AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalashtami 2023 : उद्या श्रावण महिन्यातली मासिक कालाष्टमी, मुहूर्त आणि पूजा विधी

कालाष्टमीच्या (Kalashtami) दिवशी कालभैरव देवाच्या उग्र रूपाची पूजा केली जाते. या दिवशी तंत्र मंत्र सिद्धी प्राप्त केलेले साधक निशा काळात कालभैरवाची पूजा करतात. कालभैरवाला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस विशेष मानला जातो.

Kalashtami 2023 : उद्या श्रावण महिन्यातली मासिक कालाष्टमी, मुहूर्त आणि पूजा विधी
कालाष्टमीImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Sep 05, 2023 | 9:45 PM
Share

मुंबई : दर महिन्याला कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालाष्टमी (Shrawan Kalashtami 2023) साजरी केली जाते. यावेळी श्रावणातली कालाष्टमी 6 सप्टेंबर रोजी साजरी होणार आहे. कालाष्टमी हा सण महादेवाला समर्पित आहे. कालाष्टमीच्या दिवशी कालभैरव देवाच्या उग्र रूपाची पूजा केली जाते. या दिवशी तंत्र मंत्र सिद्धी प्राप्त केलेले साधक निशा काळात कालभैरवाची पूजा करतात. कालभैरवाला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस विशेष मानला जातो. असे मानले जाते की कालाष्टमीच्या दिवशी भगवान शंकराची पूजा केल्याने सांसारिक दुःखांपासून मुक्ती मिळते. चला, जाणून घेऊया कालाष्टमीची शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धती. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षाची अष्टमी तिथी दुपारी 03.37 पासून सुरू होईल, जी 7 सप्टेंबर रोजी दुपारी 04.14 वाजता समाप्त होईल. तर निशा काळात काल भैरव देवाची पूजा केली जाते. अशा प्रकारे 6 सप्टेंबर रोजी कालाष्टमी साजरी केली जाईल.

कालाष्टमी पूजेची पद्धत

कालभैरव देव, भगवान शिवाचे उग्र रूप, केवळ निशा काळातच पूजले जाते. या दिवशी सकाळी स्नान आणि ध्यान केल्यानंतरच पूजा करावी. ब्रह्मवेळेत उठून दैनंदिन कामातून निवृत्त झाल्यावर गंगाजलयुक्त पाण्याने स्नान करावे. स्वच्छ वस्त्र परिधान करून सर्वप्रथम सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. यानंतर षोडशोपचार करून कालभैरवाची पूजा करावी. यावेळी शिव चालीसा, शिवस्त्रोत आणि मंत्रांचे पठण करा. पूजेच्या शेवटी तुमची इच्छा कालभैरवाला सांगा. विशेष कार्य सिद्धीसाठीही उपवास करता येतो. यानंतर निशा काळात पुन्हा विधीपूर्वक भैरव देवाची पूजा करावी.

कालाष्टमीच्या दिवशी या चूका टाळा

  • कालाष्टमीच्या दिवशी चुकूनही अहंकारी विचार मनात ठेवू नका, ज्येष्ठांचा अनादर करू नका, महिलांवर अत्याचार करू नका. अनैतिक कृत्य करणाऱ्यांना कालभैरवाच्या नाराजीला सामोरे जावे लागते.
  • कालभैरवाची पूजा कोणाचेही नुकसान करण्याच्या चुकीच्या उद्देशाने करू नये. यामुळे भविष्यात त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात.
  • कालाष्टमीच्या दिवशी दारूला हातही लावू नका. मांसाहारालाही मनाई आहे.
  • गृहस्थांनी बाबा भैरवाची सात्विक पूजा करावी.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा बदामावर
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा काजु-बदामावर ताव
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल