Numerology : या मुलांकाच्या पोरींपासून लांबच राहा… लई डेंजर काम, एकदा भडकल्या की…
Numerology : मूलांकाचा प्रभाव हा त्या व्यक्तीच्या स्वभावावर, विचारांवर आणि वागण्यावरही पडतो. काही मूलांकाच्या मुली खूप शांत आणि समजूतदार असतात, तर काहींना सहज राग येतो. ज्यांचा स्वभाव चिडचिडा असतो आणि त्या सहज रागावतात असा मूलांक कोणाचा, त्या मुलींबद्दल जाणून घेऊया.

Angry Girls Moolank : ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्र देखील खूप महत्वाचे मानले जाते. ज्योतिषशास्त्रात, जन्माच्या वेळी ग्रह आणि ताऱ्यांच्या हालचालींचे निरीक्षण करून जन्मकुंडली तयार केली जाते. एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व आणि भविष्य सांगण्यासाठी जन्मकुंडलीचा वापर केला जाऊ शकतो. तर अंकशास्त्रात हेच काम मूलांकाच्या माध्यमातून केलं जातं. जी जन्मतारखेच्या आधारावर काढली जाते.
अंकशास्त्रानुसार, मूळ संख्येची संख्या ०१ ते ०९ पर्यंत असते. प्रत्येक मूलांक हा कोणत्या ना कोणत्या ग्रहाच्या मालकीचा असतो. अंकशास्त्रात असं सांगितलं आहे की, मुलांकाचा त्या व्यक्तीच्या स्वभावावर, विचारांवर आणि वर्तनावर परिणाम होतो. काही ठराविक मूलांक असलेल्या मुली खूप शांत आणि समजूतदार असतात, तर काहींना सहज राग येतो. आज आम्ही तुम्हाला 1 नंबर असलेल्या मुलींबद्दल सांगणार आहोत ज्यांचा स्वभाव चिडचिडा असतो आणि त्या सहज रागावतात.
01 मूलांक असलेल्या मुली
कोणत्याही महिन्याच्या 1,10, 19 किंवा 28 तारखेला जन्मलेल्या मुलींचा मूलांक 01 असतो. या मूलांकाच्या मुलींमध्ये आत्मविश्वास आणि नेतृत्व क्षमता खूप असते. पण त्यांना त्यांच्या आयुष्यात कोणाचाही हस्तक्षेप आवडत नाही. जर कोणी त्यांच्या निर्णयांमध्ये हस्तक्षेप केला किंवा त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला तर त्या सहजपणे रागावतात.
05 मूलांक असलेल्या मुली
कोणत्याही महिन्यातील 5, 14, किंवा 23 तारखेला जन्मलेल्या मुलींचा मूलांक 5 असतो. मूलांक 5 असलेल्या मुली खूप चपळ आणि सक्रिय असतात. त्यांना आळशीपणा किंवा विलंब केलेला आवडत नाही. त्यांना खूप लवकर राग येतो आणि त्या रागात त्या अगदी घरही उलथवून टाकू शकतात.
09 मूलांक असलेल्या महिला
ज्या मुलींचा किंवा महिलाचा जन्म 09, 18 किंवा 27 तारखेला होता, त्यांचा मुलांक हा 09 असतो. या अंकाच्या मुली खूप उत्साही असतात. त्यांच्यात प्रचंड ऊर्जा असते. पण त्या अगदी छोट्या छोट्याशा गोष्टींवरून रागावू शकतात. त्या थोड्या आक्रमक देखील असू शकतात.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
