AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akshardham Temple | अमेरिकेत अक्षरधाम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी शुभेच्छा संदेशात पंतप्रधान मोदींनी काय म्हटलय?

Akshardham Temple | अमेरिकेत न्यू जर्सीमधील रॉबिंसविले येथे भव्य अक्षरधाम मंदिर उभारण्यात आलय. सध्या या मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे कार्यक्रम सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी मंदिरासाठी खास शुभेच्छा संदेश दिलाय.

Akshardham Temple | अमेरिकेत अक्षरधाम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी शुभेच्छा संदेशात पंतप्रधान मोदींनी काय म्हटलय?
PM Modi-Rishi SunakImage Credit source: PTI & X
| Updated on: Oct 03, 2023 | 8:36 AM
Share

न्यू जर्सी : अमेरिकेत न्यू जर्सीमधील रॉबिंसविले येथे बीएपीएस स्वामीनारायण अक्षरधाम मंदिराच उद्घाटन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. भारताबाहेरील आधुनिक काळातील हे मोठ मंदिर असल्याच दोन्ही नेत्यांनी म्हटलं आहे. रॉबिंसविलेमधील बीएपीएस अक्षरधामला पंतप्रधान मोदींनी एक पत्र लिहिलय. बीएपीएस अक्षरधाम संस्था आणि या उपक्रमात सहभागी असलेल्या सर्वांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अक्षरधाम महामंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमातून भारतीय वास्तुशास्त्राची उत्कृष्टता आणि वैभवाशील प्राचीन संस्कृतीच दर्शन घडतं असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. अक्षरधाम महामंदिरामुळे प्रवासी भारतीय खासकरुन युवा वर्ग जोडला जाणार आहे, असं मत मोदींनी व्यक्त केलं.

“या मंदिराच्या सौंदर्याने आम्ही आश्चर्यचकीत झालो. शांतता, सौहार्द आणि मानवतेचा यातून संदेश देण्यात आला आहे” असं ब्रिटीश पंतप्रधान ऋषी सुनक यांनी त्यांच्या संदेशात म्हटलं आहे. 8 ऑक्टोबरला अक्षरधाम महामंदिराच उद्घाटन होणार आहे. “हे फक्त प्रार्थनास्थळ नाहीय. ही एक ओळख आहे. यातून भारतीय मुल्य, संस्कृती आणि जगासाठी दिलेलं योगदान दिसतं” असं ऋषी सुनक यांनी म्हटलय. “भारत आणि अमेरिकेची मैत्री अतूट आहे. दोन्ही देशांच्या नागरिकांमध्ये परस्पर संवादातून हे नातं अधिक भक्कम करण्यात येतय” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ‘आपला भर सेवा आणि स्वत:पलीकडे इतरांचा विचार’

“भारताकडे असलेल्या स्थीय आणि किर्तीवान अध्यात्मिक वारशाच वैश्विक महत्त्व आहे. आपल्या अध्यात्मात सामाजिक संस्कृतीचा वारसा आणि तत्व आहेत. आपलं जे तत्वज्ञान आणि परंपरा आहेत, त्याचा भर सेवा आणि स्वत:पलीकडे इतरांचा विचार यावर आहे” असं पंतप्रधान मोदींनी लिहिलय. 30 सप्टेंबरला शनिवारी अमेरिकेच्या न्यू जर्सीमधील रॉबिंसविले येथे बीएपीएस स्वामीनारायण अक्षरधाम उद्घाटन समारंभाच्या सीरीजचा शुभारंभ केला. सेलिब्रेटिंग सनातन धर्म’ कार्यक्रमात 400 हिंदू संघटना सहभागी झाल्या होत्या.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?