दिवाळीत दिवा लावताना, त्याखाली ही वस्तू नक्की ठेवा; तुम्हाला लवकरच त्याचे चांगले परिणाम दिसतील
दिवाळीत दिवे लावण्याची परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे. पण हे बऱ्याच जणांना माहित नसेल की दिवा लावताना एक वस्तू फार महत्त्वाची असते जी दिव्याखाली ठेवणे फार महत्त्वाची असते. ही वस्तू समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते. चला जाणून घेऊयात की ती वस्तू कोणती आहे ते?

भारतात, दिवाळी हा केवळ दिवे आणि मिठाईचा सण नाही तर तो घरात आनंद, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा आणण्याचे प्रतीक मानला जातो. या दिवशी लोक आपली घरे स्वच्छ करतात, दिवे लावतात आणि देवी लक्ष्मीच्या स्वागताची तयारी करतात.
दिवाळीत दिव्यांची आरास फार महत्त्वाची असते.
मुख्य म्हणजे दिवाळीत दिव्यांची आरास फार महत्त्वाची असते. कारण दिवाळी या सणाला मुळातच दिव्यांचा, रोशनाईचा सण म्हणतात. पण तुम्हाला माहितीये का ती दिवे लावताना एक गोष्ट फार महत्त्वाची असते. ज्यामुळे दिव्याचे महत्त्व अजून वाढते. त्यामुळे समृद्धी, शांतीही घराला लाभते. ही वस्तू म्हणजे तांदूळ.
दिव्याखाली तांदूळ ठेवणे हा या परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे. कदाचित फार कमी लोकांना माहिती असेल की ही प्रथा केवळ एक विधी नाही तर ती एक खोलवर रुजलेली धार्मिक आणि आध्यात्मिक श्रद्धा देखील आहे.
दिव्याखाली ही वस्तू ठेवण्याचे महत्त्व
भारतीय संस्कृतीत, तांदूळ हे समृद्धी, आनंद, शांती आणि अन्नाची सतत उपलब्धता यांचे प्रतीक मानले जाते. ते देवी लक्ष्मीचे आवडते देखील मानले जाते, कारण ते दैवी आशीर्वाद आणि समृद्धीचे प्रतीक आहे. घराच्या विविध ठिकाणी आपण दिवे लावतो. परंतु मुख्य पूजास्थळी दिव्याखाली तांदूळ ठेवणे विशेषतः शुभ मानले जाते.
सत्कर्मात तांदळाचे महत्त्व
सांस्कृतिकदृष्ट्या तांदूळ नेहमीच शुभ मानला गेला आहे. लग्न, जन्म आणि इतर धार्मिक समारंभांमध्ये एवढंच नाही तर सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून वापरला जातो. दिवा आणि तांदळाच्या तेजस्वी ज्योतीचे मिश्रण घरात आनंद आणि समृद्धीचे वातावरण निर्माण करते.
म्हणून दिवाळीत दिवे लावणं असो किंवा तुमच्या देवघरात दिवा लावणे असो. त्याखाली थोडेसे तरी तांदूळ नक्की ठेवा. ही केवळ एक परंपरा नाही तर आनंद, समृद्धी आणि सकारात्मक उर्जा प्रदान करते. तसेच घरातील वातावरणही प्रसन्न राहतं.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
