AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pandharpur Wari 2022: पुणे ते पंढरपूर पायी दिंडीपुढे मनमोहक रांगोळीद्वारे पांडुरंगाची भक्ती

आषाढी वारीच्या (Pandharpur Wari 2022) पालखीसोहळ्यात अनेकजण आपली सेवा बजावतात. त्यातीलच माऊलींचे भक्त असणाऱ्या राजश्री भागवत (Rajashri Bhagwat) या एक आहेत. राजश्री मागील अकरा वर्षापासून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीपुढे मनमोहक रांगोळीद्वारे पांडुरंगाची सेवा बजावत आहेत. यंदाच्या वर्षी त्या पाच महिन्याच्या विराजसह संपूर्ण कुटुंबासहित वारीत सामील झाल्यात. कोण आहे राजश्री भागवत जुन्नरकर या नातेपुते गावाच्या रहिवाशी आहेत. […]

Pandharpur Wari 2022: पुणे ते पंढरपूर पायी दिंडीपुढे मनमोहक रांगोळीद्वारे पांडुरंगाची भक्ती
| Updated on: Jul 07, 2022 | 3:37 PM
Share

आषाढी वारीच्या (Pandharpur Wari 2022) पालखीसोहळ्यात अनेकजण आपली सेवा बजावतात. त्यातीलच माऊलींचे भक्त असणाऱ्या राजश्री भागवत (Rajashri Bhagwat) या एक आहेत. राजश्री मागील अकरा वर्षापासून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीपुढे मनमोहक रांगोळीद्वारे पांडुरंगाची सेवा बजावत आहेत. यंदाच्या वर्षी त्या पाच महिन्याच्या विराजसह संपूर्ण कुटुंबासहित वारीत सामील झाल्यात. कोण आहे राजश्री भागवत जुन्नरकर या नातेपुते गावाच्या रहिवाशी आहेत. दरवर्षी त्या आळंदी ते पंढरपुर 250 किलोमीटरच्या अंतरावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखीच्या मार्गावर पालखी समोर रांगोळीच्या घालतात. अत्यंत वेगाने रांगोळी काढण्यात त्यांचा हात कोणीच धरू शकत नाही. यासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.  पालखी मार्गावर  धावत जावून त्या रांगोळी काढतात.  आपल्या या रांगोळीच्या कलेद्वारे त्या गेली 11 वर्षे  वारीत सेवा देत आहेत. रांगोळीच्या माध्यमातुन लेक वाचवा, महिला सुरक्षा, पाणी वाचवा, स्वच्छ वारी निर्मल वारी,प्लॅस्टीक मुक्‍त वारी असे समाजप्रबोधनाचे प्रभावी संदेश त्या देतात.

वारकऱ्यांची पावले जशी पंढरीच्या दिशेने वेगाने चालतात तशीच राजश्री या धावत रांगोळी काढतात. आश्चर्यकारक बाब म्हणजे रांगोळीत जे शब्द लिहायचे असतात ते शब्द त्या उलट्या दशेने लिहितात. तरीही ती अक्षरे रेखीव व सुबक असतात. 1 किलोमीटर रांगोळी काढण्यासाठी त्यांना फक्त 15  मिनिटांचा वेळ लागतो. तर एका अश्व रिंगणाला पूर्ण गोलाकार रांगोळी काढण्यासाठी त्यांना 11  मिनिटे लागतात.  यावरून त्यांचा रांगोळी काढण्याचा वेग किती असेल याचा अंदाज आपण बांधू शकतो. जिथे जिथे पालखी विसावेल तेथे तेथे त्या रांगोळीच्या पायघड्या घालतात.

नाभिक समाजाकडून मोफत दाढी कटिंग सेवा

मजल दर मजल पंढरपूरच्या (Pandharpur wari 2022) दिशेने मार्गस्थ होत असलेल्या वारकऱ्यांना वाटेत अनेक सेवेकरी सेवा देतात. कोणी अन्नदान करतो तर कोणी राहण्याची व्यवस्था. आपापल्या परीने प्रत्येकजण या वारीची सेवा करतो. अशीच एक सेवा नाभिक समाजाकडून देण्यात आली.   पंढरपुरकडे पायी चालत चाललेल्या वारकऱ्यांची मोफत दाढी कटींग करण्यात आली. कुर्डूवाडी नाभिक असोसिएशनच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. सामाजीक बांधिलकीतुन विठुरायाच्या आणी वारकऱ्यांच्या सेवेचे सदभाग्य लाभत असल्याने हा उपक्रम राबवत असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप कोकाटे यांनी बोलताना सांगितले.

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.