AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mangalwar Upay: मंगळवारी केलेल्या ‘या’ उपायांमुळे दूर होईल सर्व संकट, बजरंगबलीची राहील कृपा

मंगळवार हा भगवान हनुमान यांना समर्पित असलेला वार आहे. या दिवशी केलेल्या काही उपायांमुळे कार्यसिद्धी होते, असेच संकटं दूर होतात.

Mangalwar Upay:  मंगळवारी केलेल्या 'या' उपायांमुळे दूर होईल सर्व संकट, बजरंगबलीची राहील कृपा
बजरंगबली Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Dec 06, 2022 | 6:21 PM
Share

मुंबई,  हिंदू धर्मात प्रत्येक वार हा कोणत्या ना कोणत्या देवासाठी विशेष पूजनीय मानला जातो. या दिवशी केलेल्या काही उपायांमुळे जीवनातील दुःख आणि शारीरिक कष्ट दूर होतात असे मानले जाते. मंगळवारचे काही उपाय ज्योतिषशास्त्रात (Tuesday Remedy) सांगितले आहेत. मंगळवारचा दिवस हा रामभक्त हनुमान  यांना समर्पित आहे. या दिवशी व्रत आणि काही उपाय (Mangalwar Upay) केल्याने हनुमानजी प्रसन्न होतात आणि आशिर्वाद देतात असे म्हटले जाते. कलयुगात हनुमानजी चिरंजीवी असून त्यांच्या कृपेने व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे. जाणून घेऊया मंगळवारी कोणते उपाय करावे याविषयी.

  1. मंगळवारी हनुमानजींची सकाळी आणि सायंकाळी पूजा करणे फलदायी मानली जाते. सूर्यास्तानंतर पूजेचा विशेष मुहूर्त असतो. या दिवशीय विधिपूर्वक हनुमानजींची पूजा केल्यास शुभ परिणाम मिलतात.
  2. भगवान हनुमान यांना लवकर प्रसन्न करण्यासाठी मंगळवारी मंदिरात जाऊन ‘राम नाम’चा जप करावा. बजरंगबली यांना प्रभू श्रीरामाचे परम भक्त आहेत. त्यामुळे ‘राम नाम’चा जप अवश्य करावा.
  3. मंगळवारच्या दिवशी हनुमान मंदिरात गुळ आणि हरभऱ्याच्या प्रसाद ठेवावा. असे केल्याने जीवात सुख-शांती आणि समृद्धी येते.
  4. जी व्यक्ती शारीरिक समस्येमुळे त्रस्त आहे त्यांनी मंगळवारी एका भांड्यात पाणी भरून हनुमानजींच्या प्रतिमेसमोर ठेवावे. असे केल्याने शुभ लाभ मिळतात.
  5. शक्य असल्यास मंगळवारी उपवास करून गरिबांना अन्न दान करावे. हा उपाय केल्याने धन आणि अन्नाची कमी भासत नाही.
  6. बजरंगबलीला प्रसन्न करण्यासाठी मंगळवारी भगवा चोला चढवावा. तसेच सुंदर कांडचे पठण करावे. यामुळे बजरंगबलीची कृपा लाभते.
  7. मंगळवारी हनुमानाला  प्रसन्न करण्यासाठी राम रक्षा स्तोत्रचे पठन करावे.
  8. नोकरीच्या शोधात असलेल्यांनी मंगळवारी पानाचा विडा हनुमानजीला अर्पण करावा. यामुळे नोकरी मिळवताना येत असलेले अडथळे दूर होतील.
  9. तुम्हाला आर्थिक चणचण जाणवत असेल तर मंगळवारी बजरंगबलीला केवड्याचे अत्तर आणि गुलाबाच्या फुलांचा हार घाला.
  10. मंगळवारी हनुमानजीच्या मूर्ती किंवा प्रतिमेसमोर बसून प्रभू श्रीरामाच्या कोणत्याही एका मंत्राचा जप करावा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
Ganpati Bappa Morya | मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजीरवाडी मंडळात दर्शन
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...