AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalashtami : आज अधिकमासातील कालाष्टमी, महत्त्व आणि पुजा विधी

कालभैरवाचे (Kalbhairav) भक्त वर्षातील सर्व कालाष्टमीच्या दिवशी त्यांची पूजा करतात आणि उपवास करतात. पंचांगानुसार, अधिरमासातील कालाष्टमी 8 ऑगस्ट, मंगळवारी म्हणजे आज आहे.

Kalashtami : आज अधिकमासातील कालाष्टमी, महत्त्व आणि पुजा विधी
कालभैरवImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Aug 08, 2023 | 8:12 AM
Share

मुंबई : दर महिन्याला कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालाष्टमी साजरी केली जाते. कालभैरवाचे (Kalbhairav) भक्त वर्षातील सर्व कालाष्टमीच्या दिवशी त्यांची पूजा करतात आणि उपवास करतात. पंचांगानुसार, अधिरमासातील कालाष्टमी 8 ऑगस्ट, मंगळवारी म्हणजे आज आहे. अधिक महिन्यात कालाष्टमीचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घेऊया. आध्स कालाष्टमी 2023 कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला विशेष महत्त्व आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, अष्टमी तिथी 08 ऑगस्ट रोजी येत आहे. अधिकमासाची कालाष्टमी तीन वर्षांतून एकदा येते. या दिवशी मासिक कालाष्टमी व्रत केले जाते. या विशेष दिवशी भगवान शिवाच्या रुद्रावतार काल भैरवाची पूजा केली जाते.

कालाष्टमी व्रताचे महत्त्व

कालाष्टमीच्या दिवशी भगवान शिवाच्या रुद्रावतार कालभैरवाची पूजा केली जाते. काल भैरव हे तंत्रमात्राचे देवता म्हणूनही ओळखले जाते. असे मानले जाते की या दिवशी पूजा केल्याने व्यक्तीला अकाली मृत्यू आणि अनेक प्रकारच्या रोगांपासून मुक्ती मिळते. यासोबतच कालाष्टमीचे व्रत करून शनि आणि राहूच्या अडथळ्यांपासून मुक्ती मिळू शकते. कालाष्टमीला निशिता मुहूर्तावर कालभैरवाची पूजा मंत्र सिद्धीसाठी केली जाते.

कालाष्टमीचा शुभ मुहूर्त

पंचांगानुसार, अधिकमासची अष्टमी तिथी 08 ऑगस्ट 2023 रोजी पहाटे 04.14 वाजता सुरू होईल आणि दुसर्‍या दिवशी 09 ऑगस्ट 2023 रोजी पहाटे 03.52 पर्यंत चालू राहील. अशा स्थितीत 8 ऑगस्ट रोजी कालाष्टमी उपवास करण्यात येणार आहे.

सकाळची वेळ – सकाळी 09:31 ते 11:07 पर्यंत

निशिता काल मुहूर्त – सकाळी 12.22 ते दुसऱ्या दिवशी 01.06 पर्यंत

अधिक मास कालाष्टमी पूजा विधि

या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ कपडे घाला. यानंतर देवघरासमोर चौरंगावर स्वच्छ कापड पसरून बाबा कालभैरवाची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा. यानंतर भगवान शिव आणि गणेशाची प्रतिष्ठापना करा. बाबा भैरवनाथांना फुले, अक्षत, हार, पान, उदबत्ती, दिवा इत्यादी अर्पण करा. कालभैरवाला इमरतीचा नैवेद्य दाखवा. पान वगैरे अर्पण करा. निशिता काल मुहूर्तावर बाबा काल भैरवाची पूजा केली जाते. परंतु गृहस्थ या दिवशी  बेलपत्रावर लाल चंदनाने ‘ओम’ लिहून शिवलिंगावर अर्पण करू शकतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान