्री उपवास ठेवणाऱ्यांनी सात्विक भोजन करावे. कांदा आणि लसूण घालून बनवलेले तामसिक अन्न घेऊ नये. तसेच, डाळ, चणे आणि बेसन पिठापासून बनवलेल्या गोष्टी खाऊ नयेत. मध खाणे देखील टाळावे. व्रत पूर्ण होईपर्यंत पूर्णपणे ब्रह्मचर्य पाळले पाहिजे.

व्रताची विधी

एकादशीच्या दिवशी आंघोळ केल्यावर पूजेच्या ठिकाणी स्वच्छता केल्यानंतर तिथे गंगेचे पाणी शिंपडावे. नंतर चौरस किंवा पाटावर पिवळ्या रंगाचे कापड घालून नारायणाची मूर्ती ठेवावी. भगवान विष्णूचे ध्यान करून व्रताचा संकल्प सोडवा आणि नंतर भक्तिभावाने आणि प्रेमाने त्याला धूप, दीप, चंदन, फळ, तीळ आणि पंचामृत अर्पण करावे. नंतर व्रताची कथा वाचून आरती करावी. त्यानंतर दिवसभर उपवास ठेवावा. रात्री फलाहार करू शकता. पण फक्त गोड फळे खावीत. शक्य असल्यास रात्रभर भजन कीर्तन करुन जागरण करावे.

संदर्भ : मराठी विश्वकोश

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

संबंधीत बातम्या :

10 February 2022 Panchang | 10 फेब्रुवारी 2022, जाणून घ्या गुरुवारचे पंचांग, ​​शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

संसारिकांना, साधकांना, निस्पृहांना, आयुष्याची नवी दिशा देणारे ‘दासबोध’ , आज समर्थ रामदासांच्या दासबोधाची जयंती

बिंदिया चमकेगी.. ! जाणून घ्या कपाळावर कुंकू आणि टिकली लावण्याचे फायदे आणि त्यामागील वैज्ञानिक कारण…

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.