Pandharpur wari 2022: पास दाखवा टोल फ्री प्रवास करा; पोलिसांकडून वारकऱ्यांच्या वाहनांसाठी टोल फ्री पासचं वाटप

आषाढी वारीसाठी (Pandharpur Wari 2022) पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठीसाठी, पुणे-सातारा महामार्गावरील खेड शिवापूरच्या राजगड पोलीस स्टेशनच्या पोलिसांकडून टोल फ्री (toll free for pandharpur) पासचं वाटप करण्यात येत आहे. आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi ekadashi) पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी हा मार्ग टोल फ्री करण्याचा निर्णय शासनाने घेतलाय, त्या पाश्वभूमीवर या पासचे वाटप करण्यात येत आहे. त्यामुळं […]

Pandharpur wari 2022: पास दाखवा टोल फ्री प्रवास करा; पोलिसांकडून वारकऱ्यांच्या वाहनांसाठी टोल फ्री पासचं वाटप
Follow us
| Updated on: Jul 09, 2022 | 10:31 AM
आषाढी वारीसाठी (Pandharpur Wari 2022) पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठीसाठी, पुणे-सातारा महामार्गावरील खेड शिवापूरच्या राजगड पोलीस स्टेशनच्या पोलिसांकडून टोल फ्री (toll free for pandharpur) पासचं वाटप करण्यात येत आहे. आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi ekadashi) पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी हा मार्ग टोल फ्री करण्याचा निर्णय शासनाने घेतलाय, त्या पाश्वभूमीवर या पासचे वाटप करण्यात येत आहे. त्यामुळं पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांनी या ठिकाणाहून पास घेऊन जाण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर वारकऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेतला. आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला कुठलाही टोल लागणार नाही असे जाहीर केले, मात्र त्यासंबंधी शासनाचा जी आर न काढल्याने नियमानुसार टोल नाक्यावर टोल आकारला जातोय.
यावर तोडगा म्हणून पोलीस स्टेशनमधून पास देण्यात येत आहे. हे पास टोल नाक्यावर दाखवून मोफत प्रवास करता येणार आहे. त्यामुळे विठुरायाच्या भक्तांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. आषाढी एकादशी निमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक पंढरपूरला दर्शनाला जातात. आधीच इंधनाचे दर गगनाला भिडल्यामुळे सामान्यांचे बजेट कोलमडले आहे. टोलमाफीचा निर्णय घेतल्याने काही प्रमाणात तरी यावर दिलासा मिळेल.

विठुरायाच्या शासकीय महापूजेची तयारी पूर्ण

आषाढी एकादशीची महापूजा (Pandharpur Mahapuja) संपन्न करण्याचा मान यंदा चार पुजारी मंडळींना मिळाला आहे. या पूजेचं एक वेगळे पण असते. आषाढी एकादशीची महापूजा ही महत्वाची असते. कारण या दिवशी महाराष्ट्रातील कोट्यवधी जनतेचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री ही पूजा करतात. यंदा महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते ही पूजा पार पडणार आहे. याशिवाय वारीमध्ये आलेल्या एका जोडप्याला मुख्यमंत्र्यांसोबत पूजा करण्याचा मान मिळतो. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील संदीप कुलकर्णी, कृष्णा नामदास ,सुनील गुरव, आष्टेकर हे पुजारी ही एकादशीची महापूजा संपन्न करतील. मंदिर व्यवस्थापनाकडून महापूजेची तयारी पुर्ण झाली आहे.

कशी असणार महापूजा

चार प्रमुख पुजारी पैकी संदीप कुलकर्णी यांच्याकडे प्रमुख म्हणजे मंत्रोच्चार करण्याचे काम असते. यामुळे त्या दिवशी संपूर्ण वातावरण मंगलमय झालेले असते. तर या मंत्रोच्चार प्रमाणे उपचार करण्याची जबाबदारी सुनील गुरव यांच्याकडे असते. देवाला स्नान घालणे गंध लावणे, पोशाख करणे, मुकुट डोक्यावर ठेवणे इत्यादींचा यामध्ये समावेश असतो. महापूजा करते वेळी मंत्रोच्चार करणे जसे महत्वाचे आहे. अगदी त्याच पद्धतीने पंढरपुरात देवा समोर यावेळी अभंग म्हणण्याची परंपरा आहे. यामधून वारकऱ्यांची देवाप्रती असलेली भावना मांडली जाते. ती जबाबदारी केशव नामदास पार पाडतात. अशा मंगलमय वातावरणात ही महापूजा संपन्न होते.
Non Stop LIVE Update
दोन मुडदे पडलेत आणि आरोपीला पिझ्झा-बर्गर, पुणे अपघातावर राऊत आक्रमक
दोन मुडदे पडलेत आणि आरोपीला पिझ्झा-बर्गर, पुणे अपघातावर राऊत आक्रमक.
कपिल पाटलांकडून निवडणूक आणि पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ? नेमकं काय घडल?
कपिल पाटलांकडून निवडणूक आणि पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ? नेमकं काय घडल?.
पोलिसांवर दबाव? पुणे अपघात प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त काय म्हणाले?
पोलिसांवर दबाव? पुणे अपघात प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त काय म्हणाले?.
ठाकरे कुटुंब लंडनला पळून जाण्याच्या तयारीत, भाजप नेत्याचं वक्तव्य
ठाकरे कुटुंब लंडनला पळून जाण्याच्या तयारीत, भाजप नेत्याचं वक्तव्य.
या जिल्ह्यातील विद्यार्थीन 12 वीत पटकावले 100 %; सांगितला फ्युचर प्लॅन
या जिल्ह्यातील विद्यार्थीन 12 वीत पटकावले 100 %; सांगितला फ्युचर प्लॅन.
संजय शिरसाट म्हणाले, कितीही मोठ्या बापाचा माजलेला लेक असला तरीही…
संजय शिरसाट म्हणाले, कितीही मोठ्या बापाचा माजलेला लेक असला तरीही….
बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरला 'हे' 2 पर्याय अन् घरासमोर आंदोलनाचा इशारा
बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरला 'हे' 2 पर्याय अन् घरासमोर आंदोलनाचा इशारा.
पिसारा फुलवणाऱ्या मोरासोबत सेल्फी काढलाय? व्हिडीओ बघा, तुम्ही म्हणाल..
पिसारा फुलवणाऱ्या मोरासोबत सेल्फी काढलाय? व्हिडीओ बघा, तुम्ही म्हणाल...
EVM हॅकचा प्रयत्न फसला म्हणून... संजय राऊतांचा भाजपसह आयोगावर हल्लाबोल
EVM हॅकचा प्रयत्न फसला म्हणून... संजय राऊतांचा भाजपसह आयोगावर हल्लाबोल.
झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ठाण्यात एकच चर्चा
झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ठाण्यात एकच चर्चा.