AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवघ्या 6 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट ‘बॉर्डर 2’च्या नाकावर टिच्चून करतोय जबरदस्त कमाई

सनी देओलचा 'बॉर्डर 2' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. या चित्रपटाची लाट असतानाही अवघ्या सहा कोटी रुपयांमध्ये बनलेला एक चित्रपट जबरदस्त कमाई करतोय. विशेष म्हणजे या चित्रपटाचा थिएटरमध्ये चौथा आठवडा सुरू आहे.

| Updated on: Jan 27, 2026 | 3:20 PM
Share
हेमंत ढोमे दिग्दर्शित 'क्रांतिज्योती विद्यालय: मराठी माध्यम' हा चित्रपट 1 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला थिएटरमध्ये चार आठवडे पूर्ण झाले आहेत. 'धुरंधर' आणि 'बॉर्डर 2' या चित्रपटांच्या लाटेदरम्यानही हा चित्रपट थिएटरमध्ये टिकून आहे.

1 / 5
'क्रांतिज्योती विद्यालय'ने आतापर्यंत 23.26 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर चौथ्या वीकेंडला 2.77 कोटी रुपयांची कमाई झाली. हा चित्रपट जेव्हा चौथ्या आठवड्यात पोहोचला, तेव्हा त्याला 'बॉर्डर 2'कडून टक्कर मिळत होती. तरीही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

2 / 5
या चित्रपटाविषयी दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाला, 'आता हा चित्रपट माझा राहिला नाही. तो सबंध महाराष्ट्राचा झालाय. एक वर्षापासून या चित्रपटासाठी घेतलेली सर्व मेहनत खऱ्या अर्थाने कामी येतेय. तिकीटबारीवरच्या आकड्यांच्या पलीकडे जाऊन हा चित्रपट काहीतरी वेगळा परिणाम साधतोय, ज्याचा आनंद सर्वाधिक आहे.'

3 / 5
'मला खात्री आहे की मराठी शाळांची ही गौरवगाथा अजून खूप दूर जाणार आहे. आपल्याला मराठी शाळा जपायची आहे, वाढवायची आहे,' अशी भावना त्याने व्यक्त केली आहे. या चित्रपटात अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, प्राजक्ता कोळी, कादंबरी कदम, क्षिती जोग, सचिन खेडेकर, निर्मिती सावंत, हरिश दुधाडे, चिन्मयी सावंत यांच्या भूमिका आहेत.

4 / 5
मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, त्या वाढल्या पहिजेत आणि मातृभाषेतून दर्जेदार शिक्षण देणारी व्यवस्था उभी राहायला हवी, हे सांगणारा ‘क्रांतीज्योती विद्यालय: मराठी माध्यम’ हा चित्रपट आहे. यातील कलाकारांच्या दमदार अभिनयकौशल्याचं प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे.

5 / 5
तुम्हीही काही धुतल्या तांदळासारखे नाहीत, नाईकांना सुनावले
तुम्हीही काही धुतल्या तांदळासारखे नाहीत, नाईकांना सुनावले.
गायिका अंजली भारतींच्या वादग्रस्त वक्तव्यावर किशोरी पेडणेकरांचा निषेध
गायिका अंजली भारतींच्या वादग्रस्त वक्तव्यावर किशोरी पेडणेकरांचा निषेध.
आदिवासी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होतात परंतु अंमलबजावणी...
आदिवासी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होतात परंतु अंमलबजावणी....
औकातीत राहा... नाईक-शिंदे वादात या महिला नेत्याची उडी
औकातीत राहा... नाईक-शिंदे वादात या महिला नेत्याची उडी.
आरती केली, अन्... सयाजी शिंदेंनी केला झाडाचा दणक्यात वाढदिवस
आरती केली, अन्... सयाजी शिंदेंनी केला झाडाचा दणक्यात वाढदिवस.
कोश्यारींना पुरस्कार मिळताच महाराष्ट्रात संतापाची लाट
कोश्यारींना पुरस्कार मिळताच महाराष्ट्रात संतापाची लाट.
पुन्हा परीक्षा पे चर्चा, भारतात किती विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग?
पुन्हा परीक्षा पे चर्चा, भारतात किती विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग?.
आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ZP निवडणुकांची मोठी अपडेट सुनावणीची तारीख..
आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ZP निवडणुकांची मोठी अपडेट सुनावणीची तारीख...
महापौर निवड प्रक्रियेला वेग; भाजप- सेना वेगवेगळा गट स्थापन करणार?
महापौर निवड प्रक्रियेला वेग; भाजप- सेना वेगवेगळा गट स्थापन करणार?.
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?.