AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs Pakistan : एका बड्या मुस्लिम देशाचा राष्ट्र प्रमुख आधी भारतात येऊन गेला, नंतर पाकिस्तानला दिला दणका

India vs Pakistan : पाकिस्तानचा मोठा ट्रेडिंग पार्टनर होता. दोन्ही देशांनी डिफेन्स, एनर्जी आणि इन्वेस्टमेंट इनिशिएटिवमध्ये सहकार्य केलं. पण वेळेबरोबर सुरक्षेचे मुद्दे, लायसन्ससिंग वाद यामुळे संबंध बिघडले.

India vs Pakistan : एका बड्या मुस्लिम देशाचा राष्ट्र प्रमुख आधी भारतात येऊन गेला, नंतर पाकिस्तानला दिला दणका
Pakistan
| Updated on: Jan 27, 2026 | 3:07 PM
Share

संयुक्त अरब अमीरातचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्या तीन तासाच्या भारत दौऱ्याने पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. युनायटेड अरब अमीरातने कथितरित्या इस्लामाबाद इंटरनॅशनल एअरपोर्ट ऑपरेट करण्याचा प्रस्ताव रद्द केला आहे. या प्रोजेक्टसाठी दोन्ही देशांमध्ये ऑगस्ट 2025 पासून बोलणी सुरु होती. पाकिस्तानच्या डेली द एक्सप्रेस ट्रिब्यूनने या निर्णयाची पुष्टि केली आहे. UAE ने सुरुवातीला या प्रोजेक्टमध्ये इंटरेस्ट दाखवला. पण लोकल पार्टनर निवडला नाही. ज्याच्याकडून ऑपरेशन आऊटसोसर्स केलं जाईल. म्हणून या प्रोजेक्टमधून अंग काढून घेतलं, असं सूत्रांच्या हवाल्याने द एक्सप्रेस ट्रिब्यूनने म्हटलं आहे.

पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्समध्ये राजकीय कारणांमुळे ही डील तुटल्याचं स्पष्टपणे म्हटलेलं नाही. पण सध्या UAE आणि सौदी अरेबियामध्ये प्रचंड तणाव आहे. त्यावेळी ही डील तुटली आहे. कधीकाळी आखातामध्ये रियाद आणि अबू धाबी परस्परांचे खूप चांगले मित्र होते. पण येमेनमध्ये परस्परविरोधी गटांचं समर्थन करण्यावरुन त्यांच्यात जाहीर कलगीतुरा रंगला आहे. इस्लामाबादने सौदी अरेबियासोबत एक डिफेंस एग्रीमेंट साइन केलय. सौदी आणि तुर्कीसोबत मिळून पाकिस्तान एक इस्लामिक NATO बनवण्याच्या प्रयत्नात आहे. UAE भारतासोबत नवीन डिफेन्स एग्रीमेंट करुन एका नव्या दिशेने पुढे जात आहे.

भारतासोबत डीफेन्स डीलवर स्वाक्षरी

सप्टेंबर 2025 मध्ये सौदी अरेबियाने पाकिस्तानसोबत एक डिफेन्स एग्रीमेंट साइन केलं. एकावरील हल्ला हा दोन्ही देशांवरील हल्ला मानला जाईल. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि UAE चे राष्ट्रपती या महिन्याच्या सुरुवातीला नवी दिल्लीत आले होते. त्यावेळी त्यांनी स्ट्रेटेजिक डिफेंस पार्टनरशिप पूर्ण करण्यासाठी एका लेटर ऑफ इंटेटवर स्वाक्षरी केली. सौदी अरेबिया पाकिस्तानच्या मिलिट्री एक्सपर्टीजवर विश्वास ठेवतोय. त्याचवेळी UAE भारतासोबत डीफेन्स डीलवर स्वाक्षरी करतोय.

माघार घेणं बरच काही सांगून जातय

जवळपास चार दशकापूर्वी UAE पाकिस्तानचा मोठा ट्रेडिंग पार्टनर होता. दोन्ही देशांनी डिफेन्स, एनर्जी आणि इन्वेस्टमेंट इनिशिएटिवमध्ये सहकार्य केलं. पण वेळेबरोबर सुरक्षेचे मुद्दे, लायसन्ससिंग वाद यामुळे संबंध बिघडले. एअरपोर्ट मॅनेज करण्यात UAE ने आपली क्षमता सिद्ध केली आहे. मात्र, असं असूनही इस्लामाबाद एअरपोर्ट प्रोजेक्टमधून त्यांनी माघार घेणं बरच काही सांगून जातय.

तुम्हीही काही धुतल्या तांदळासारखे नाहीत, नाईकांना सुनावले
तुम्हीही काही धुतल्या तांदळासारखे नाहीत, नाईकांना सुनावले.
गायिका अंजली भारतींच्या वादग्रस्त वक्तव्यावर किशोरी पेडणेकरांचा निषेध
गायिका अंजली भारतींच्या वादग्रस्त वक्तव्यावर किशोरी पेडणेकरांचा निषेध.
आदिवासी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होतात परंतु अंमलबजावणी...
आदिवासी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होतात परंतु अंमलबजावणी....
औकातीत राहा... नाईक-शिंदे वादात या महिला नेत्याची उडी
औकातीत राहा... नाईक-शिंदे वादात या महिला नेत्याची उडी.
आरती केली, अन्... सयाजी शिंदेंनी केला झाडाचा दणक्यात वाढदिवस
आरती केली, अन्... सयाजी शिंदेंनी केला झाडाचा दणक्यात वाढदिवस.
कोश्यारींना पुरस्कार मिळताच महाराष्ट्रात संतापाची लाट
कोश्यारींना पुरस्कार मिळताच महाराष्ट्रात संतापाची लाट.
पुन्हा परीक्षा पे चर्चा, भारतात किती विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग?
पुन्हा परीक्षा पे चर्चा, भारतात किती विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग?.
आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ZP निवडणुकांची मोठी अपडेट सुनावणीची तारीख..
आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ZP निवडणुकांची मोठी अपडेट सुनावणीची तारीख...
महापौर निवड प्रक्रियेला वेग; भाजप- सेना वेगवेगळा गट स्थापन करणार?
महापौर निवड प्रक्रियेला वेग; भाजप- सेना वेगवेगळा गट स्थापन करणार?.
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?.