AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पलूस येथे रंगला माऊलीचा रथ दिंडी सोहळा, श्री संत ज्ञानेश्वर माऊली चॅरिटेबल ट्रस्टचे संयोजन

'विठाई माझी, माझी विठाई, माझे पंढरीचे आई, ज्ञानोबा माऊली तुकाराम, हो, हो माझा ज्ञानोबा' अशा असंख्य अभंगांनी हि दिंडी भक्तिरसात न्हाहून निघाली.अशा भक्तिमयवातावरणात हा दिंडी सोहळा आमणापूर रोडवरील माऊली मठाकडे प्रशस्त झाला. दिंडीमध्ये सजवलेल्या माऊलीच्या अश्वाचा समावेश होता.

पलूस येथे रंगला माऊलीचा रथ दिंडी सोहळा, श्री संत ज्ञानेश्वर माऊली चॅरिटेबल ट्रस्टचे संयोजन
दिंडी सोहळाImage Credit source: Social Media
| Updated on: Dec 15, 2023 | 12:44 PM
Share

सांगली : संत ज्ञानेश्वर महाराज दिंडी सोहळा (Dindi Sohala) हे महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक आणि धार्मिक वैशिष्ट्य मानले जाते. हातात भगवे ध्वज, वारकऱ्यांचा पारंपरिक वेश, टाळ मृदंग वाजवत, ढोल ताशांचा गजर, करणारे चिमुकले, अबालवृद्ध, नऊवारी साडी परिधान करून डोक्यावर तुळस, मुखी ज्ञानोबा माऊली यांचा जयघोष करीत ज्ञानोबा – माऊलींची दिंडी पलूसचे आराध्य दैवत श्री धोंडीराज महाराज मंदिरापासून निघाली. या दिंडी चे संयोजन श्री संत ज्ञानेश्वर माऊली चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले.

वारकरी झाले अभंगात मग्न

‘विठाई माझी, माझी विठाई, माझे पंढरीचे आई, ज्ञानोबा माऊली तुकाराम, हो, हो माझा ज्ञानोबा’ अशा असंख्य अभंगांनी हि दिंडी भक्तिरसात न्हाहून निघाली.अशा भक्तिमयवातावरणात हा दिंडी सोहळा आमणापूर रोडवरील माऊली मठाकडे प्रशस्त झाला. दिंडीमध्ये सजवलेल्या माऊलीच्या अश्वाचा समावेश होता. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या या दिंडी सोहळ्याने संपूर्ण पलूस शहरात सगळीकडे मांगल्याचे आणि चैतन्याचे वातावरण दिसून येत आहे.

शहरातील भाविकांनी दिंडीच्या पायावर पाणी घालत, पदस्पर्शकरीत भक्तीभावाने माऊलीच्या मुर्तीचे दर्शन घेतले. यावेळी महिला वर्गाने दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. या दिंडीमागे हार फुलांनी सजवलेल्या रथातून आणलेली श्री संत ज्ञानेश्वर माऊलींची मनमोहक मुर्ती माऊली मठामध्ये प्रस्थापित करण्यात येणार आहे. पलूस आमणापूर रोड वरील विठ्ठलवाडी रेल्वे गेटजवळ भव्य माऊली मठाचे निर्माण होत आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात उंच श्री संत ज्ञानेश्वर माऊलींची 108 फुटांची भव्यदिव्य मुर्ती विराजमान करण्याचा संकल्प श्री संत ज्ञानेश्वर माऊली चॅरिटेबल ट्रस्टचे ट्रस्टी बाळकृष्ण पवार यांनी केला आहे.

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.