नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी ४ राशींना मिळणार शुभ संकेत! कन्या, तूळसह कोणत्या राशींचं नशीब बदलणार?

Navratri 2026: नवरात्रीचा काळ काहींसाठी आनंदाची बातमी घेऊन येऊ शकतो. ज्योतिषीय अंदाजानुसार, या काळात 4 राशींच्या आयुष्यात महत्त्वाचे बदल घडण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया, कोणत्या आहेत या राशी

नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी ४ राशींना मिळणार शुभ संकेत! कन्या, तूळसह कोणत्या राशींचं नशीब बदलणार?
या चार राशींचा होणार मोठा लाभ
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Edited By: | Updated on: Oct 10, 2026 | 10:13 PM

नवरात्रीच्या नऊ दिवसांना हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या काळात दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा आणि साधना करण्याला विशेष महत्त्व आहे. यंदा ११ ऑक्टोबरपासून नवरात्रीला सुरुवात होत असून, पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाणार आहे. या दिवशी विधिवत घटस्थापना करून घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना केली जाते. नवरात्रीचा हा काळ भक्तीसोबतच नव्या सुरुवातीसाठीही शुभ मानला जातो. दरम्यान, ज्योतिषशास्त्रानुसार या नवरात्रीत काही राशींच्या आयुष्यात महत्त्वाचे बदल घडण्याची शक्यता आहे. नोकरी, व्यवसाय, आर्थिक स्थिती आणि कौटुंबिक जीवनात कोणते बदल जाणवू शकतात, याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. काही राशींसाठी नव्या संधी निर्माण होण्याचे संकेत आहेत, तर काहींना महत्त्वाचे निर्णय घेताना सावध राहण्याची गरज भासू शकते. चला तर मग, जाणून घेऊया नवरात्रीचा काळात कोणत्या ४ राशींसाठी शुभ ठरणार आहे.

कन्या

Loading...

नवरात्रीच्या सुरुवातीला कन्या राशीच्या व्यक्तींचं लक्ष कामकाजावर केंद्रित राहू शकते. बऱ्याच काळापासून रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न कराल. नोकरी करणाऱ्यांनी आपल्या जबाबदाऱ्यांकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. कामात छोटीशी चूकही अडचण वाढवू शकते, त्यामुळे घाईघाईने निर्णय घेणे टाळा. कौटुंबिक विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

तूळ

तूळ राशीच्या व्यक्तींसाठी नातेसंबंध आणि संवाद महत्त्वाचे ठरू शकतात. जुन्या मतभेदांवर तोडगा काढण्याची संधी मिळू शकते. नोकरी किंवा व्यवसायात स्वतःची मतं प्रभावीपणे मांडता येतील. मात्र, इतरांच्या बोलण्यावर लगेच प्रतिक्रिया देणे टाळा. आर्थिक व्यवहार करताना विचारपूर्वक निर्णय घेणे फायदेशीर ठरू शकते.

कर्क

कर्क राशीच्या व्यक्तींनी आपली ऊर्जा योग्य कामांसाठी वापरण्यावर भर द्यावा. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात. कुटुंबाशी संबंधित एखादं महत्त्वाचं कामही समोर येण्याची शक्यता आहे. नोकरीत मेहनतीला महत्त्व असेल. कोणतंही काम घाईत पूर्ण करण्याऐवजी त्याचं योग्य नियोजन करा. तसेच, अनावश्यक खर्च टाळून आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवा.

मीन

मीन राशीच्या व्यक्तींनी या काळात संयम राखून पुढे जाणं गरजेचे आहे. एखादं काम अपेक्षेपेक्षा उशिरा झाले, तरी निराश होऊ नका. नोकरी आणि व्यवसायात नियोजनानुसार काम करण्याचा प्रयत्न करा. कुटुंबातील व्यक्तींचा सल्ला उपयोगी ठरू शकतो. पैशांशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सर्व बाजूंचा विचार करा.

(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us