Panchak July 2023 : आज दुपारी लागणार रोषरहित पंचक, काय होतो याचा अर्थ?

पंचकमध्ये दक्षिण दिशेला प्रवास करणे, छतासह अनेक कामे करण्यास मनाई आहे. पण ज्या दिवसापासून पंचक सुरू होते, त्या दिवसापासून त्याचा परिणाम दिसून येतो. 

Panchak July 2023 : आज दुपारी लागणार रोषरहित पंचक, काय होतो याचा अर्थ?
पंचक
Image Credit source: Social Media
| Updated on: Jul 07, 2023 | 9:50 AM

मुंबई : आज गुरुवार, 6 जुलैपासून ‘निर्दोष’ म्हणजेच रोषरहित पंचक (Panchak) पाळण्यात येत आहे. हे जुलै महिन्याचे पंचक आहे.  हे पंचक 6 जुलै ते 10 जुलै पर्यंत आहे. मराठी श्रावण महिना 18 जुलैपासून सुरू होणार असला तरी हिंदी श्रावण महिन्याला सुरवात झाली आहे. पहिल्या सोमवारी 10 जुलै रोजी उपवास आहे. पंचकमध्ये दक्षिण दिशेला प्रवास करणे, छतासह अनेक कामे करण्यास मनाई आहे. पण ज्या दिवसापासून पंचक सुरू होते, त्या दिवसापासून त्याचा परिणाम दिसून येतो.  पंचकचा आरंभ आणि शेवटचा काळ कोणता आहे? या पंचकचा काय परिणाम होईल? हे जाणून घेऊया.

‘निर्दोष’ पंचक म्हणजे काय?

पंचांगानुसार बुधवार आणि गुरुवारी पंचक सुरू होते. हे दोषरहित पंचक आहे कारण त्या पंचकमध्ये शुभ कार्य करण्यास मनाई नाही. अशा पंचकांचा अशुभ परिणाम होत नाही.

पंचक 2023 सुरुवातीपासून शेवटपर्यंत

पंचांगाच्या आधारावर पाहिले तर आज दुपारी 01:38 पासून पंचक सुरू होत आहे आणि आज भाद्रा सुद्धा होती. पंचकातील तिसऱ्या आणि चतुर्थी दिवशी भद्राचे वास्तव्य असते. हे दोन्ही भद्रा पृथ्वीचे आहेत. भद्रामध्ये शुभ कार्य करण्यास मनाई आहे.

  • 6 जुलै, गुरुवार: पंचक सुरू, वेळ: 01:38 PM ते उद्या 05:29 AM, भाद्रा: 05:29 AM ते 06:30 AM
  • 7 जुलै, शुक्रवार: दिवसभर पंचक
  • 8 जुलै, शनिवार: दिवसभर पंचक, भाद्र: रात्री 09:51 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 05:30
  • 9 जुलै, रविवार: दिवसभर पंचक, भाद्र: सकाळी 05:30 ते सकाळी 08:50
  • 10 जुलै, सोमवार: पंचक सकाळी 05:30 ते संध्याकाळी 06:59

पंचकशी संबंधित 5 महत्त्वाच्या गोष्टी

1. अशुभ नक्षत्रांच्या संयोगाने बनते. जेव्हा चंद्र कुंभ आणि मीन राशीत असतो, धनिष्ठ नक्षत्र, शतभिषा, पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपद आणि रेवती नक्षत्रात भ्रमण करतो, तेव्हा त्या काळाला पंचक म्हणतात.

2. जर पंचक शनिवारी सुरू झाले तर त्याला मृत्यु पंचक म्हणतात, जर रविवारपासून पंचक सुरू झाले तर त्याला रोग पंचक म्हणतात.

3. शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या पंचकांना चोर पंचक म्हणतात, तर सोमवारी सुरू होणाऱ्या पंचकांना राज पंचक आणि मंगळवारी सुरू होणाऱ्या पंचकांना अग्नि पंचक म्हणतात.

4. पंचक काळात आग लागण्याची भीती, धनहानी, रोग, आर्थिक शिक्षा आणि कुटुंबात कलह होण्याची शक्यता आहे.

5. धार्मिक मान्यतेनुसार पंचकमध्ये कोणाचा मृत्यू झाल्यास योग्य पंडिताच्या सल्ल्याने गुरुड पुराणात सांगितलेल्या पद्धतीनुसार अंतिम संस्कार करावेत. यामुळे पंचकातील दोष दूर होतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)