Masik Shivratri 2021 : मासिक शिवरात्रीचा आज विशेष योग; शुभ मुहूर्त, पूजा विधी जाणून घ्या

हिंदू धर्मानुसार मासिक शिवरात्रीला खूप महत्त्व आहे. या दिवशी भाविक श्रद्धाभावाने भगवान शिवची पूजा करतात.

Masik Shivratri 2021 : मासिक शिवरात्रीचा आज विशेष योग; शुभ मुहूर्त, पूजा विधी जाणून घ्या
शिवरात्र
Follow us
| Updated on: May 09, 2021 | 11:46 AM

मुंबई : हिंदू धर्मानुसार मासिक शिवरात्रीला खूप महत्त्व आहे. या दिवशी भाविक श्रद्धाभावाने भगवान शिवची पूजा करतात. भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी नवस देखील यादिवशी केला जातो. हिंदू पंचांगानुसार, प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला मासिक शिवरात्र व्रत पाळले जाते. आज मासिक शिवरात्री आहे. मान्यता आहे की, देवी-देवातांमध्ये सर्वात लवकर भगवान शिव प्रसन्न होतात. जो कोणी त्यांची मनोभावे त्यांची पूजा-अर्चना करतात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. (Masik Shivratri 2021 Know The Shubh Muhurat)

मासिक शिवरात्रीचा पूजा मुहूर्त यावेळी मासिक शिवरात्रीला, प्रीती आणि आयुष्मान योग आले आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार या दोन योगांमध्ये उपासना केल्यास विशेष परिणाम मिळतात. या दिवशी कोणत्याही कामात तुम्हाला यश मिळेल. प्रीती योग दिनांक 09 मे 2021 रोजी 08:43 वाजता होईल. यानंतर आयुष्मान योगास प्रारंभ होईल.

शुभ मुहूर्त वैशाख कृष्ण चतुर्थीची तिथि आरंभ – रविवारी संध्याकाळी 9 मे ते 07:30 वाजता. वैशाख चतुर्थी संपेल – 10 मे सोमवारी रात्री 09:55 वाजता.

मासिक शिवरात्रीचं महत्व हिंदू धर्मात शिवरात्रीचं विशेष महत्त्व आहे. पौराणिक मान्यतेनुसार, या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वती एकत्र आले होते. त्यामुळे या दिवशी पूजा-पाठ केल्याने भगवान शिव अत्यंत प्रसन्न होतात आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. हा व्रत केल्याने विवाहात येणाऱ्या समस्यांमधून मुक्ती मिळते. भोलेनाथच्या आशीर्वादाने मुलीच्या लग्नात येणाऱ्या अडचणीही दूर होतात.

मासिक शिवरात्रीची पूजा विधी

1. मासिक शिवरात्रीच्या पूजेची तयारी त्रयोदशीपासून सुरु होऊन जाते. या दिवशी प्रदोष काळात भगवान शिवची पूजा आणि मासिक शिवरात्री करण्याचा संकल्प घ्या.

2. चतुर्दशीच्या दिवशी सकाळी उठून स्नान करा आणि शंकराला बेलपत्र, भांग, धतुरा, आकची पानं, दूध आणि गंगाजलचा अभिषेक करावा.

3. या दिवशी शिव पुराण आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करणे अत्यंत शुभ असते. या दिवशी भक्त निराधर व्रत ठेवतात.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या : 

जेव्हा भगवान नरसिंहाला शांत करण्यासाठी महादेवाने घेतला सर्वेश्वर अवतार, जाणून घ्या नेमकं काय घडले?

Kamada Ekadashi 2021 | कामदा एकादशी तिथी, वेळ, महत्त्व आणि कथा, जाणून घ्या…

(Masik Shivratri 2021 Know The Shubh Muhurat)

Non Stop LIVE Update
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.