
सूर्य आणि चंद्रग्रहणादरम्यान अनेक खगोलशास्त्रीय घटना घडत असतात. वैज्ञानिक दृष्टा अत्यंत महत्वाचे सूर्य आणि चंद्रग्रहण असते. यादरम्यान अनेक लोक सूतक काळ पाळतात. यादरम्यान कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. हेच नाही तर ग्रहण संपल्यानंतर घरातील सर्व कपडे आणि भांडीही काही लोक धुतात, अंघोळ्या करतात. ज्योतिषशास्त्र आणि हिंदू धर्मात देखील ग्रहणाला महत्व आहे. 2026 मध्ये होणाऱ्या ग्रहणांची संपूर्ण माहिती आणि त्याचा राशींवर होणारा नेमका परिणाम याबद्दल जाणून घेऊयात. ग्रहणाच्या काळात राशींवर परिणाम होतो. 2026 चे पहिले सूर्यग्रहण 17 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे. फाल्गुन अमावस्यातील हे ग्रहण असून कुंभ शतभिषा नक्षत्र कंकणाकृती सूर्यग्रहण असेल. हे एक कंकणाकृती सूर्यग्रहण असेल. यादरम्यान सूर्य, चंद्र पृथ्वी एका सरळ रेषेत येतील. 2026 मध्ये मोठी चार ग्रहणे आहेत.
चंद्र पृथ्वीपासून थोडा दूर असल्याने सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही. यामुळे ग्रहणाच्या काळात दिवसा थोडासा अंधार होईल. मात्र, पूर्णपणे नाही. थोडासा काळोखा बघायला मिळेल. तोही काही मिनिटांसाठी. या ग्रहणाचा काही राशींवर थेट परिणाम होऊ शकतो. कुंभ राशीच्या लोकांसाठी आत्मपरीक्षण आणि महत्त्वाचे निर्णय घेण्याचा हा काळ आणि संधी ठरले.
विशेष म्हणजे कुंभ राशीतील लोकांना करिअर बदल आणि नवीन जबाबदाऱ्यांसाठी निर्णय घेण्यासाठी ही योग्य वेळ असेल. मात्र, दुरावा आणि गैरसमज निर्माण होऊ शकतात. यामुळे कोणताही निर्णय घेताना यादरम्यान चार वेळा विचार करणेही तितकेच आवश्यक आहे. हेच नाही तर मानसिक दबावही वाढू शकतो. तुम्ही जे काही निर्णय घेत आहात ते गुप्तपणे घ्या. घाई गडबडीत अजिबात नको.
3 मार्च 2026 रोजी चंद्रग्रहण होणार आहे. याचा परिणाम कन्या राशीवर दिसू शकतो. हे चंद्रग्रहण कन्या राशीच्या लोकांच्या जीवनात अचानक बदल घडवू शकते. कामाच्या क्षेत्रात मोठे बदल होतील. आयुष्यात काही चढउतार बघायला मिळतील. कौटुंबिक स्थितीही तणावपूर्ण निर्माण होऊ शकते. तुमची एक छोटीशी चूकही तुम्हाला महागात पडू शकते. यामुळे अधिक काळजी घेणे महत्वाचे ठरले. तुमच्या एका छोट्या चुकीमुळे अनेक नातीही दुरावली जाऊ शकतात.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)