Sawan Somwar 2022 : श्रावण एकादशी सोमवार निमित्त पंढरपुरात भाविकांच्या भक्तीचा महापूर, वैद्यनाथ मंदिरात आकर्षक अशा फुलांची आरास

| Updated on: Aug 08, 2022 | 12:34 PM

आज श्रावण मासातला दुसरा सोमवार असून श्रावण मासाच्या दुसऱ्या सोमवारी ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरात भाविकांनी एकच गर्दी केली आहे.

Sawan Somwar 2022 : श्रावण एकादशी सोमवार निमित्त पंढरपुरात भाविकांच्या भक्तीचा महापूर, वैद्यनाथ मंदिरात आकर्षक अशा फुलांची आरास
Sawan Somwar 2022 : श्रावण एकादशी सोमवार निमित्त पंढरपुरात भाविकांच्या भक्तीचा महापूर, वैद्यनाथ मंदिरात आकर्षक अशा फुलांची आरास
Image Credit source: tv9marathi
Follow us on

परळी : श्रावणाच्या (Shrawan) दुसऱ्या सोमवारी परळीतील (Parali) प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केलीय. यानिमित्त मंदिरात आकर्षक अशा फुलांची आरास करण्यात आली असून यात झेंडूसह गुलाब, मोगरा अशा विविध फुलांची सुंदर आरास करून परिसर भक्तिमय झालाय. ही आरास करण्यासाठी खास हैदराबादहून फुलं आणण्यात आली आहेत. तर यासाठी एक दिवसांचा कालावधी लागला आहे. ही भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडत आहे. तर वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच रांगा लावल्या आहेत. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या वैद्यनाथाच्या दर्शनासाठी राज्यच नाही तर देशातील विविध ठिकाणचे भाविक मंदिर परिसरात आले आहेत. त्यामुळे भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मंदिर प्रशासनाने देखील व्यवस्था केलीये. तर सीसीटीव्हीद्वारे (CCTV) पोलिसांची करडी नजर इथे आहे.

पांडवकालीन घोराडेश्वर मंदिरात पहाटेपासून शिवभक्तांची गर्दी

मावळ येथे श्रावणी सोमवार निमित्ताने मावळातील पांडवकालीन घोराडेश्वर मंदिरात पहाटेपासून शिवभक्तांची गर्दी होऊ लागली आहे. शंकर महादेव यांच्या पिंडीला आकर्षक फुलांची सजावट केली होती. तर गुफेत असलेल्या या पिंडाचं दर्शनासाठी भक्तगण उंच डोंगर माथ्यावर माथा टेकायला आले आहेत.

हे सुद्धा वाचा

श्रावण एकादशी सोमवार निमित्त पंढरपुरात भाविकांच्या भक्तीचा महापूर

श्रावण शुद्ध एकादशी आणि सोमवार हा एकत्र आल्याने पंढरपुरात भाविकांच्या भक्तीला महापूर आला आहे. साधारणपणे दोन लाखाहून अधिकचे भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. अत्यंत भक्तिमय वातावरणात एकादशीचा सोहळा होत आहे.

सोलापूरात देखील श्रावणातल्या दुसऱ्या सोमवार निमित्त ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या समाधी फुलांची आरास

आज श्रावण मासातला दुसरा सोमवार असून श्रावण मासाच्या दुसऱ्या सोमवारी ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरात भाविकांनी एकच गर्दी केली आहे. मंदिरातील शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या योगसमाधीला यावेळी रंगीबेरंगी फुलांनी सजविण्यात आले असून मंदिरात आज पहाटे पासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. श्रावण महिन्याच्या निमित्ताने मंदिरात महिनाभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सिन्नर येथील गोंदेश्वर मंदिराचे अप्रतिम दृश्य

सिन्नर येथील गोंदेश्वर मंदिराचे अप्रतिम दृश्य ड्रोन कॅमेरातून टिपण्यात आले असून हे मंदिर 12 व्या शतकातील असून हे मंदिर पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला शैवपंचायतन असे म्हटले जाते यातील गोंदेश्वर मुख्य शिवमंदिर मध्यावर असून सभोवताली चार उपदिशांना पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांची मंदिरे आहेत. या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक श्रावण सोमवार निमित्त दर्शनास येत असतात.