भारतातील ‘या’ मंदिरांमध्ये पुरुषांना “नो एन्ट्री”, जाणून घ्या यामागील कारण…

तुम्ही भारतातील अशा अनेक मंदिरांबाबत ऐकलं असेल जिथे महिलांना जाणे किंवा पूजा (Men Are Not Allowed In Temples) करण्याची परवानगीही नाही.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:49 PM, 29 Mar 2021
भारतातील 'या' मंदिरांमध्ये पुरुषांना "नो एन्ट्री", जाणून घ्या यामागील कारण...
Men Are Not Allowed In Temples

मुंबई : तुम्ही भारतातील अशा अनेक मंदिरांबाबत ऐकलं असेल जिथे महिलांना जाणे किंवा पूजा (Men Are Not Allowed In Temples) करण्याची परवानगीही नाही. पण आज आम्ही तुम्हाला अशा मंदिरांबाबत सांगणार आहोत जिथे पुरुषांसाठी काही विशेष नियम बनवण्यात आले आहेत. या मंदिरांमध्ये पुरुषांचा जाणे वर्जित आहे. चला जाणून घेऊ या मंदिरांबाबत आणि त्यामागील आख्यायिकांबाबत (Men Are Not Allowed In These Temples In India)-

चक्कुलाथुकावु मंदिर

हे मंदिर केरळच्या नीरात्तुपुरममध्ये आहे. या मंदिराला महिलांचं सबरीमाला मंदिर म्हटलं जातं. मान्यता आहे की या ठिकाणी दुर्गा देवीने शुम्भ आणि निशुम्भ या राक्षसांचा वध केला होता. डिसेंबरच्या महिन्यात येथे पुरुष पूजारी महिलांसाठी 10 दिवसांचा उपवास ठेवतात आणि या महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी येथे नारी पूजा होते. याला धनु म्हटलं जातं. यादरम्यान 10 दिवसांपर्यंत उपवास करणारे पुरुष महिलांचे पाय धुतात. नारी पूजादरम्यान मंदिरात पुरुषांना प्रवेश वर्जित असतो.

ब्रह्माजींचं मंदिर

पुष्करमध्ये ब्रह्माजी यांचं एकमात्र मंदिर आहे. या मंदिरात विवाहित पुरुषांना जाण्याची परवानगी नाही. मान्यता आहे की विवाहित पुरुष जर येथे आले तर त्यांच्या जीवनात दु:ख येतं. त्यामुळे ते फक्त मंदिराच्या आंगनात येऊन दर्शन घेतात. मंदिराच्या आत जाऊन फक्त महिला पूजा करतात.

कोट्टनकुलंगरा मंदिर

कन्याकुमारीमधील या मंदिरात देवी भगवतीची पूजा केली जाते. मान्यता आहे कीया ठिकाणी सती देवीच्या पाठीचा कणा पडला होता. या मंदिरात फक्त महिला आणि तृतीयपंथींना पूजा करण्याचा अधिकार आहे. पुरुषांना या मंदिरात जाणे वर्जित आहे. जर कोणी पुरुष मंदिरात जाऊ इच्छित असेल तर त्याला महिलाप्रमाणे सोळा श्रुंगार करुन जावं लागेल.

कामाख्या मंदिर

कामाख्या मंदिर हे आसामची राजधानी दिसपूर येथून तब्बल 7 किमी दूर आहे. याला देवीच्या शक्तिपीठांपैकी एक मानलं जातं. मान्यता आहे की येथे देवी सतीचा गर्भ आणि योनी पडली होती. येथे देवीला तीन दिवसांपर्यंत पाळीही असते. देवीच्या माहवारी उत्सवादरम्यान या मंदिरात पुरुषांना जाणे प्रतिबंधित असते. या दरम्यान फक्त महिला पुजारीच देवीची पूजा करतीात. हे एकमात्र असं मंदिर आहे जिथे महिलांना पाळी दरम्यानही जाण्याची परवानगी आहे.

संतोषी देवीचं मंदिर

संतोषी माताचे उपवास आणि पूजा बहुतेक महिलाच करतात. याचे कडक नियमही पाळावे लागतात. संतोषी देवीचं पूजन पुरुषही करु शकतात. पण, शुक्रवारच्या दिवशी संतोषी माताच्या कुठल्याही मंदिरात जाण्यास आणि पूजा करण्यास पुरुषांना मनाई असते.

Men Are Not Allowed In These Temples In India

संबंधित बातम्या : 

Chaitra Maas 2021 : ‘चैत्र’ महिन्यात गोड पदार्थांचं सेवन करु नये, जाणून घ्या यामागील कारण….

Do You Know | जेवणाच्या थाळीत तीन चपात्या ठेवणे अशुभ का मानलं जातं? जाणून घ्या…