AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahakumbh 2025 : गंगापुरी महाराजांनी 32 वर्षांपासून अंघोळच केली नाही, सामान्य माणसानं असं केलं तर काय होईल?

प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळावा सुरू आहे. या महाकुंभ मेळाव्यामध्ये लाखो साधू सहभागी झाले आहे. प्रत्येक साधूचं काहीना काही वैशिष्ट आहे. एक साधू आहेत, त्यांनी गेल्या 32 वर्षांमध्ये एकदाही अंघोळ केली नसल्याचा दावा करण्यात येत आहे.

Mahakumbh 2025 : गंगापुरी महाराजांनी 32 वर्षांपासून अंघोळच केली नाही, सामान्य माणसानं असं केलं तर काय होईल?
| Updated on: Jan 14, 2025 | 7:59 PM
Share

प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळावा सुरू आहे. या महाकुंभ मेळाव्यामध्ये लाखो साधू सहभागी झाले आहे. प्रत्येक साधूचं काहीना काही वैशिष्ट आहे. त्यातील काही साधू असे आहेत की त्यांनी असे काही चत्मकार करून दाखवले आहेत, ज्यामुळे ते इतरांपेक्षा वेगळे ठरतात. अशा साधूंमध्ये आसामच्या छोटू बाबाचा देखील समावेश होतो.

छोटू बाबाचं नावं गंगापुरी महाराज आहे, मात्र सगळे त्यांना छोटू बाबा म्हणूनच ओळखतात. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार गेल्या 32 वर्षांमध्ये त्यांनी एकदा देखील अंघोळ केलेली नाहीये, त्यांनी यासाठी काय साधना केली हे सांगणं कठीण आहे. मात्र एका सामान्य माणसानं जर एक महिना अंघोळ केली नाही, तर तो अस्वस्थ होऊ शकतो. त्याच्या शरीरातून दुर्गंध येईल.

छोटू बाबाचं वय 57 वर्ष आहे. मात्र त्यांची उंची फक्त तीन फूट एवढीच आहे. आपण 32 वर्षांपासून एकदाही अंघोळ केली नसल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात येत आहे.ते हठयोगी आहेत. असंही म्हटलं जातं की जैन साधू देखील कधीच आंघोळ करत नाहीत,मात्र तरी देखील त्यांचं आरोग्य उत्तम राहतातं मात्र जर एखाद्या सामान्य व्यक्तीनं 32 वर्ष आंघोळ केली नाही तर काय होऊ शकतं? याचा कधी तुम्ही विचार केला आहे का?

तुमच्या शरीरामधून भयानक दुर्गंध येईल. तुम्हाला अनेक प्रकारचे बुरशीजन्य आजार होतील. तुमच्याजवळ कोणीही उभं राहू शकणार नाही. विविध आजार होण्याचा धोका असतो.  त्वचा विकारतज्ज्ञ डॉ. लॉरेन प्लॉच यांनी याबाबत बोलताना सांगितलं की, जर तुम्ही एक वर्ष अंघोळ केली नाही तर सुरुवातील तुमच्या चेहऱ्याचा जो तेलकटपणा आहे, तो हळूहळू नष्ट होतो. तुमचा चेहरा कोरडा पडू शकतो. तुमचं शरीर अनेक जीवाणूंचं घर बनले. शरीरावर मृत पेशी मोठ्या प्रमाणात वाढतील. तुमचा शरीराचा भयानक दुर्गंध येईल. या सर्वांमुळे तुम्ही आजारी पडू शकता. त्यामुळे दररोज शरीराची स्वच्छता करणं आवश्यक आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....