AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navratri 2022: नवरात्रीच्या दिवसात केलेल्या ‘या’ उपायांनी घरातला वास्तूदोष होईल दूर

नवरात्रीच्या या पवित्र दिवसांमध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार असतो. या दिवसात काही उपाय केल्यास घरातील वास्तुदोष दूर होऊन समृद्धी नांदते. जाणून घेऊया हे उपाय.

Navratri 2022: नवरात्रीच्या दिवसात केलेल्या 'या' उपायांनी घरातला वास्तूदोष होईल दूर
नवरात्र Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Sep 24, 2022 | 10:36 AM
Share

मुंबई,  येत्या 26 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला (Navratri 2022) सुरुवात होत आहे. नवरात्रीच्या काळात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते.  या नऊ दिवसांमध्ये पवित्रता आणि शुद्धतेला विशेष महत्त्व आहे. नवरात्रीच्या दिवसात केलेल्या उपासनेचे विशेष फळ मिळते अशी धार्मिक मान्यता आहे. आयुष्यात सुख शांती लाभण्यासाठी नवरात्रीच्या दिवसात देवीच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. याशिवाय नवरात्रीत केलेल्या काही उपायांनी घरातला वास्तूदोष (Wastudosh) देखील दूर करता येतो.

  1. नवरात्रात घराच्या मुख्य दारावर देवीचे पाऊलं लावावी या पाउलांचा पुढचा भाग घराच्या दिशेने असावा. रोज आंघोळ झाल्यानंतर या पाऊलांवर हळद कुंकू वाहावे. असे केल्याने देवीचा आशीर्वाद मिळतो आणि घरात कधीही धन-वैभवाची कमतरता भासत नाही.
  2. ज्या घरात घटस्थापना केली आहे, त्यांनी नवरात्रीच्या दिवशी 9 कुमारिकांचे कन्या भोजन करावे. याशिवाय आपल्या क्षमतेनुसार दक्षिणा द्यावी. असे केल्याने देवी प्रसन्न होते आणि घरातील वास्तुदोष दूर होतात असे मानले जाते.
  3. जर तुम्ही दुर्गापूजेसाठी अखंड ज्योत प्रज्वलित केली असेल तर त्याची दिशा आग्नेय दिशेला ठेवावी. वास्तुशास्त्रानुसार यामुळे घरातील सर्व दोष दूर होतात. घरातील सदस्यांचे आजार दूर होतात आणि हितशत्रूंपासून बचाव होतो.
  4. देवीसमोर लावलेल्या दिव्यात तूप किंवा तिळाचे तेल टाकावे. तुपाचा दिवा देवीच्या उजव्या बाजूला म्हणजेच आपल्या डाव्या बाजूला आणि तिळाच्या तेलाचा दिवा देवीच्या डाव्या बाजूला लावावा.
  5. नवरात्रीच्या दिवसात घरात सकाळ संध्याकाळ कापूर जाळावा. हा कपूर घरातील सर्व खोल्यामध्ये फिरवावा. यासोबतच सकाळी आणि संध्याकाळी घरात शंख वाजवावा याने घरातील नकारात्मकता दूर होते.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत