
संकष्टी चतुर्थीचा उपवास तसेच पुजा ही विघ्नहर्ता गणेशाला समर्पित आहे. चतुर्थी तिथी दर महिन्याला येते . पौष महिन्यात येणाऱ्या चतुर्थी तिथीला अखुर्थ संकष्टी चतुर्थी म्हणतात. या दिवशी भाविक भक्ताने मनापासून उपवास केल्याने त्यांचे सर्व अडथळे नष्ट होतात आणि कामात यश मिळते. वैदिक दिनदर्शिकेनुसार यावेळी संकष्टी चतुर्थी व्रत रविवार 7 डिसेंबर 2025 रोजी आहे. ज्यांना बाप्पासह भगवान शिवाचे आशीर्वाद हवे आहेत त्यांनी या दिवशी शिवलिंगाला काही खास वस्तू अर्पण कराव्यात. चला तर मग आजच्या लेखात आपण शिवलिंगावर कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात त्याबद्दल जाणून घेऊयात.
बेलाची पाने आणि दुर्वा
बेलाचे पान भगवान शिव यांना खूप प्रिय आहे, तर दुर्वा भगवान गणेश यांना प्रिय आहे. शिवलिंगाला दोन्ही एकत्र अर्पण केल्याने भगवान शिव आणि गणेश दोघांचेही आशीर्वाद तुम्हाला मिळतील आणि जीवनातील अडचणी कमी होण्यास मदत होते.
मध हे पवित्रता आणि गोडवा यांचे प्रतीक आहे. शिवलिंगावर मधयुक्त पाण्याने अभिषेक केल्याने आजार दूर होण्यास मदत होते आणि जीवनात गोडवा येतो. म्हणून तांब्याच्या भांड्यात शुद्ध पाणी, थोडे मध आणि गंगाजल मिक्स करा आणि भगवान शिवाचा अभिषेक करा.
पौष महिन्यात आणि चतुर्थीला तिळाचे विशेष महत्त्व असते. म्हणून या दिवशी काळे तीळ दान करून शिवलिंगाला अर्पण करा. असे केल्याने शनि दोष आणि कालसर्प दोषापासून मुक्तता मिळते.
शिवलिंगावर कच्च्या दुधाने अभिषेक करणे शुभ मानले जाते. यामुळे मानसिक शांती, आनंद आणि समृद्धी मिळते. अभिषेक करताना “ॐ नमः शिवाय” हा मंत्र जप करा.
या शुभ दिवशी शिवलिंगाला गूळ अर्पण करा किंवा पाण्यात गुळ मिक्स करून त्या पाण्याने अभिषेक करा. या उपायांमुळे धन आणि व्यवसायात समृद्धी येते आणि भगवान शिवाचे आशीर्वाद देखील मिळतात.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)