AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बापरे! बॅटिंग करताना चेंडू थेट प्रायव्हेट पार्टवर बसून 35 वर्षांचा तरुण पीचवरच कोसळला, जागीच मृत्यू

Cricket Death News : तावशी गावातील घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली.

बापरे! बॅटिंग करताना चेंडू थेट प्रायव्हेट पार्टवर बसून 35 वर्षांचा तरुण पीचवरच कोसळला, जागीच मृत्यू
क्रिकेट खेळताना मृत्यूImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Aug 10, 2022 | 12:42 PM
Share

पंढरपूर : पंढरपूरमध्ये क्रिकेट खेळताना गुप्तांगाला चेंडू लागून तरुणाचा मृत्यू (Pandharpur youth died as ball hits his private part) झाला आहे. पंढरपूरच्या तावशी गावातील घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली. क्रिकेट (Cricket Death News) खेळत असताना एका तरुणाच्या गुप्तांगाला चेडूचा मार मारला. त्यानंतर हा तरुण जागच्या जागी कोसळला. विक्रम गणेश क्षीरसागर असं मृत तरुणाचं नाव असून त्याचं वय 35 वर्ष होतं. विक्रमच्या मृत्यूप्रकरणी पंढरपूर (Pandharpur News) तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून त्याच्यासोबत क्रिकेट खेळत असलेल्या मित्रांना मोठा धक्काच बसला आहे. पंढरपूरच्या तावशी गावामध्ये सुरु असलेल्या क्रिकेट सामन्यांच्या स्पर्धेदरम्यान ही ङटना घडली. या तरुणाच्या गुप्तांगावर गोलंदाजाचा वेगवान चेंडू आदळला आणि विक्रम क्षीरसागर हा कळवळला आणि जागीच कोसळला.

सुरक्षेचा तडजोड नकोच

अनेकदा क्रिकेट खेळताना हार्ट अटॅक येऊन मृत्यू झाल्याच्या घटना महाराष्ट्रात याआधीही पाहायला मिळालेल्या आहेत. दरम्यान, आता गुप्तांगावर चेंडू लागल्यानं तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आल्यानं क्रिकेट खेळणाऱ्या सगळ्यांना हादरा बसलाय. प्रोफेशनल क्रिकेट खेळताना हेल्मेट, पॅड, आणि सुरक्षेच्या इतर साधनांसह फलंदाजी करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटसोबत राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमध्येही आता फलंदाजांच्या सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य दिलं जातं. फलंदाजाच्या डोक्याला बॉल लागला, तर तातडीने वैद्यकीय तपासणीही केली जाते. मात्र गावागावात खेळवल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने कितपत काळजी घेतली जातेय, यावरच सवाल उपस्थित केले जातात.

नेमकं काय घडलं?

अशातच पंढरपूरच्या तावशी इथं मॅच सुरु असताना विक्रम हा फलंदाजी करण्यासाठी उतरला होता. नेपातगाव या गावच्या संघाकडून विक्रम क्षीरसागर फलंदाजी करत होता. मात्र वेगावान बॉलरच्या गोलंदाचीजा विक्रमला अंदाज आला नाही आणि चेंडू थेट त्याच्या गुप्तांगावर आदळला. यानंतर प्रचंड कळवळलेल्या विक्रमला जबर मार बसला आणि तो मैदानावर कोसळला.

अख्ख मैदान हादरलं

यानंतर मैदानावरही गोंधळ उडाला होता. सर्व खेळाडू विक्रमच्या दिशेनं धावले. पण उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनं क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलेल्या सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. तसंच स्पर्धेसाठी आलेल्या सर्वच खेळांडूही धास्तावले. दरम्यान, याआधीही अनेकदा गावखेड्यात क्रिकेट खेळताना सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्यामुळे जीवघेण्या प्रसंगांना सामोरं जावं लागलेलंय. त्याचमुळे 35 वर्षीय विक्रमचा मृत्यू झाला असून त्याच्या मृ्त्यूमुळे क्षीरसागर कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळलाय.

मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.