AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pradosh Vrat : या तारखेला आहे ऑक्टोबर महिन्यातला पहिला प्रदोष व्रत, ग्रहदोष दूर करण्यासाठी करा हे उपाय

भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी 12 ऑक्टोबरला येत आहे. गुरूवारी प्रदोष व्रत असल्याने त्याला गुरू प्रदोष असे म्हणतात. प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शंकराची पूजा केल्याने कुंडलीतील ग्रह दोष दूर होतात. असे मानले जाते की प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी भगवान भोलेनाथ शिवलिंगात वास करतात.

Pradosh Vrat : या तारखेला आहे ऑक्टोबर महिन्यातला पहिला प्रदोष व्रत, ग्रहदोष दूर करण्यासाठी करा हे उपाय
प्रदोष व्रतImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Oct 04, 2023 | 1:20 PM
Share

मुंबई :  प्रदोष व्रत (Pradosh Vrat 2023) भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे. प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशीला प्रदोष व्रत केले जाते. ऑक्टोबर महिन्यातील पहिला प्रदोष व्रत 12 ऑक्टोबर 2023, गुरूवारी होत आहे. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी 12 ऑक्टोबरला येत आहे. गुरूवारी प्रदोष व्रत असल्याने त्याला गुरू प्रदोष असे म्हणतात. प्रदोष व्रत केल्याने भगवान शंकराच्या कृपेने वैवाहिक जीवनात आनंद वाढतो. व्यक्तीला दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभते.

भाद्रपद गुरू प्रदोष व्रत 2023 पूजा मुहूर्त

मराठी दिनदर्शिकेनुसार, 12 ऑक्टोबर 2023 रोजी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाचे प्रदोष व्रत पाळले जाईल. पंचांगानुसार, भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी 12 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी 7:53 वाजता सुरू होईल आणि 12 ऑक्टोबर 2023 रोजी दुसऱ्या दिवशी सायंकाळी 7:53 वाजता समाप्त होईल. प्रदोष व्रताची पूजा प्रदोष काळात संध्याकाळी केली जात असल्याने. त्यामुळे 12 ऑक्टोबर रोजी हे व्रत करण्यात येणार आहे. प्रदोष व्रताच्या पूजेचा शुभ मुहूर्त 12 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7.53 ते रात्री 8.25 पर्यंत असेल.

ग्रह दोष दूर होतील

प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शंकराची पूजा केल्याने कुंडलीतील ग्रह दोष दूर होतात. असे मानले जाते की प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी भगवान भोलेनाथ शिवलिंगात वास करतात. यावेळी शिवलिंगाचा अभिषेक केल्याने शनिदोष, राहू-केतूचे अशुभ आणि चंद्राशी संबंधित दोष दूर होतात. तसेच ग्रह शुभ परिणाम देऊ लागतात. याशिवाय प्रदोष काळात महादेवाची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी भगवान शिवासोबत तुम्ही देवी पार्वतीचीही पूजा करावी.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान