AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mangalwar Upay : मंगळवारच्या दिवशी केलेले हे चार उपाय करतील चार मोठ्या समस्यांतून सुटका

धर्म आणि ज्योतिष्यानुसार मंगळवार हनुमानाचा अत्यंत प्रिय दिवस आहे. म्हणून या दिवशी मनापासून हनुमानाची पूजा केल्याने विशेष फळ प्राप्ती होते. यासोबतच मंगळ ग्रहाचे अशुभ प्रभाव कमी होतात.

Mangalwar Upay : मंगळवारच्या दिवशी केलेले हे चार उपाय करतील चार मोठ्या समस्यांतून सुटका
हनुमानImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Feb 28, 2023 | 2:28 PM
Share

मुंबई : हिंदू धर्मात मंगळवार (Mangalwar Upay) हा हनुमानजींना समर्पित आहे. या दिवशी विधीपूर्वक हनुमानजीची पूजा केल्याने ते लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात. असे म्हणतात की, हनुमानजी प्रसन्न झाले तर माणसाच्या जीवनात येणाऱ्या सर्व समस्या दूर होतात. जर एखाद्या व्यक्तीला नोकरीची चिंता असेल किंवा पैसे मिळण्याबाबत समस्या येत असतील तर मंगळवारी केलेले हे उपाय त्या व्यक्तीला या समस्येतून बाहेर काढते. मंगळवारी करावयाच्या या उपायांबद्दल जाणून घेऊया.

मंगळवारी करा हे चार उपाय

  1. जर तुम्हाला नोकरीची चिंता असेल, नोकरी मिळत नसेल किंवा वारंवार अपयशाचा सामना करावा लागत असेल तर निराश होण्याची अजिबात गरज नाही. मंगळवारी हनुमानाची पूजा करा. या दिवशी हनुमानजींच्या मंदिरात जाऊन त्यांच्यासमोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा. यासोबत तिथे बसून हनुमान चालीसा पाठ करा. हा उपाय केल्याने व्यक्तीचा रोजगाराचा मार्ग खुला होतो.
  2. घरात सुख-समृद्धी मिळवण्यासाठी, कलह आणि वाद दुर करण्यासाठी मंगळवार आणि शनिवारी हनुमान मंदिरात बजरंगबलीची पूजा करा. 21 मंगळवारी त्यांना गूळ आणि हरभरा अर्पण करा. 21 मंगळवारी हनुमानजींना चोळा अर्पण करा. हा उपाय नियमित आणि भक्तीभावाने केल्यास घरात सुख-समृद्धी येऊ लागते.
  3. काम किंवा वैयक्तिक जीवनात शत्रूंमुळे त्रासलेल्या लोकांनी मंगळवारी सकाळी स्नानानंतर हनुमान मंदिरात जावे. पूर्ण भक्तिभावाने बजरंगबानचे पठण करावे. 21 मंगळवारपर्यंत हा उपाय केल्यास जीवनातील सर्व शत्रू नष्ट होतील.
  4. काही गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या लोकांनी मंगळवारी भांड्यात पाणी घेऊन हनुमानजींच्या प्रतिमेसमोर ठेवावे. यानंतर तिथे बसून हनुमान बाहुकचा पाठ करा. पाठ पूर्ण झाल्यावर हे पाणी घ्या. यानंतर दुसरे पाणी भरून ठेवावे. असे सतत 21 मंगळवार केल्याने माणसाला त्रासदायक आजारांपासून मुक्ती मिळते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?