AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 10 June 2022: ‘या’ लोकांना मिळेल कामाचे इच्छित फळ; आजचा शुभ अंक आणि शुभ रंग

अंकशास्त्रात (Numerology 10 June 2022) , एखाद्या व्यक्तीचा मूलांक हा त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज असतो. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीचा जन्म 23 एप्रिल रोजी झाला असेल, तर त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज 2+3=5 आहे. म्हणजेच 5 या अंकाला त्या व्यक्तीचे मूलांक म्हटले जाईल. जर एखाद्याची जन्मतारीख दोन अंकी म्हणजेच 11 असेल तर त्याची मूलांकिका 1 + 1 = […]

Numerology 10 June 2022: 'या' लोकांना मिळेल कामाचे इच्छित फळ; आजचा शुभ अंक आणि शुभ रंग
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jun 10, 2022 | 9:19 AM
Share

अंकशास्त्रात (Numerology 10 June 2022) , एखाद्या व्यक्तीचा मूलांक हा त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज असतो. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीचा जन्म 23 एप्रिल रोजी झाला असेल, तर त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज 2+3=5 आहे. म्हणजेच 5 या अंकाला त्या व्यक्तीचे मूलांक म्हटले जाईल. जर एखाद्याची जन्मतारीख दोन अंकी म्हणजेच 11 असेल तर त्याची मूलांकिका 1 + 1 = 2 असेल. तर एकूण जन्मतारीख, जन्म महिना आणि जन्म वर्ष याला भाग्यांक (10 June lucky number) म्हणतात. उदाहरणार्थ, जर एखाद्याचा जन्म 22-04-1996 रोजी झाला असेल तर या सर्व संख्यांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. 2+2+0+4+1+9+9+6=33=6 म्हणजे त्याचा भाग्यांक 6 आहे. अंकशास्त्राच्या मदतीने तुम्ही तुमच्या दैनंदिन योजना यशस्वी करू शकता. अंकशास्त्राच्या आधारे तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही हे दैनिक अंकशास्त्रानुसार तुम्हाला कळू शकेल. आज तुम्हाला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात. दैनिक अंकशास्त्र अंदाज वाचून, तुम्ही दोनीही परिस्थितीसाठी तयार राहाल.

  1. अंक-1 आजचा दिवस संमिश्र जाईल. उत्पन्न आणि खर्च दोन्ही असतील. पैशांचे नियोजन केल्याने बचत होईल. मात्र येत्या काही दिवसांत खर्च वाढू शकतो. विवाह इच्छुकांना मागणी येऊ शकते. मेहनतीचे फळ मिळेल. कायदेशीर बाबींमध्ये यश मिळेल. शुभ अंक- 9 शुभ रंग – गुलाबी
  2. अंक- 2 पैसे कमवण्याचा दिवस आहे. आर्थिक प्रगती करू शकाल. कामाच्या ठिकाणी आज तुम्ही तणावात राहू शकता. कार्यालयीन सहकाऱ्यांपासून सावध राहा, तुमच्याबद्दल चहाड्या होऊ शकतात. भविष्यातील योजना बनवण्यासाठी जोडीदाराचे सहकार्य मिळेल. कमी अंतराचा प्रवासही शक्य आहे. शुभ अंक- 5 शुभ रंग – निळा
  3. अंक-3 नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. नशीब साथ देईल. बुद्धीचातुर्यामुळे  रखडलेली कामे मार्गी लागतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. प्रियकराला संतुष्ट करण्यासाठी तुम्हाला अधिक प्रयत्न करावे लागतील. शुभ अंक- 9   शुभ रंग – पिवळा
  4. अंक- 4 दिवसभर उत्साह असेल. महत्वाचा निर्णय घेण्यापूर्वी विचार करा. कामाच्या ठिकाणी कौशल्य पाहून लोक प्रभावित होतील आणि आदरही मिळेल. व्यावसायिक प्रवास फायदेशीर ठरेल. नवीन करार होऊ शकतो. शुभ अंक- 11 शुभ रंग – लिंबू
  5. अंक -5 आज भरपूर पैसा आणि नफा तुमच्या नशिबात आहे . ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल.  रागाला आवार घाला. शुभ अंक- 12 शुभ रंग – हलका निळा
  6. अंक- 6 आज तुम्हाला काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कामाचे इच्छित फळ मिळेल. शुभ अंक- 10 शुभ रंग – हलका निळा
  7. अंक-  7 आरोग्याच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस चांगला त्रासदायक असेल. थकवा आणि अशक्तपणा जाणवल्याने तुमची चिडचिड होऊ शकते. परीक्षेत यश मिळेल. पैसा जपून वापरा. शुभ अंक – 3 शुभ रंग – भगवा
  8. अंक- 8 नोकरदार लोकांसाठी आजचा दिवस खूप शुभ आणि यशस्वी राहील. कामाच्या ठिकाणी सम्मान मिळेल. ज्याने तुमचे मन प्रसन्न होईल. दुसरीकडे, व्यवसायात व्यस्त असलेल्या लोकांसाठी दिवस लाभदायक असेल. शुभ अंक- 2 शुभ रंग- तपकिरी
  9. अंक- 9 वाडवडिलांच्या मालमत्तेतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. कार्यालयातून आलेला फोन तुमचा दिनक्रम बदलू शकतो. मित्रांशी बोला, तुमचे मन हलके होईल. शुभ अंक- 25 शुभ रंग- हिरवा

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...