AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

March Muhurat : मार्च 2023 मध्ये फक्त सहा दिवसच लग्नाचे मुहूर्त, अशा आहेत तारखा

पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी 22 एप्रिल रोजी सकाळी 07.49 वाजता सुरू होत असून ही तिथी 23 एप्रिल रोजी सकाळी 07.47 वाजता समाप्त होईल.

March Muhurat : मार्च 2023 मध्ये फक्त सहा दिवसच लग्नाचे मुहूर्त, अशा आहेत तारखा
लग्न मुहूर्तImage Credit source: Social Media
| Updated on: Mar 01, 2023 | 6:51 PM
Share

मुंबई : आजपासून मार्च 2023 महिना सुरू झाला आहे. या महिन्यात शुभ विवाहासाठी फक्त 6 दिवसांचा मुहूर्त आहे (Marriage Muhurat March 2023). येत्या एप्रिल महिन्यात लग्नासाठी अक्षय्य तृतीयेचा एकच दिवस आहे. अक्षय्य तृतीया 2 एप्रिल रोजी आहे, ज्या दिवशी अबुझा मुहूर्त असतो. त्या दिवशी तुम्ही विवाह किंवा कोणतेही शुभ कार्य करू शकता. जाणून घेऊया की मार्चमध्ये लग्नासाठी कोणते दिवस शुभ आहेत?

लग्नाचा मुहूर्त मार्च 2023

  1.  1 मार्च, दिवस बुधवार, शुभ वेळ सकाळी 06.47 ते 09.52 पर्यंत. या दिवशी मृगाशिरा नक्षत्र आहे.
  2.  5 मार्च, दिवस रविवार, सकाळी 04:09 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 06:41 पर्यंत शुभ वेळ. या दिवशी मघा नक्षत्र आहे.
  3.  6 मार्च, दिवस सोमवार, शुभ वेळ सकाळी 06.41 ते 04.17 पर्यंत. या दिवशी मघा नक्षत्र आहे.
  4.  9 मार्च, दिवस गुरुवार, रात्री 09:08 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 5:57 पर्यंत शुभ वेळ. या दिवशी हस्त नक्षत्र आहे.
  5.  11 मार्च, दिवस शनिवार, शुभ वेळ सकाळी 07.11 ते 07.52 पर्यंत. हा दिवस स्वाती नक्षत्र आहे.
  6.  13 मार्च, सोमवार, शुभ मुहूर्त सकाळी 08:21 ते संध्याकाळी 05:11 पर्यंत. या दिवशी अनुराधा नक्षत्र आहे.

गृह प्रवेश मुहूर्त मार्च 2023

  1. 01 मार्च, बुधवार: गृह प्रवेश मुहूर्त: सकाळी 06:47 ते 09:52 पर्यंत.
  2. 08 मार्च, बुधवार: गृह प्रवेश मुहूर्त: दुसऱ्या दिवशी सकाळी 06.39 ते 04.20 पर्यंत.
  3. 09 मार्च, गुरुवार: गृह प्रवेश मुहूर्त: पहाटे ०५.५७ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३७ पर्यंत.
  4. 10 मार्च, शुक्रवार: गृह प्रवेश मुहूर्त: सकाळी 06.37 ते रात्री 09.42.
  5. 13 मार्च, सोमवार: गृह प्रवेश मुहूर्त: रात्री 09:27 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 06:33 पर्यंत.
  6. 16 मार्च, गुरुवार: गृह प्रवेश मुहूर्त: पहाटे 04.47 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 06.29 पर्यंत.
  7. 17 मार्च, शुक्रवार: गृह प्रवेश मुहूर्त: सकाळी 06:29 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 02:46 पर्यंत.

अक्षय्य तृतीया 2023 तारीख

पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी 22 एप्रिल रोजी सकाळी 07.49 वाजता सुरू होत असून ही तिथी 23 एप्रिल रोजी सकाळी 07.47 वाजता समाप्त होईल. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त 07.49 ते दुपारी 12.20 पर्यंत आहे. तुम्हाला पूजेसाठी साडेचार तासांचा वेळ मिळेल.

अक्षय्य तृतीयेचे महत्त्व

अक्षय्य तृतीया हा शुभ दिवसांपैकी एक मानला जातो. या दिवशी केलेल्या शुभ कार्याचे फळ चिरंतन मिळते. यामुळे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लोकं सोने, चांदी, वाहने, घर इत्यादी खरेदी करतात आणि देवी लक्ष्मीची पूजा करतात जेणेकरून त्यांची संपत्ती अक्षय राहते. त्यात तोटा होता कामा नये.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.